Homeनागपूर न्यूजआम आदमी पक्षातर्फे कोरोना रुग्णांसाठी मोफत ऑटो सेवा

आम आदमी पक्षातर्फे कोरोना रुग्णांसाठी मोफत ऑटो सेवा

नागपूर,ता. ८ मे: कोरोना महामारीच्या दुसऱ्या भयंकर लाटेमध्ये सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला आहे. अश्यातच आम आदमी पक्षातर्फे मदतीचा हात देण्यासाठी कोरोना रुग्णांना अंबुलन्स वेळेवर उपलब्ध होत नाही आणि झालीच तर अव्वाच्या सव्वा किंमत आकारली जाते. तेव्हा अश्या कठीण परिस्थितीत दिलासा म्हणून रुग्णांच्या घरून ते इस्पितळात पोहोचवून देण्यासाठी “आप” तर्फे निःशुल्क सेवा आजपासून मेडिकल चौक येथून सुरू करण्यात आली आहे.

त्याकरिता एक हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे.हेल्पलाईन नंबर 9545077222 / 9371474585
गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑटो सेवा सुरू करण्याप्रसंगी आपचे पदाधिकारी देवेंद्र वानखेडे, जगजीत सिंग, अशोक मिश्रा, प्रभात अग्रवाल, पीयूष आकरे, बाबा मेंढे, गिरीष, संजय अनासने, प्रतीक बावनकर, कृतल आकरे, अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Latest बातम्या