फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआमदार विकास ठाकरेंवर माझा नाही जनतेचा रोष!

आमदार विकास ठाकरेंवर माझा नाही जनतेचा रोष!

Advertisements


नाना पटोलेंच्या ७० टक्के समित्या बोगस

काँग्रेसचे माजी सचिव नरेंद्र जिचकार यांचा आरोप

जन आशिर्वाद यात्रेचा अवधी आणखी वाढवणार

नागपूर,१२ फेब्रुवरी २०२४: महाकाळकर सभागृहात माझ्यावर जो अन्याय झाला त्याची लढाई आजपर्यंत सुरू आहे. जन आशिर्वाद यात्रेदरम्यान पश्चिम नागपुरात मला लोकप्रतिनिधी असलेले यांच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचा मनात प्रचंड रोष दिसला,असे काँग्रेसचे माजी सचिव नरेंद्र जिचकार म्हणाले यावर हे लोकप्रतिनिधी विद्यमान काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आहेत का?तुमच्या बोलण्याचा रोख त्यांच्यावर आहे का? तुमचा रोष त्यांच्यावर आहे का?असा प्रश्न केला असता, हा माझा नाही जनतेचा रोष आहे असा दावा त्यांनी केला. आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याप्रसंगी बोलताना जिचकार म्हणाले,की पश्चिम नागपुरात लोकांना आपल्या लोक प्रतिनिधींकडून जे अपेक्षित काम आहे ती त्यांची कामे त्यांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधीकडून झालीच नाही गट्टूची कामे ही सर्वसामान्य लोकांची गरज नाही तर स्वच्छता, सोयीसुविधा, मूलभूत सुविधा ही कोणतीही गरज लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण केली नाही.त्यामुळेच माझी यात्रा ज्या ज्या भागात गेली

त्या त्या भागात मला पश्चिम नागपुरातील जनतेच्या अनेकविध तक्रारी ऐकू आल्या.अगदी लहान लहान गोष्टींसाठी देखील त्या भागातील जनतेला संघर्ष करावा लागत असून माझ्या जन आशिर्वाद यात्रेला तेथील जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळाला, असा दावा त्यांनी केला.

मागील दीड वर्षापासून महानगरपालिकेत नगरसेवक नाही, लोकप्रतिनिधी नाही यामुळे जनतेची कामे झालीच नाही. अनेक ठिकाणी गडर लाईन चोक आहेत, शौचालयांची स्थिती अतिशय दयनीय आहे ,जनतेचे हाल आहे. आम्ही जन आशिर्वाद यात्रा सुरू केली आणि संपूर्ण पश्चिम नागपूर पिंजून काढलं तेव्हा प्रत्यक्ष जनतेच्या अडचणींची, समस्यांची जाणीव झाली. जनतेच्या मनात खूप रोष आहे. जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे आम्ही जनतेचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न केला. शौचालये,स्वच्छतागृह,चोक गडर लाईन सुधारून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलाआणि जनतेचे खूप आशिर्वाद आमच्या जन आशिर्वाद यात्रेला मिळाला असे याप्रसंगी जिचकार यांनी सांगितले.पश्चिम नागपूरात वीज,पाणी,रस्ते या भीषण समस्या असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या यात्रेला मिळणारे यश बघून प्रतिस्पर्धी राजकारणी व्यक्तीच्या पुढाकाराने आमच्यावर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न झाला मात्र, आम्ही अशा कोणत्याही भेकड हल्ल्याला जुमानत नाही.

या जन आशिर्वाद यात्रेदरम्यानच आम्ही महात्मा गांधी यांची पुण्यतिथी यानिमित्त जन आशिर्वाद यात्रे सोबतच त्यादिवशी “सद्भावना” यात्रा काढली होती, त्या यात्रेला देखील पश्चिम नागपूरच्या जनतेचा भरगोस प्रतिसाद आम्हाला मिळाला. सर्वसामान्य जनतेसोबत अगदी झोपडपट्टीमध्ये जाऊन आम्ही एक चमचा साखर एक चमचा चहापत्ती घरोघरी गोळा करून चहाचा कार्यक्रम आयोजित केला या उपक्रमात सर्वधर्म जाती पंथाचे लोक सहभागी झाले होते,असे त्यांनी सांगितले.

