फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणईडीच्या चौकशीत मला जे काही सांगायचे आहे ते मी त्यांना सांगितले-राज ठाकरे

ईडीच्या चौकशीत मला जे काही सांगायचे आहे ते मी त्यांना सांगितले-राज ठाकरे

Advertisements


मुंबई,२२ ऑगस्ट २०१९: साडेआठ तासांच्या ईडीच्या चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी पोहचले त्यावेळी घराबाहेर अनेक मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. या उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी  सांगितलं की, ईडीच्या चौकशीत मला जे काही सांगायचे आहे ते मी त्यांना सांगितले आहे. अशा कितीही चौकशी लावल्या तरीही माझं तोंड बंद ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिली.

दरम्यान, राज यांच्याकडे केल्या जाणाऱ्या चौकशीमुळे महानगरात निर्माण झालेला ‘हाय व्होल्टेज’वातावरण सायंकाळी निवळले. कडक बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेने समाधानाचा सुस्कारा सोडला.  दादर(प)शिवसेना भवनासमोरील  कोहिनूर मिल-३ या चार जागेत उभारल्या जाणाऱ्या कोहिनूर स्केअर टॉवर या सुमारे २१०० कोटीच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. इन्फ्रास्ट्रकचर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे(आयएलएफएस) कंपनीचे थकीत कर्जाच्या अनुषंगाने कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी व अन्य भागीदार राजन शिरोडकर यांची गेली तीन दिवस चौकशी करण्यात आली. जोशी यांना जवळपास २४ तास तर शिरोडकर यांची १३ तास ईडीच्या कार्यालयात व्यतित करावे लागले असून येत्या सोमवारी (दि.२६) त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

सकाळी साडेअकराच्या सुमारास कार्यालयात गेलेले राज ठाकरे रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ते बाहेर पडले.या कालावधीत कोहिनूर स्केअर टॉवरमधील गुंतवणूक व भागीदारी मागे घेण्यामागील नेमकी कारणेबाबत त्यांच्याकडे प्रश्नांची सरबत्ती करण्यात आले. ईडी कार्यालयात चौकशी सुरु असताना दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांना घरातून  जेवणाचा डबा आणण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास जेवणासाठी थोडा वेळ चौकशी थांबविण्यात आली. आवश्यकता वाटल्यास त्यांना  पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. राज ठाकरेंचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करून त्यांचे स्वागत केले. तसेच घोषणाबाजीही दिल्या. या कार्यकर्त्यांचे राज ठाकरेंनी आभार मानले.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या