Homeनागपूर न्यूजआम आदमी पक्षातर्फे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची सोय

आम आदमी पक्षातर्फे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची सोय

 

नागपूर,ता. ९ मे: मेडिकल परिसरातील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने आज आम आदमी पक्षातर्फे मोफत जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) येथे नागपूर आणि नागपूर शहराच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागातून कोरोना उपचारासाठी रुग्ण येतात. त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक सुद्धा असतात. महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारीच्या काळात लावलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊन मुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ११ वाजेपर्यंतच सुरू असतात त्यामुळे या नातेवाईकांना दोन वेळच्या जेवणाची होणारी गैरव्यवस्था लक्षात घेता आप पक्षातर्फे त्यांच्या जेवणाची मोफत सेवा मेडिकल परिसरात करण्यात आली.

अश्या प्रकारे आम आदमी पक्षातर्फे रोज एक उपक्रम राबवून गरजूंना मदत पोहोचवल्या जात आहे.

मोफत जेवण वाटपाच्या या उपक्रमात पक्षाचे कार्यकर्ते सुरेंद्र समुंद्रे, संजय अनासाने, उमाकांत बनसोडे, निखिल मेंढवाड़े, संदीप कोल्हे, राजू शेंन्द्रे, रवि अहीरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest बातम्या