फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआमदार संजय गायकवाडांच्या शिवसेना शाळेचे भुजबळ प्राचार्य

आमदार संजय गायकवाडांच्या शिवसेना शाळेचे भुजबळ प्राचार्य

Advertisements

 

आमदार गायकवाडांनी तात्काळ भुजबळांची माफी मागावी : प्रशांत पवार यांची मागणी

वरिष्ठांनी आदेश दिल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

नागपूर,ता.२ फेब्रुवारी २०२४: मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीची ज्वाला संपूर्ण महाराष्ट्रात पेटली असताना त्या विरोधात अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या न्याय हक्काच्या रक्षणासाठी शड्डू ठोकला आहे.या दोन्ही नेत्यांच्या वादात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उडी घेत, भुजबळ यांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रीमंडळाच्या बाहेर काढण्याची शिवराळ भाषा वापरल्याने चांगलाच वाद पेटला आहे.या पार्श्वभूमीवर नागपूरात अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते प्रशांत पवार यांना एका आंदोलनाच्या वेळी माध्यमकर्मींनी बोलते केले असता,छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे सर्वात वरिष्ठ नेते आहेत.मात्र,आमदार संजय गायकवाड यांची जी क्लिप व्हायरल झाली आहे,एका आमदारांनी एका ज्येष्ठ मंत्र्याविषयी अशी भाषा योग्य नसल्याची टिका प्रशांत पवार यांनी केली.

सर्वात महत्वाचं ज्या शाळेमध्ये आमदार संजय गायकवाड मोठे झाले त्या शाळेचे प्राचार्यच छगन भुजबळ असल्याची खरमरीत टिका प्रशांत पवार यांनी केली.भुजबळ हे कोणाबद्दलही अशी भाषा वापरत नाही.राजकीय मतभेद असू शकतात मात्र इतक्या खालच्या स्तरावर जाऊन अश्‍या प्रकारची शिविगाळ करणे हे आमदार पदाला शोभत नाही,निदान महाराष्ट्राच्या संस्कृतीत ते बसत नाही,असे ते म्हणाले.

त्यामुळे आमदार गायकवाड यांनी तात्काळ भुजबळांची माफी मागावी अन्यथा वरिष्ठांचे आदेश मिळताच आम्ही आमदार गायकवाड यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करु तसेच त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करु,असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला.

एकीकडे महायुतीची सरकार ही महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अग्रेसर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार जनतेसाठी,जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटून काम करीत आहेत,असे असताना दूधात मीठाचा खडा टाकण्याचा प्रकार आमदार गायकवाड यांना शोभले नाही,ते आमच्यासोबत महायुतीत आहेत हे त्यांनी विसरु नये,अशी आठवण त्यांनी करुन दिली.

याच फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन पार पडणार असून विधी मंडळ अधिवेशनात ते एकमेकांचा चेहरा बघणार आहेत,त्यामुळे आमदार गायकवाड यांनी तात्काळ छगन भुजबळ यांची माफी मागावी,अशी मागणी प्रशांत पवार यांनी पक्षाच्या वतीने केली.

आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी भुजबळ हे भाजपवासी होणार असल्याचे एक्सवर सारगर्भित ट्वीट केले,यावर प्रशांत पवार यांना छेडले असता,निवडणूकीची वेळ जवळ आली आहे,ज्याप्रमाणे पावसाळ्यात बेडूक जसे बाहेर निघतात त्याच धर्तीवर अंजली दमानिया बाहेर निघाल्या आहेत,अशी उपरोधिक टिका करीत,यावर भुजबळ यांनीच उत्तर दिले असून दमानिया यांना कूठून माहिती झाले ते भाजपवासी होणार आहेत हे मलाच माहिती नाही,असे उत्तर भुजबळांनी दिले आहे.दमानिया या ज्योतिष नाहीत.काहीतरी ब्लॅकमेलिंगचे काम करण्यासाठी दमानिया यांनी हा शगुफा सोडला असून त्यांना कोणी महत्व देत नाही,माध्यमांनी देखील त्यांना महत्व देऊ नये,असे विधान प्रशांत पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या