फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआयएमचा फतवा तुघलकी:तरुणामंध्ये रोष

आयएमचा फतवा तुघलकी:तरुणामंध्ये रोष

Advertisements

सोशल मिडीयावर केला निषेध

नागपूर,ता. १७ जून: डॉक्टर्सवर हल्ले करणा-यांना व त्यांच्या कोणात्याही नातेवाईकावर या पुढे शासकीय असो किवा खासगी कोणत्याही रुग्णालयात उपचार मिळणार नाही,असे वादग्रस्त विधान नुकतेच नागपूर आय.एम.ए चे अध्यक्ष् डॉ.संजय देवतळे यांनी पत्र परिषदेत केले होते,त्याविरोधात आज समाज माध्यमांमध्ये बराच रोष व्यक्त झाला.अश्या इशाऱ्यानंतर परिस्थिनुरूप कुणा डॉक्टरने रुग्णांवर उपचार करणे बंद केले आणि रुग्ण दगावला तर कायदा व सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण होईल आणि मग काय होईल याचा विचार फतवाकारांनी केला काय? ग्रामीण भागात आणि नक्षलग्रस्त भागात काय होईल याचा विचार केला काय? फतवाकारांनी हिंसाचाराची व्याख्या करतांना स्वतःच विसरले की उपचार न करणे हा सुद्धा एक प्रकारचा हिंसाचारच राहू शकतो,अश्‍या शब्दात नेटीझन्सने आपला संताप आज आभासी भिंतीवर व्यक्त केला.

कोरोना काळात काही डॉक्टरांनी केलेली लूटमार दिसत नाही आयएमच्या डॉक्टर्स मंडळीला?असा प्रश्‍न उपस्थित करीत
एखाद्या नातेवाईकाने हल्ला केला तर कायदा आहे त्यानुसार शिक्षा होईलच पण त्यासाठी बिचाऱ्या रुग्णांवर उपचारच करणार नाही असा धमकीवजा इशारा देऊन थयथयाट करणे व जनतेला प्रामाणिक डॉक्टरांच्या विरोधात भडकवणे माणुसकीला पटणारे नाही, असे खरमरीत बोल ही आएमएच्या अध्यक्ष्ांना सुनावण्यात आले.

हिम्मत असेल तर कट प्रैक्टिस बंद करून दाखवा,कराल ?? जे डॉक्टर रुग्णांना अक्षरशः लुटतात त्यांना रोखून दाखवा,रोखाल ?? त्यांचा दवाखाना बंद करून दाखवा!! त्यांची मान्यता रद्द करून दाखवा!! अरे त्यांच्या विरोधात साधे पत्रक तरी काढून दाखवा ना ??
असली धमकी,इशारा पद्धत हुकूमशाही सारखी वाटत आहेत.अश्या इशारांना कुणी खरा,उदात्त व्यवसायिक डॉक्टर भीक घालणार नाही हे मात्र नक्की,अशी देखील प्रतिक्रिया समाज माध्यमात उमटली.

डॉक्टर, तुम्ही पैसा कमवा. जरूर कमवा; पण भस्म्या रोग्यासारखा नको. डॉक्टर आपण सामान्य जनांसाठी देवच आहात.आणि आज देवांची पृथ्वीवरच अधिक गरज आहे.मात्र प्रामाणिकपणा,नैतिकता आणि सेवाधर्म काही व्यापारी वृत्तीच्या डॉक्टरांमुळे झाकोळून गेला आहे.आमचा निषेध त्या प्रवृत्तीला आहे डॉक्टरी पेशाला नाही,अशी प्रतिक्रिया नेटीझन्सने दिली.

डॉ.संजय देवतळे यांना आयएमचे अध्यक्ष् पद मिळताच त्यांना काही तरी सनसनाटी निर्माण करायची होती अशी देखील शंका अनेकांनी व्यक्त केली.पदाचे नाही तर किमान पेशाचे तरी गांर्भीय डॉ.देवतळे यांनी राखायला हवे असा ही सल्ला देण्यात आला.डॉक्टर्सवर हल्ला करणा-या हल्लेखोरांचे समर्थन नाहीच मात्र सुसंस्कृत समजल्या जाणा-या डॉक्टर्सच्या या भूमिकेचेही समर्थन मुळीच करता येत नसल्याची टिका समाज माध्यमावर आज चांगलीच उमटली.

पत्र परिषदेत डाॅ.देव यांनीच सांगितले डॉक्टरी पेशा हा बिजनेस आहे,त्यामुळे समाजाने देखील या पुढे डॉक्टर्स मंडळींना बिजनेसमॅन म्हणूनच आदर दय्ावा,जीव वाचवणारे देवदूत मानून पूर्वीसारखे ‘पूजू’ नये अशी खोचक टिका देखील आभासी भिंतींवर उमटली. यांना पैसा ही हवा आणि समाजात देवदूत म्हणून आदर ही हवा असे दुटप्पी धोरण या पुढे चालणार नाही,असा इशारा ही अनेकांनी दिला.अनेकांनी
#सेवाकार्य #कायदा #माणुसकी #डॉक्टर #लूट या हॅश टॅगखाली संपूर्ण बातमीच व्हायरल केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या