

हिंगणा,ता.२५ जानेवरी २०२४: राज्याच्या वन समितीवर आमदार समीर मेघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.समितीची प्रथम सभा आणि विकास कामांमधील वन विभागाशी संबंधित प्रश्नांवर मुंबई येथे बैठक घेण्यात आली.यामुळे जलजीवन मिशनच्या कामांना गती मिळणार आहे.
बैठकांमध्ये आमदार समीर मेघे यांनी मतदारसंघातील रस्ते सुधारणा,जलजीवन अभियानांतर्गतची विविध कामे,पांदण रस्ते,वनपर्यटनांशी संबंधित सोयी व सुविधा निर्माण करणे यापैकी जी कामे वन कायद्यांमुळे प्रलंबित राहिली आहेत,असे मुद्दे चर्चेत आणले.
त्याचप्रमाणे मतदारसंघातील बफर झोन अंतर्गतच्या गावांमध्ये मूलभूत सुविधा आणि वन्यप्राण्यांसाठी पिण्याचे पाणी यासारख्या बाबींवर सुद्धा चर्चा घडवून आणली.सभेत चर्चा करतानाच जलजीवन अभियानातील जी कामे वन कायद्या अंतर्गतच्या तरतुदीस अनुसरुन मंजुरीसाठी सादर आहेत,त्यावर तत्काळ निर्णय घेण्यात आले.
सर्वच प्रकरणांना प्राथमिक मंजुरी देण्यात आल्यामुळे जलजीवन अभियानातील कामे वेगाने पूर्णत्वास जाणार असल्याचे कळते.त्यात प्रामुख्याने डेगमा(खुर्द)ता.हिंगणा येथील नळ पाणी पूरवठा योजनेच्या विहीरीवरील विद्युत कनेक्शनचा प्रश्न मार्गी लावण्यात समीर मेघे यांना यश मिळाले आहे.
…………………………..




आमचे चॅनल subscribe करा
