फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजइंडियन एअरलाईन्सला तोट्यात आणण्याचे पाप प्रफूल्ल पटेलचे:प्रकाश जावडेकर

इंडियन एअरलाईन्सला तोट्यात आणण्याचे पाप प्रफूल्ल पटेलचे:प्रकाश जावडेकर

Advertisements

१८ हजार कोटीच्या कंपनीने केला ६० हजार कोटींचा सौदा

नागपूर: माजी उड्डयन मंत्री प्रफूल्ल पटेल यांच्या मागे ईडीची चौकशी लावण्यात भारतीय जनता पक्ष्ाचा कोणताही हात नाही. हे त्यांचेच पाप आहे. दिपक तलवार यांच्या विमानातून फिरणारे आणि विमानतळाजवळचे एसआरएचे काम बिल्डरला देणारेही तेच होते. एअर इंडियाची क्ष् मता नसताना १८ हजार कोटींच्या या कंपनीला ६० हजार कोटींचा सौदा करायला लावला, जिथे इंडिगो,जेटसारखी खाजगी विमान सेवा वीस तास काम करायची तेथे एअर इंडियाची विमाने ९ तास उड्डाण भरायची,एवढेच नव्हे तर एअर इंडियाची हक्काचा मार्ग उड्डाणासाठी खाजगी विमान सेवेला उपलब्ध करुन दिला यामुळे एअर इंडिया तोट्यात आली, हे पाप प्रफूल्ल पटेलांनीच केले त्यामुळे त्यांच्या मागे चौकशी लागली असल्याचे वक्तव्य केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर रोजी हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर आ.गिरीश व्यास, माजी खासदार अजय संचेती,आ.अनिल सोले,आ.सुधाकर कोहळे, शहराध्यक्ष् प्रवीण दटके आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले,की घोटाळे केले तर किंमत मोजावीच लागेल. पंजाब ॲण्ड महाराष्ट्र(पीएमबी)सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहारातही यांचेच लागेबंधे असल्याचा आरोप त्यांनी केला. मनमोहन सिंह यांच्याच काळात ‘फोन बँकिंग’हा नवा प्रकारचा बँक व्यवहार सुरु झाला होता,फोनवरुनच कोट्यावधीचे कर्ज मंजूर होत होते,असा अारोप त्यांनी केला. ईडीविषयी आता आेरड करणारे यांच्याच काळात,ईडीच्या चौकशींचा अहवाल मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसून लिहल्या जात होता असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे एकेकाळी स्वत:सोबतच इतरांचे देखील पक्ष् सांभाळण्याचे काम करीत होते,आता मात्र त्यांना स्वत:चाच पक्ष् सांभाळणे कठीण झाले आहे. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही नुकतेच म्हटले आहेच‘आम्ही आता थकलो’यावरुन विरोधकांची स्थिती महाराष्ट्रात काय आहे हे लक्ष्ात येते. विरोधकांचा आणखी एक गोंधळ म्हणजे वैचारिक गोंधळ असल्याचे ते म्हणाले. ते नेमके कुठल्या बाजूने उभे आहेत हेच कळत नाही. कलम ३७०,ट्रिपल तलाक, एनआरसीचा ते विरोध करतात, एनआरसीचा करार राजीव गांधी यांनीच केला होता मात्र आज त्यांचाच पक्ष् याला विरोध करीत आहे.जीएसटीचा निर्णय हा त्यांचाच होता,आता ते विरोध करीत आहेत,सर्जिकल स्ट्राईकसारखा भीम पराक्रम देशाच्या सैन्याने केला असता त्याचेही पुरावे काँग्रेसने मागितले,ज्या बालाकोटची दखल पाकिस्तानने घेतली ती घटना घडलीच नाही असा प्रोपोगंडा काँग्रेसनेच केला. राष्ट्रवाद हा जगभर निवडणूकीचा प्रमुख मुद्दा असतोच.ज्या जेएनयूमध्ये रोष्ट्रविरोधी घोषणा दिल्या गेल्यात त्याचेही समर्थन काँग्रेस अध्यक्ष्ांनी तिथे भेट देऊन केले.

