फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमआरोपींनी शिजवला वीस दिवसांपूर्वीच अर्थवाच्या अपहरणाचा कट!

आरोपींनी शिजवला वीस दिवसांपूर्वीच अर्थवाच्या अपहरणाचा कट!

चौदा वर्षीय अथर्व हत्याकांड :तीन आरोपी अटकेत

पोलिस विभागाचे यश: तीन दिवसातच लावला आरोपींचा छडा
पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांची पत्रकार परिषदेत माहिती
नागपूर,ता.६ एप्रिल २०२६: संपूर्ण नागपूरात खळबळ उडवून देणारे चौदा वर्षीय अथर्व नन्नोरे हत्याकांडातील तीन आरोपींच्या मुसक्या अवघ्या तीन दिवसात पोलिसांनी आवळल्या.महत्वाचं म्हणजे या आरोपींचे वय अवघे १९-१९ आणि २२ वर्ष आहे!जय रामगोपाल यादव वय वर्षे १९,राहणार-आ.बी.एम. रोड रुमवी किराणा दूकाना जवळ,हद्द गिट्टीखदान पो.स्टेशन,हा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असून, भाजीपाला विक्रेता, ऑटोचालक व इलेक्ट्रीशियनचे काम करतो.दूसरा आरोपी केतन उर्फ कुणाल रमेश शाहू,वय वर्ष २२,राहणार-कुतुबशाह नगर,मस्दिज जवळ,हा देखील इलेक्ट्रीशियन आहे तर तिस-या आरोपीचे नाव आयुष मोहन साहू,वय वर्ष १९ असून राहणार-प्लॉट क्र.४९,इरोस सोसायटी,गोरेवाडा,हा कबाडीचा व्यवसाय करतो.पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांनी सांगितल्याप्रमाणे या तिघांनी अथर्वच्या अपहरणाचा कट किमान २० ते २५ दिवस आधीच रचला होता व ते संधीच्या शोधात होते.
२ एप्रिल हनुमान जयंतीच्या दिवशी गिट्टीखदान पोलिस ठाणे हद्दीतील चौदा वर्षीय अथर्व नन्नाेरे याचे शोभायात्रेदरम्यान अपहरण करण्यात आले होते.४ एप्रिल रोजी कळमेश्‍वर महामार्गावरील भरतवाडा जवळ त्याचा मृतदेह एका पोत्यात हातपाय बांधून असलेल्या अवस्थेत सापडला होता.

(छायाचित्र: मृतक अथर्व दिलीप नन्नाेरे)

हनुमान जयंतीचा दिवस आरोपींनी निवडला कारण या दिवशी शोभायात्रेमुळे प्रचंड गर्दी असणार होती तसेच या गर्दीचा त्यांना फायदा होणार होता,कोणाला संशय देखील येणार नाही,अशी त्यांची योजना होती.शोभायात्रेच्या दरम्यान रात्री ९.५१ ते १० वाजता दरम्यान या तिघांनी अथर्वचे अपहरण करुन त्याला वाहनात नेले.मुख्य सूत्रधार जय रामगोपाल यादवला अथर्व चांगल्याने ओळखत होता.तो अथर्वचा शेजारी होता,त्यामुळे तो सहज त्याच्यासोबत गेला.

हे हत्याकांड ४० ते ५० लाख खंडणीच्या रकमेसाठी करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत डॉ.सिंगल यांनी सांगितले.अथर्वच्या वडीलांकडे बक्कळ पैसा असल्याचा या तिघांचा समज होता.त्याच्या वडीलांची शेती होती जी ते विकणार होते असा देखील कयास लावला जात आहे.आरोपींनी विविध कारणांसाठी कर्ज घेतले होते.अथर्वचे अपहरण करुन खंडणी मागण्याची त्यांची योजना होती.यातील १५-१५ लाख रुपये केतन उर्फ कुणाल साहू व आयुष मोहन साहू ठेवणार होते व उर्वरित रक्कम ज्याने योजना आखली होती त्याला मिळणार होती.
शोभायात्रेदरम्यान,शोभायात्रा फिरुन पुन्हा त्याच रस्त्याने येणार असल्याने गल्लीतून घरी जाऊ असे मुख्य आरोपीने अथर्वला सांगितले.मात्र,गल्लीत एका वाहनात अथर्वचे अपहरण करण्यात आले व यानंतर त्याला बेशुद्ध करण्यासाठी आधी उंदीर मारण्याचे औषध पाजण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.या औषधांनी अथर्व बेशुद्ध झाला नाही त्यामुळे गमछ्याने त्याचा गळा मुख्य आरोपीने आवळला.अथर्वचा मृत्यू झाल्याने आरोपींनी कोणतीही खंडणीची रक्कम अथर्वच्या वडीलांना मागितली नाही व अथर्वच्या मृतदेहाला कळमेश्‍वर जवळील भरतवाडा स्थानी फेकून देणय्ात आले.
या आरोपींनी हत्याकांडानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही तर आपापल्या घरीच राहीले.अथर्व बेपत्ता झाल्यानंतर नन्नारे कुटूंबियांसोबत त्यांच्या नातेवाईकांनी व स्थानिकांनी ३ एप्रिल रोजी गिट्टीखदान परिसरात जे चक्काजाम आंदोलन केले त्यात मुख्य आरोपी दूर उभा राहून हे बघत होता व त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला,अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

(छायाचित्र: अथर्वच्या हत्याकांडातील तिन्ही आरोपी)

