


संघावरही केली विखारी टिका
नागपूर: मागे मी केंद्रिय मंत्री स्मृती ईराणींबद्दल बोललो होतो ‘संविधान बदलने नवरे बदलण्या इतपत सोपे नाही’तेव्हा केवढा कहर झाला होता. मुख्यमंत्री,आरएसएस, भाजपवाले सर्वांना मिरच्या झोंबल्या होत्या. मी आजही त्याच मतावर ठाम असल्याचे जयदीप कवाडे म्हणाले. दसर्याच्या मेळाव्यात सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले होते ‘आंबेडकर का संविधान बदल डालेंगे’ मात्र आमचे नेते हे बोलत नाहीत,सांगत नाहीत. आमच्या लोकांनी हे सांगितले पाहिजे.ते नागपूर दक्ष्णि-पश्चिमचे पराभूत उमेदवार आशिष देशमुख यांनी जयताळा मार्गावरील अनसूया मंगल कार्यालयात रविवार दि. ३ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.
डॉ.आंबेडकरांनी आम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिला. आमदार,खासदार,मुख्यमंत्री,पंतप्रधान होण्याचा अधिकार प्रदान केला. तोच संविधान बदलण्याची भाषा बोलली जाते तेव्हा आमचा एक ही नेता बोलत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बोलले नाहीत. एकमेव जोगेंद्र कवाडे हे बोललेत. जे झालं ते झालं. पुढे अनेक संधी आहे. ‘काई साथ ना दे मेरा चलना मुझे भी आता है…भाजप आणि शिवसेनेला ईशारा देत मी एवढेच बोलतो ‘आग से हूं वाकिफ जलना मुझे भी आता है‘.
मी अर्जूनी-मोरगांव मतदार संघाची तयारी केली होती मात्र मला भंडारातून निवडणूक लढवण्याचा आदेश मिळाला आणि तो मी स्वीकारला,यासाठी कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव हा भंडरातून झाला होता. पराभवाचा तो डाग मला पुसून काढायचा होता मात्र जोगेंद्र कवाडेंचा हा भीम सैनिक या निवडणूकीत पराभूत झाला,डॉ.आंबेडकरांचा पराभव आम्ही बदलू शकलो नाही याला कारण काँग्रेसची नेते मंडळी हीच कारणीभूत होती.
ही गोष्ट खरी आहे ‘काँग्रेसला कोणीही हरवू शकत नाही,काँग्रेसच काँग्रेसला हरवत असते’.भाजप नाही,आरएसएस नाही काँग्रेसला हरवू शकत, फक्त काँग्रेसमधली गटबाजी ही बंद झाली पाहिजे. आज अनेक वक्त्यांनी ‘जो जिता वही सिंकदर’असे विधान केले मात्र ते हे का विसरतात ‘हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते है’. आम्ही बलिदानाचे कफन बांधूनच बाहेर निघालो आहोत. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचे धाडस आशिष देशमुख यांनी दाखवले. मुख्यमंत्री हे मोठ मोठ्या गोष्टी करत होते,मी एकच दिवस मतदार संघात फिरेल मला महाराष्ट्रात प्रचार करायचा आहे मात्र आशिष देशमुख यांनी दिलेल्या आव्हानामुळे ते दक्ष्णि-पश्चिममध्येच फिरताना दिसले,हा मुख्यमंत्र्यांचा पराभवच होता. गेल्या २५ वर्षांपासून कवाडे साहेब हे कोणताही स्वार्थ न ठेवता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीत आहेत. आशिष देशमुख यांनी आता संपूर्ण महाराष्ट्रात ‘पर्दाफाश रॅली’काढावी असे आवाहन जयदीप कवाडे यांनी याप्रसंगी दिले. यावेळी आशिष देशमुख यांना आता विधान परिषदेवर निवडून या अशी शुभेच्छा प्रदान करताना ‘आम्हाला पण सोबत घ्या’अशी मिश्किीली जयदीप कवाडे यांनी केली.
भाषणाच्या शेवटी काँग्रेस-रिपाई एकतेचा जयघोष सभागृहात दणाणला.




आमचे चॅनल subscribe करा
