

भाजपच्या कथनी आणि करणीमध्ये अंतर: नागरिकांमध्ये रंगली चर्चा
डॉ.ममता खांडेकर
(Seniour Journalist)
नागपूर: एकीकडे भारतीय जनता पक्ष्ाचे नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी महापालिकेच्या सभेत महापौर निवडीनंतर राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या गंभीर संकटाप्रश्नी कोणत्याही प्रकारचा सत्कार स्वीकार नसल्याची घोषणा केली मात्र सभागृहात बाहेर पडताच त्यांची ही ‘भीष्म प्रतिज्ञा’ भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहा पुढे क्ष् णार्धात लोप पावली व सभागृहा बाहेर जोरदार फटाक्यांची लढ फोडण्यात आली.एवढेच नव्हे तर ढोल-ताश्यांच्या संदलसह खुल्या जीपमधून त्यांची शानदार मिरवणूक देखील काढण्यात आली.यावर अनेकांनी नाराजी व्यक्त करीत ‘ईस सादगी का जबाब नही’ अश्या शब्दात टोमणा मारला.
सभागृहात महापौर निवडीनंतर लगेचच घेण्यात आलेल्या पत्र परिषदेत नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी नागपूर मनपाचा शेतकऱ्यांशी सरळ कोणताही संबंध नसला तरी शेतकऱ्यांप्रति संवेदनशीलता व्यक्त करीत कोणत्याही प्रकारचा सत्कार,पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ स्वीकारणार नसल्याचे सांगितले. उलट सत्कारासाठी खर्च होणारा पैसा हा गरीब व गरजू क्रीडापटू व रुग्णांसाठी ‘महापौर सहायता निधी’मध्ये धनादेशद्वारे देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला सभागृहाबाहेर पडताच चांगलाच सुरुंग लागला. कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष, फटाके,संदल,ढोल-ताशे,हारतूरे आणि उघड्या जीपमधील मिरवणूक बघता हा कोणता साधेपणा आहे?असा प्रश्न नागपूरकरांना पडला!एकीकडे सांगायचे सत्कार स्वीकार नाही दूसरीकडे त्यांच्या या विधानाला काही क्ष् ण ही लोटत नाही तर विधानाच्या विपरित कृती त्यांच्याकडून होते,याकडे अनेकांनी बोट दाखवले. महापौर पद हे शहराच्या प्रथम नागरिकाचे पद असून या पदावरील व्यक्तिच्या प्रत्येक उक्ती आणि कृतीकडे जनता ही गांर्भीयाने बघत असते. एकीकडे शहरातील नवनिर्वाचित महापौर शेतकऱ्यांप्रति संवेदनशीलता व्यक्त करतात मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे शहराध्यक्ष् व कार्यकर्ते यांनी शेतकर्यांप्रतिची संवदेशनशीलता बासनात गुंडालून आपल्या नवनिर्वाचित महापौरांचे जोरदार शक्तीप्रदर्शन घडवून आणल्याची चर्चा शहरात आज दिवसभर चांगलीच रंगली.
महापौरांच्या या शक्तीप्रदर्शनाला किवा फटाकेबाजीला नागरिकांचा विरोध नव्हताच मात्र महापौर यांनी नुकताच जो शब्द सभागृहात पत्रकारांना सांगताना दिला होता ‘मी कोणत्याही प्रकारचा सत्कार स्वीकारणार नाही’त्याच्या अगदी उलट कृती त्यांनी काही क्ष् ण लोटताच केली असल्याने अनेकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’असे तुकोबा माऊली सांगून गेली त्यामुळे जे बोलतो त्याच्या अगदी उलट कृती करणाऱ्या व्यक्तिंची विश्वासहर्ता लवकरच लयास पावते अशी इतिहासात अनेक उदाहरणे आहेत.सभागृहाबाहेर रंगलेल्या भाजपाच्या लेखी असणाऱ्या या ‘साधेपणाच्या’ सत्कारावर म्हणूनच ‘ईस सादगी का जबाब नही…तू भी सादा है कभी चाल बदलता ही नही..हम भी सादा है इसी चाल में आ जाते हैं’या प्रसिद्ध शायर अफजल खान यांच्या शायरीची देखील चर्चा सभागृहाबाहेर चांगलीच रंगली होती!




आमचे चॅनल subscribe करा