अथर्वचा मृत्यू वाहनाच्या आतच झाला असून, शवविच्छेदन अहवालात मृत्यूची नेमकी वेळ कळेल.ही अतिशय संवेदनशील घटना असून पोलिस विभागाने अथर्वचे शेवटचे सीसीटीव्ही फूटेज पासून तर कळमेश्‍वर महामार्गा पर्यंत गेल्या दोन दिवसात संपूर्ण सीसीटीव्ही तपासले व आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.या मार्गावर जंगल देखील होते,त्यातही अथर्वचा मृतदेह सापडण्या पूर्वी शोध घेण्यात आला होता.शेवटच्या क्षणी अथर्व हा मुख्य अारोपी जय सोबत अनेकांना दिसला होता.क्राईम ब्रान्च व झोनल अधिका-यांनी याकडेच लक्ष केंद्रीत करीत पुरावे शोधण्यास सुरवात केली.आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी घटनेची माहिती दिली.
अथर्वला ते किती वाजता कुठे-कुठे घेऊन गेले,कोणकोणत्या वाहनांचा वापर केला याचा गेले दिड दिवस सुगावा लागत नव्हता.ही हत्या अतिशय शांत डोक्याने व सुनियोजितपणे करण्यात आली असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.या तिघांव्यतिरिक्त आणखी कोण-कोण या हत्याकांडात सहभागी होतं,याचा ही तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.पोलिस अधिकारी या हत्याकांडातील सर्व तांत्रिक़ पुरावे शोधत आहेत.अथर्वच्या वडीलांकडे खूप पैसा असल्याचे त्यांचा समज होता.ते अथर्वची हत्या करणार नव्हते असे ते तपासादरम्यान सांगत आहेत मात्र,तो बेशुद्ध झाला नसल्याने त्यांनी त्याचा गळा अावळला.
अथर्वची हत्या पोर्णिमेच्या दिवशी झाली असल्याने श्रीमंत होण्यासाठी नरबळी असल्याची शंकाही व्यक्त केली जाते,यात कितपत तथ्य आहे?असा प्रश्‍न केला असता,असा विचार ही करु नका,दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नका,असे आवाहन डॉ.सिंघल यांनी केले.
रात्रभर अथर्वचा मृतदेह आरोपींच्या वाहनातच!
ज्या रात्री अथर्वची सर्वदूर शोधाशोध सुरु होती त्यावेळी रात्रभर अथर्वचा मृतदेह आरोपींच्या वाहनातच होता.दुस-या दिवशी आरोपींनी त्याचा मृतदेह कळमेश्‍वर मार्गावरील भरतवाडा येथे नेऊन फेकला.या घटनेची संवेदनशीला बघता एसीपी रँकच्या अधिका-यांनी या घटनेचा तपास केला.या घटनेतील जे-जे पुरावे समाेर येतील त्यांचा संपूर्ण तांत्रिक़ तपास केला जात आहे,असे डॉ.सिंघल यांनी सांगितले.या गुन्ह्यात दोन वाहनाचा संदर्भ आला आहे,तपास पूर्ण झाल्यावरच याचा खुलासा केला जाईल,असे ते म्हणाले.
महत्वाचे म्हणजे या घटनेतील आरोपींचे वय हे अवघे १९-१९ व २२ वर्ष आहे त्यामुळे आता समाजानेच याचा विचार करणे गरजेचे आहे,अवघ्या १९ वर्षांची मुले ही अशी योजना आखत आहेत,कोणाचा तरी सहज जीव घेत आहे.याचा कुटूंबियांनी व समाजाने आता तरी विचार करणे गरजेचे असल्याचे डॉ.सिंघल म्हणाले.
नुकतेच महागडी कार आणि मोबाईलच्या लालसेपायी तीन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एका ४४ वर्षीय व्यापा-याचा खून करण्याची धक्कादायक घटना (Nagpur crime news) नागपूरात घडली होती.यात ही आरोपींचे वय हे फार जास्त नव्हते.मात्र,वर्धमाननगर पुलावर मद्यधुंद व्यापारी सुचित भोजापुरे यांना मदत करण्याचा प्रयत्न या तिघांनी केला.नंतर आराेपींच्या मनात लालसा निर्माण झाली.मयतच्या डोक्यावर दगडाने त्यांनी सात वार केले व मृतदेह नग्न अवस्थेत खडगाव मार्गावरील श्‍मशान घाटाजवळील झाडीत फेकला.या ही रक्तरंजित घटनेचा अवघ्या १२ तासात पोलिस गुन्हे शाखेने उलगडा केला व तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
मयत अथर्व हा पलोटीसारख्या नामवंत शाळेत नववीत शिकत होता व त्याचे वडील दिलीप हे होलसेल भाजीपाला व्यवसायिक आहेत.त्यांच्या घराशेजारी असणारा आरोपी याच्या कुटूंबात आर्थिक चणचण असल्यानेच अथर्वच्या घरातील आर्थिक सुबत्ता त्याला खुणावली व झटपट श्रीमंत होण्यासाठी व कर्ज फेडण्यासाठी अपहरणासारखा उपाय त्याच्या डोक्यात शिरला.त्यांचा जरी मानस अथर्वची हत्या करण्याचा नसला तरी त्यांच्या हातून हत्येसारखे निघृण कृत्य घडले आहे आणि याची शिक्षा, संपूर्ण उमेदीचे वय तुरुंगातच घालवण्याची त्यांना मिळणार आहे.परिणामी,आजच्या टेक्नोसेव्ही युगातील तरुण पिढीवर पालकांना अधिक जास्त लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याची तज्ज्ञ सांगतात.
…………………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या