आपापल्या अडचणींविषयी बोलताना,माझ्या सारख्या उच्च शिक्षित व्यक्तिनेच राजकारणात यावे,असे तेथील जनतेने मत असल्याचे जिचकार म्हणाले.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला इतकंच नव्हे तर,काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा देखील राजीनामा दिला, या घडामोडी कडे जिचकार कसे बघतात? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणारे आणि परत काँग्रेसमध्ये येणाऱ्यांना ज्या काँग्रेसमध्ये प्रदेश अध्यक्ष सारखे सर्वोच्च पद दिले जाते त्या पक्षात काँग्रेसवर निष्ठा असणाऱ्यांवर अन्याय होत आहे,मात्र अशोक चव्हाण यांच्या बाबतीत त्यांच्यावर अन्याय झाला असं म्हणता येणार नाही कारण, काँग्रेस पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदापासून अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषवण्याची संधी पक्षात दिली होती तरी देखील ज्या पक्षाचा अध्यक्ष हा भाजपमधून परत काँग्रेसमध्ये आला त्या पक्षात काहीही होणं अशक्य नाही. निष्ठावंत नाराज होणारच असा दावा जिचकार यांनी केला

याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जिचकार यांनी चांगलंच तोंड सुख घेतले. पटोले यांच्या निवडणुकीच्या वेळी ज्या समित्या गठित झाल्या होत्या त्यापैकी ७० टक्के समित्या या बोगस होत्या हे मी ऑन कॅमेरा अत्यंत जबाबदारीने सांगत आहे असा आरोप जिचकार यांनी केला. मी स्वतः एक महिन्यापासून जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. त्यामुळे माझा जन संपर्क विषयीचा अनुभव अतिशय समृद्ध झाला मात्र, पटोले यांच्या विषयी असं सांगता येईल का? असा प्रश्न त्यांनी केला. एका अर्थाने पटोले यांच्या जनसंपर्क यात्रे विषयी व अनुभवा विषयी जाहीरपणे जिचकार यांनी शंका व्यक्त केली.

पक्ष बैठकीच्या वेळी महाकाळकर सभागृहात माझ्यावरच हल्ला झाला यानंतर नागपूर शहर कमिटीने ठराव करून मला कारणे दाखवा नोटीस पाठवली मी त्या नोटीसला उत्तर देखील दिले व माझी बाजू मांडली मात्र,तरी देखील मला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली व यानंतर मला पक्षातून निष्कासित करण्यात आले. त्यामुळे माझ्यासमोर दोनच मार्ग होते. एक तर पक्ष बदलणे किंवा संघर्ष करणे मी दुसरा मार्ग निवडला,असे त्यांनी सांगितले.

मी एक उद्योगपती आहे माझा व्यवसाय आणि कामधंदे सोडून मागील दीड महिन्यापासून मी पश्चिम नागपूर आहे जन आशिर्वाद यात्रा काढली ते मी भाजपमध्ये जाण्यासाठी नव्हे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात जिचकार यांनी सांगितले.

पश्चिम नागपुरात जन आशिर्वाद यात्रा काढण्यामागील हेतू विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना आव्हान निर्माण करण्याचे किंवा स्वतः निवडणूक लढवण्याचा इरादा आहे का? या प्रश्नावर बोलताना, गेली अनेक दशके मी राजकारणात आहे, उद्योगपती असलो तरी मी राजकारणी आहे त्यामुळे राजकारणात काहीही अशक्य नाही असे सूचक उत्तर त्यांनी दिले.

……………………………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या