देशाचे संरक्ष् ण मंत्री असताना पोटनिवडणूकीत शरद पवार यांनीच, मी संरक्ष् ण मंत्री असल्यामुळे निर्विरोध निवडणूक झाली पाहिजे,विरोधात कोणी उभे राहू नये असे ते म्हणाले होते,मग हे राजकारण नव्हते का? असा सवाल त्यांनी केला. सावरकरांच्या मुद्दावर बोलताना, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टपाल तिकीट काढले होते आत तेच सावरकरांना विरोध करीत आहेत. तीन पिढ्यांना सावरकरांनी देशभक्तीची प्रेरणा दिली असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी.राजगोपालाचारी यांनी सावरकरांवर प्रेरणादायी पुस्तक लिहले आहे, काँग्रेसने किमान त्यांचे तरी सावरकरांवरील पुस्तक वाचावे,असा सल्ला त्यांनी दिला. एका प्रश्‍नाच्या उत्तरावर,आमच्यासमोर प्रबळ विरोधकच नाही,याला भाजप जबाबदार नाही, त्यांना जिवंत ठेवणे हे भाजपचे काम नाही. वेगळ्या विदर्भाच्या प्रश्‍नावर बोलताना भाजपची जनसंघापासूनच विदर्भाबाबतची भूमिका ही अतिशय स्पष्ट असल्याचे ते म्हणाले. मात्र फडणवीस सरकारच्या काळात ७८ हजार कोटींची कामे एकट्या सिंचनाच्याच क्षेत्रात झाली आहे, विदर्भातलाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. विदर्भाचा बॅकलॉग हा भरुन काढला जात आहे सोबतच उर्वरित महाराष्ट्राचा देखील विकास झपाट्याने होत असल्याचा ते म्हणाले. १९७७ नंतर पहील्यांदाज फडणवीस सरकारने आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

५० लाख शेतकरी यांची कर्जमाफी झाली आहे. ५३ लाख शेतकरी यांना पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा लाभ झाला. ९० लाख शेतकरी यांना विम्याच्या संरक्ष् णाचा लाभ झाला.८ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली.६० लाख शौचालयांची निर्मिती झाली.३० लाख लोकांना आयुष्यमान योजनेचा लाभ झाला. ४ लाख लोकांना घरकूल योजनेचा लाभ झाला.ही फक्त आकडेवारी नाही तर फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात उल्लेखनीय प्रगती झाली असल्याचे ते म्हणाले. लवकरच ‘घर घर मे जल’या योजनेलाही सुरवात होणार असल्याचे ते म्हणाले. मोदी यांच्या काळात घर,वीज,पाणी,गॅस,बँक खाते, विकासाची सगळी मदत ही सरळ लाभधारकाच्या खात्यात जमा होते. पूर्वी राजीव गांधी म्हणाले होते दिल्लीवरुन १ रु.पाठवला असता शेवटच्या घटकापर्यंत फक्त १५ पैसे पोहोचतात, मोदी यांच्या काळात मात्र लाभधारकारच्या खात्यात १०० च्या १०० रु. जमा होतात. अारे जगंल तोड प्रश्‍नावर बोलताना महाराष्ट्रात १४ हजार हेक्टर जमीनवर वृक्ष्ारोपणही झाले आहे,असे ते म्णाले.

सीबीआयचा दुरुपयोग काँग्रेसनेच केला-
कोळसा घोटाळ्यावर मी आणि हंसराज अहिर यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या मात्र सीबीआयमार्फत काँग्रेसनेच न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केली,आम्ही ही चौकशी बंद करीत असल्याचे याचिकेत सांगितले तेव्हा न्यायालयानेच या खटल्यात मूळ याचिकाकर्ता कोण आहेत?हे विचारले होते,यामुळेच मी व हंसराज अहिर यांनी न्यायालयात कॉंग्रेसच्या याचिकेचा विरोध केला होता, सीबीआयचा दुरुपयोग भाजप करीत नसून काँग्रेसनेच सीबीआयचा दुरुपयोग केला आहे. ऐन निवडणूकीच्या काळातच चौकशीचा ससेमारा का?या प्रश्‍नावर बोलताना तपास यंत्रणेची एक पद्धती असते, तालेवार यांना अटक झाल्यानंतर पुढील चौकशीही सुरु झाली.

महाराष्ट्रात २२१ जागा मिळवणार-
२१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात नवा इतिहास घडणार आहे. २४ ऑक्टोबरला हा इतिहास माहिती होईल. २८८ पैकी २२१ अश्‍या सर्वाधिक जागा युती जिंकणार आहे.एकेकाळी काँग्रेसला एवढ्या जागा मिळाल्या होत्या. यावेळी युती तो रेकॉर्ड तोडणार. याला तीन कारणे आहेत,मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्‍वास अढळच नाही तर वाढतच चालला आहे.जगभरात भारताचं महत्व वाढत चाललं आहे. त्याप्रमाणे ‘देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र’हे घोषवाक्य चांगलच लोकप्रिय झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं काम,त्यांची निर्माण झालेली प्रतिमा आणि काँग्रेस व विरोधी पक्ष्ां ची वैचारिक दिवाळखोरी यामुळे हा ऐतिहासिक विजय आम्ही मिळवणार अाहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या