फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमउचके यांच्या विरोधात छत्तीसगढ राज्यात गुन्हा दाखल

उचके यांच्या विरोधात छत्तीसगढ राज्यात गुन्हा दाखल

Advertisements

’हनीट्रॅप’प्रकरणात नागपूरात झाला आहे गुन्हा दाखल मात्र घटनेला वेगळा
अँगल:वकीलांचा दावा

.
मनपा आयुक्तांकडून उचकेंच्या चौकशीचे आदेश अद्यापही नाही

प्रभारी पदावर उचके गेल्या दहा वर्षांपासून कायम

नागपूर,ता.१० नोव्हेंबर २०२२:  माध्यमांमध्ये आज एक बातमी चांगलीच चर्चेस आली यात नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या विरोधात छत्तीसगढ येथील राजनंदगावच्या पोलिस ठाण्यात तरुणीला अश्‍लील छायाचित्रे व अश्‍लील व्हिडीयो पाठविण्यासंदर्भात तक्रार दाखल झाली असल्याचा उल्लेख आहे.

भादंसच्या कलम ५०९(ख),५०६(ब)  अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याच प्रकरणात नागपूरातील सदर पोलिस ठाण्यात उचके यांच्या तक्रारीनंतर अमित संतोष सोनीच्या विरोधात दीड कोटींच्या खंडणीची तक्रार दाखल झाली होती,हे विशेष!

यावर कारवाई करीत नागपूर पोलिसांनी या प्रकरणाला‘हनीट्रॅप’चा मुलामा चढवित, अमित याच्या विरोधात याच वर्षी जुलै महिन्यात गुन्हा दाखल केला मात्र या संपूर्ण प्रकरणाला नागपूर पोलिसांनी ’हनीट्रॅप व खंडणी’चा जो दोषारोप केला तो संपूर्ण प्रकार संशय निर्माण करणारा असल्याचे  सोनी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

राजेंद्र उचके यांच्या विरोधात या पूर्वी देखील शेकडो तक्रारी करण्यात आल्या आहेत,मात्र मनपा आयुक्त राधाकृष्णन.बी यांनी आपल्या अधिनस्थ अधिका-याला, सक्तीच्या रजेवर पाठविण्याशिवाय कोणतीही नैतिक व कायदेशीर कारवाई केली नाही.गेल्या दहा वर्षांपासून राजेंद्र उचके हे अग्निशमन विभागात प्रभारी पदावरच कार्यरत आहे.उचके यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक अारोप झाले असतानाही आयुक्तांनी त्यांचे निलंबत केले नाही,एवढ्या जबाबदार पदासाठी आयुक्तांकडे एक ही सक्षम अधिकारी नाही का?याबाबत आता प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.उचके यांच्याकडे आवश्‍यक शैक्षणिक अहर्ता नसल्यानेच ते प्रभारी पदावर कार्यरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

मनपा आयुक्तांच्या अधिकाराखाली काम करणा-या राजेंद्र उचके यांच्या विरोधात राजनंदगाव पोलिस ठाण्यात २ नोव्हेंबर २०२२ रोजी अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहेत.अश्‍लीलतेची सर्व मर्यादा पार करणारी छायाचित्रे व व्हीडीयो यांचा उल्लेख या दाखल तक्रारीत करण्यात आला आहे.

राजनंदगाव छत्तीसगढ येथे भा.द.स १८६० अंतर्गत कलम ५०९(ख),५०६(ब)आणि आयटी ॲक्ट २००० अंतर्गत ६७(अ)अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून उचके या तरुणीला १७ जून २०२२ पासून अश्‍लील मॅसेज पाठवित होता.पोर्न व्हिडीयो पाठवून दबाव आणत होता.तसेच ही बाब कोणालाही सांगितली तर परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत होता.पदाचा उल्लेख करीत नागपूर मनपाच्या अग्निशमन विभागात सर्वात वरिष्ठ पदावर असल्याने माझे कोणीही काहीही बिघडवू शकत नसल्याची धमकी देत होता, तक्रारीत असे आरोप करण्यात आले आहे.

उचके यांनी अमित सोनीच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात अमित यांना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती लाडेकर यांनी जामीन मंजूर केला आहे.आरोपीतर्फे ॲड.श्रीशील खोब्रागडे व ॲड.सुमेध पाटील यांनी काम पाहिले तर सरकारी वकील म्हणून ॲड.पांडे यांनी काम पाहिले.

उचके यांच्या विरोधात माहिती अधिकारी कार्यकर्ते तोराम नायडू यांनी देखील लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार नोंदवली आहे,याच तक्रारीवरुन,उचके यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उघड चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे.मुंबई येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संचालक प्रभात कुमार यांनी नागपूरच्या विभागाला पत्र पाठवून या घटनांची सखोल चौकशी करण्याचे पत्र पाठवले हाेते.

मनपाच्या एखाद्या अधिका-यावर भ्रष्टाचार व महिलेविरुद्ध लैंगिक बाबीसंबंधीचे एवढ्या गंभीर आरोपांमुळे मनपाची प्रतिमा धुमील होत असून मनपा आयुक्तांनी उचके यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या