

प्रत्येक पक्षाला प्रचारासाठी बूथची गरज
नागपूर: उत्तर नागपूरातील एका शाळेतील एक खोली भारतीय जनता पक्ष्ातर्फे बूथसाठी घेण्यात आली होती. पहाटे पाच वाजता पासून भाजपचे चार-पाच कार्यकर्ते हे प्रचारासाठी बूथवर उपस्थित होते. मात्र काँग्रेस पक्ष्ाने हताशेतून आमच्या विरुद्ध तक्रार केली. उत्तर नागपूरातील निवडणूक निर्णय अधिकारी सुजाता गंधे तसेच पोलिस उपायुक्त नीलोत्पल यांनी भारतीय जनता पक्षाची बाजू ऐकूण न घेता अरेरावीने कारवाई केली असा आरोप भाजप प्रवक्ते गिरीश व्यास यांनी सोमवारी सायंकाळी पत्र परिषदेत केला.
सोमवारी उत्तर नागपूर मतदार संघात विचित्र घटना घडली असल्याचे सांगत काँग्रेस पक्ष् हताश झाला असून कट-कारस्थानवर उतरला असल्याचा आरोप व्यास यांनी केला. शाळेतील ती खोली कार्यकर्त्यांसाठी वाॅर रुम म्हणून घेतली होती. रविवारी शाळेला सुटी असल्याने तसेच मतदानाच्या दिवशीही सुटी असल्याने ती खोली भाजपने कार्यकर्त्यांसाठी घेतली होती. त्या खोलीत भाजपचे कार्यकर्ते हे काम करीत असताना काँग्रेसच्या तक्रारीवर निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिस उपायुक्त यांनी कारवाई करुन सामान जप्त केले. आमचे कार्यकर्ते पोलिंग ऐजेंटकडून मतदानाच्या टक्केवारीविषयी फक्त माहिती घेत होते. देशहितामध्ये मतदान करण्याचे आवाहन करत होते. मात्र भाजप पक्षातर्फे आदर्श आचार संहितेचे कोणतेही उल्लंघन झाले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस उपायुक्त तसेच काँग्रेस पक्ष्ाने मात्र ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये चुकीचे वातावरण निर्मित केल्याचा आरोप गिरीश व्यास यांनी केला.
आदर्श आचार संहितेअंतर्गत प्रचार संपल्यावर जाहीर प्रचार करण्यावर बंदी असते. परिणामी प्रत्येकच राजकीय पक्ष् हा वन टू वन,हार्ट टू हार्ट, मॅन टू मॅन प्रचार करीत असतो आणि अश्याप्रकारच्या प्रचारावर बंदी नसते.निवडणूक म्हटली की निवडणूक निर्णय अधिकारी जिथे बसतात, तिथे पोलिंग प्रतिनिधी बसतात, ईव्हीएम सील करण्याचे काम होते, प्रत्येक पक्ष्ाचा प्रतिनिधी तिथे उपस्थित असतो, त्याच्या समोर सील लागली पाहिजे, पहाटे ५ वा.पासून कार्यकर्त्यांना जबाबदारी सोपवली जाते. प्रचारादरम्यान जुने व्हिडीयोज सोशल मिडीयावर व्हायरल होतात, आजच निवडणूकीत धनंजय मुंडे यांनी दिलेल्या बाईट्स व्हायरल झाले आहेत. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ‘राई चा पहाड’ करण्याचा प्रयत्न केला जे खेदजनक आणि अवमानकारक आहे. यावरुन काँग्रेसची मानसिकता दिसून पडते. त्या शाळेत नृत्याचे वर्ग चालत होते. लवकरच होणार्या स्नेहसंमेलनासाठी तिथे काही मुली या नृत्याचा सराव करीत होते. या महिला हेलमेट घालून बाहेर पडताच सोशल मिडीयवर कमेंट्स आले. सोशल मिडीयावर भाजप पक्षाची प्रतिमा मलीन करणारे कोणतेही पोस्ट व्हायरल झाल्यास पक्ष्ातर्फे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी सूचना गिरीश व्यास यांनी पत्र परिषदेत केली.
मतदारांना आवाहन करण्यासाठीची यादी कार्यकर्त्यांकडे होती, चार मोबाईल जब्त करण्यात आले.यात गैर काही नाही.कायद्याने आपले काम करावे आमचा आक्ष्ेप नाही. मात्र विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी आपले प्रचाराचे बॅनर बूथ जवळच ललावले असता आम्ही यावर आक्ष्ेप घेतला असता काँग्रेसनेने तसे आवेदन दिले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुजाता गंधे यांनी सांगितले. बूथ जवळ ३०० बॅनर लावण्यासाठी काँग्रेसने परवानगी घेतली असल्याचे गंधे यांनी सांगितले. नियम हे दोनशे मिटरच्या आत मतदारांना प्रभावित करणारे कोणत्याही प्रकारचे बॅनर,झेंडे,पोस्टर इ.लावण्याची परवानगी देत नाही तरी देखील अशी परवानगी देण्यात आली. काँग्रेस पक्ष्ाची प्रभाग ३,४,५,६ या बूथ वर बॅनर,झेंडे लागले होते. जर बूथच्या अगदी जवळ काँग्रेसचे बॅनर,झेंडे,पोस्टर लावण्याची परवानगी मिळू शकते तर काँग्रेस कार्यकर्त्यांना व्यक्तिशह भेटीवर बंदी कशी येऊ शकते. शाळेतील त्या खोलीत कार्यकर्ते पर्सन टू पर्सन भेटीवरच भर देत होते मात्र पोलिस व निवडणूकी अधिकारी यांचा अप्रोच हा आम्ही गुन्हेगार असल्यासारखा होता,त्यांनी समतोल विचार करावा अशी मागणी यावेळी गिरीश व्यास यांनी केली.
आम्ही कोणतेही नियम तोडले नाहीत, आदर्श आचार संहितेचा भंग केला नाही, योग्य वेळी योग्य व्यासपीठावर सक्ष् म अधिकारी यांच्या मार्फत या आकसपूर्ण कारवाईवर योग्य उत्तर देऊ. जे कोणी पक्ष्ाची प्रतिमा मलीन करणारे पोस्ट सोशल मिडीयवर व्हायरल करतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल. निवडणूकीत कंट्रोल रुम, वॉर रुम ही नियमित प्रक्रिया असते. भाजपची प्रादेशिक स्तरावर देखील वॉर रुम आहे. पक्ष्ाच्या इतर बूथ सारखेच शाळेतील या बूथवर देखील वैयक्तिकस्तरावर प्रचाराचे काम सुरु होते. आम्ही कुठलाही गुन्हा केला नाही. यावर कोणतीही नोटीस आम्हाला मिळाली तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. भाजपतर्फे आदर्श आचार संहितेचा भंग झाला नसून उत्तर नागपूर मतदार संघात मात्र पक्ष्ाविषयी अप्रप्रचार केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. पत्र परिषदेत उत्तर नागपूरचे पक्ष्ाचे निवडणूक प्रभारी विक्की कुकरेजा,ॲड.उदय डबले,ॲड.कुशाल नानमवार, भाजप प्रभारी मुकेश सागवानी आदी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
