फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमउचकेंच्या अडचणीत वाढ: ‘चॅटिंग आणि सेंटिंग’दोन्हीची होणार चौकशी!

उचकेंच्या अडचणीत वाढ: ‘चॅटिंग आणि सेंटिंग’दोन्हीची होणार चौकशी!

Advertisements

लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे संचालक प्रभात कुमार यांचे पोलिस अधिक्षक राकेश ओला यांना चौकशीचे पत्र

महाराष्ट्रात नागपूर मनपाची प्रतिमा धुमील:मनपा आयुक्तांकडून सख्त कारवाईची मागणी

नागपूर,ता. १५ जुलै २०२२: अमित सोनी नामक एका गायकाने नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना दीड कोटींची खंडणी मागितल्याचे प्रकरण ताजे असतानाच माहिती अधिकारी कार्यकर्ते तोराम हरीशकुमार नायडू यांच्या तक्रारीवरुन, उचके यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उघड चौकशी सुरु असतानाच ,मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संचालक प्रभात कुमार यांनी नागपूरच्या विभागाला पत्र पाठवून या घटनांची सखोल चौकशी करण्याचे पत्र दिले आहे,यामुळे उचकेंच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार आहे.

नायडू यांनी राज्यातील मुख्यमंत्री,मुंबईचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संचालक,नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार,पोलिस उपायुक्त चिन्मय पंडीत,मुंबईतील शांताक्रूस येथील फायर एडवाईझर यांना मेल करुन उचकें विषयीच्या तक्रारी मेल केल्या होत्या.

एवढंच नव्हे तर नागपूर मनपा अायुक्तांना देखील नायडू यांनी उचकेंवर कारवाई करण्याची मागणी केलेले पत्र ही या तक्रारींसोबत जोडून पाठविण्यात आले.मनपा आयुक्तांनी उचकेंना फक्त सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली आहे,हे विशेष!

अमित सोनी यांच्या पत्नीसोबत उचके यांचे अंतरंग संबंध असलेले उघड झाले आहे.या संबंधीची छायाचित्रे व व्हिडीयो नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देत, अमित सोनीने उचके यांना दीड कोटींची खंडणी मागितली असल्याची तक्रार स्वत:उचके यांनीच गुन्हे शाखेच्या अधिका-यांकडे केली असून, सदर येथील अशोका हॉटेलमध्ये उचकेंकडून ७० लाखांची खंडणी घेताना अमित सोनी याला या अधिका-यांनी सापळा रचून रंगे हात अटक केली होती.

मात्र उचके यांनी हनी ट्रॅप प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात न करता थेट गुन्हे शाखेच्या एका पोलीस अधिका-याकडे केल्याने एकूणच या प्रकरणाबाबतही संशय निर्माण झाला.उचके यांनी केलेल्या तक्रारीनुसार अमित सोनी व त्यांच्या पत्नीने त्यांना ब्लॅकमेल केले.अशा प्रकरणात आधी नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होत असते.उचके यांच्या प्रकरणात असे घडले नाही तर उचके यांनी थेट वादग्रस्त कारकीर्द असलेल्या गुन्हे शाखेतील एका पोलीस अधिका-याची भेट घेतली.

या अधिका-यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती वरिष्ठांना न देता फक्त दाम्पत्य खंडणी मागत असल्याचे सांगितले.त्या अधिका-याने पोलीस उपायुक्तांना अंधारात ठेऊन सदरच्या त्या हॉटेलध्ये कारवाई केल्याची माहिती ही पुढे आली आहे.

यानंतर एका इमारत बांधकामासाठी नियमबाह्यरित्या ना-हरकत प्रमाणपत्र देताना गैरव्यवहार झाल्याच्या एका जुन्या प्रकरणात देखील प्राथमिक चौकशीत तथ्य आढळून आल्याने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी)ने खुली चौकशी उचकेंविरुद्ध सुरु केली आहे.यासाठी महापालिका आयुक्तांनी त्यांना परवानगी प्रदान केली होती.

आता या दोन्ही प्रकरणाबाबत नायडू यांनी मुख्यमंत्र्यांसह,मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संचालक प्रभात कुमार यांनाही मेलद्वारे पत्र पाठविल्याने,प्रभात कुमार यांनी नागपूरच्या लाचलुचपत विभागाला या ‘चॅटिंग आणि सेंटिग’ची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत,यामुळे उचके यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रात नागपूर मनपाची छवि धुमील होत असून आयुक्तांनी उचकेंविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.उचके हे कामावर येत होते की ‘चॅटिंग आणि सेंटींग’मध्येच व्यस्त राहत होते, याची सखोल चौकशी लाचलुचपत विभागाच्या वरिष्ठांकडून व्हावी अशी माणगी नायडू यांनी आपल्या मेलमध्ये केली होती.

याशिवाय मनपा आयुक्तांना संपूर्ण पुरावे व कारवाईसाठी पत्र देऊन देखील आयुक्तांनी अद्याप उचकेंविरुद्ध कठोर कारवाई न केल्याचे नमूद करुन आयुक्तांना देण्यात आलेले पत्र देखील आपल्या तक्रारीत नायडू यांनी सोबत जोडले आहे.मनपा आयुक्तांनी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून ‘चॅटिंग’चे जे पुरावे सापडले आहेत ते मागवून सखोल चौकशी करावी व उचकेंविरुद्ध त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी नायडू यांनी पत्रात केली आहे.

नागपूर मनपाची बदनामी होत असल्याने सत्यता बाहेर येणे गरजेचे आहे असे नमूद करीत, मनपा आयुक्तांनी अद्याप पोलिस आयुक्तांकडून पुरावे मागवून बघितले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

(व्हिडीयो:पोलिस आयुक्तालयात मॉक ड्रील प्रसंगी उपस्थित राजेंद्र उचके,याच वेळी गुन्हे शाखेच्या अधिका-यांशी बोलणे झाले होते का?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे)

दीड कोटींची रक्कम ही छोटी रक्कम नसून एवढा पैसा मनपाच्या एका विभाग प्रमुखांकडे कुठून आला?कोणत्या मार्गाने आला?यातील ७० लाख रुपये देण्याचे उचके यांनी आधी मान्य ही केले होते,अशी तक्रार देखील त्यांनीच गुन्हे शाखेच्या अधिका-याकडे नमूद केली आहे.७० लाखांची खंडणी देण्या इतपत एवढी आर्थिक सुबत्ता उचके यांच्याकडे कुठून आली,या सर्व प्रश्‍नांची उकल करण्यात यावी,अशी मागणी नायडू यांनी आपल्या पत्रात केली,त्यांच्या या पत्राची गंभीर दखल घेत मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संचालक प्रभात कुमार यांनी तसे पत्रच, नागपूरातील विभागाला आता पाठवले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या