फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमची सुरक्षा धोक्यात!

ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमची सुरक्षा धोक्यात!

Advertisements
सलील देशमुख यांचा गंभीर आरोप

सुरक्षा अधिकारी दाखवतात जिल्हाधिका-यांकडे बोट!
नागपूर,ता.४ डिसेंबर २०२५: नगर परिषदेसाठी मतदान संपल्यानंतर मोवाडसह अनेक ठिकाणी ईव्हीएम हे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले नसून स्ट्राँग रुमच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
२ डिसेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर नगर परिषद येथे उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रुमची प्रतिनिधींच्या एका पथकाने पाहणी केल्यानंतर या गंभीर त्रुटी समोर आल्याचे सलील देशमुख यांनी सांगितले.२ व ३ डिसेंबर रोजी पाहणी दरम्यान सुरक्षा व्यवस्थेत अनेक गंभीर व धक्कादायक त्रुटी निर्दशनास आल्या असून संबंधित यंत्रणेने तातडीने त्यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली.
प्रतिनिधींच्या पाहणीनुसार सीसीटीव्हीचा डेटा सुरक्षित नाही.सीसीटीव्ही निरीक्षण डेटा सीओ केबिन समोरील सर्वांसाठी सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे,ज्यामुळे गोपनीयतेस मोठा धोका निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.
डेटा बॅकअप देखील सुरक्षीत नाही.महत्वाच्या सीसीटीव्ही फुटेजचा बॅकअप ठेवण्यासाठी कोणतीही अधिकृत व्यवस्था नाही.ज्यामुळे डेटा टॅम्पर होण्याची शक्यता आहे.सर्व्हिलन्स प्रणाली ही देखील कमकुवत असून फुटेज संग्रहणाच्या ठिकाणीच त्याच परिसराचे फुटेज साठवले जात आहे आणि कॅमरा बंद(लॅग)होण्याची माहिती देणारी कोणतीही प्रणाली कार्यान्वित नाही.
 स्ट्राँग रुमचा दरवाजा हा जरी सीलबंद असला तरी लागून असलेल्या दोन खिडक्यांना लोखंडी जाळी(ग्रिल)किंवा मेटॅलिक मेषची व्यवस्थाच नाही,त्या केवळ आतून सीलबंद आहेत,यामुळे अनाधिकृत प्रवेशाचा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाचे म्हणजे याबाबत संबंधित सुरक्षा अधिका-यांना सांगितले असता ते राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांना परिस्थितील कळविण्या ऐवजी तक्रार करणा-यांनाच जिल्हाधिकारींना कळविण्याचा उरफाटा सल्ला देतात!त्यांची ही वर्तवणूक प्रशासकीय प्रक्रियेच्या विरोधात असल्याचे सलील देशमुख म्हणाले.
परिणामी,निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्‍नचिन्ह उभे राहीले असून मतमोजणीसाठी तब्बल १९ दिवस राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आता काय ठिकठिकाणी स्ट्राँग रुम समोरच झोपून दिवस कंठायचे का?असा सवाल त्यांनी केला.
ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत राज्य निवडणूक आयोग,जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिका-यांनी तातडीने लक्ष देऊन त्रुटी दूर करण्याची मागणी या प्रसंगी त्यांनी केली.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh Official युट्युब चॅनलवर उपलब्ध)
…………………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या