फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजआमदार विकास ठाकरेंनी नासुप्रचे विश्‍वस्त असताना पत्नीच्या नावे केले शंभर प्लॉट्स!

आमदार विकास ठाकरेंनी नासुप्रचे विश्‍वस्त असताना पत्नीच्या नावे केले शंभर प्लॉट्स!

Advertisements
पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरेंवर काँग्रेसचे माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांचा गंभीर आरोप

जीवाला धोका मात्र पोलिस आयुक्त व पोलिस विभाग निष्क्रिय:कमलेश चौधरी यांचा पत्रकर परिषदेत अरोप
सिटी सर्व्हे कार्यालयात आमदार विकास ठाकरे यांनी अधिका-यांना धमकावले: माजी पत्रकाराची ऑडियाे क्लिप केली व्हायरल
नागपूर,ता.७ जुलै २०२५: गेल्या काही महिन्यांपासून फुटाळा तलाव परिसरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांचे निवासस्थान,जनावरांचा गोठा तसेच व्यवसायिक वापर यावरुन राजकीय,प्रशासकीय व न्यायिक लढा सुरु आहे.काँग्रेसचे पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे व अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे हे माझ्याविरुद्ध हेतुपुरस्सर खोटा प्रचार करीत असल्याचा आरोप आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत कमलेश चौधरी यांनी केला.माझ्यावर फूटाळा येथील पाच एकर जमीन लाटण्याचा खोटा आरोप करणारे आमदार विकास ठाकरे हे नागपूर सुधार प्रन्यासचे विश्‍वस्त असताना पत्नीच्या नावे शेतजमीन असलेले तब्बल शंभर प्लॉट्स विकत घेतल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.त्या प्लॉट्सची यादी त्यांनी पत्रकारांना दिली.

(छायाचित्र : आ.विकास ठाकरे यांनी नासुप्रचे विश्‍वस्त असताना शंभर शेजमीनी प्लॉट्स म्हणून पत्नीच्या नावे केलेल्या प्लॉट्सची यादी)

आमदार विकास ठाकरे यांनी त्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग  करुन सिटी सर्व्हे कार्यालयातील साळूंखे, गणेश पारधी व शिरसाट नावाच्या अधिका-यांना, कार्यालयातील माझ्या मालमत्तेच्या अधिकृत नोंदणी रद्द करण्यासाठी धमक्या दिल्या असल्याचा आरोप चौधरी यांनी यावेळी केला.सिटी सर्व्हे कार्यालयात ज्वाला धोटे तसेच एका इंग्रजी दैनिकात वरिष्ठ पत्रकार असणारे माजी पत्रकार अंजया अनापार्थी यांची ऑडियोक्लिप त्यांनी पत्रकारांना ऐकवली.यात अनापार्थी हे विकास ठाकरे यांना सिटी सर्व्हे कार्यालयात बोलावण्यात आल्या नंतर, या तिन्ही अधिकाा-यांना कश्‍याप्रकारे आ.विकास ठाकरे यांनी धमकावले व त्यानंतर ते अधिकारी कश्‍याप्रकारे वरमले,याची आपापसात चर्चा करीत असल्याचे तब्बल ११ मिनिटांचे संभाषण ऐकू येत आहे.
फूटाळा येथील आमच्या पिढीजात मालमत्तेवर अनेकांचा डोळा असल्याचा आरोप यावेळी कमलेश चौधरी यांनी केला.फुटाळा वरील पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या बॉटनिकल गार्डनमध्ये २४ एकर जागेचा व्यवसायिक वापर करण्यात येत आहे.त्यासोबतच उर्वरित २७६ एकर जागा देखील एका मोठ्या नेत्याने लाटली आहे मात्र,मोठ्या नेत्यांचे अतिक्रमण प्रशासनाला व विरोधी पक्षाच्या आमदाराला दिसत नसून,शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून जो परिसर आमच्या चौधरी कुटूंबियांकडे आहे त्याला अतिक्रमणात दाखवत असल्याची टिका त्यांनी केली.
चौधरी कुटूंब या जागेवर गेल्या १४० वर्षांपासून राहत असून आमच्याकडील ब्रिटीशकालीन कागदपत्रात त्याची नोंद आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एखादा जागेवर २२ वर्षांपेक्षा अधिक काळ एखादे कुटूंबिय राहत असल्यास त्यांना त्या जागेवरुन हटवता येत नाही.ADverse Possession च्या कायद्यानुसार देखील चौधरी कुटूंबाचे या जागेवर स्वामित्व असल्याचा दावा त्यांनी केला.
१९८४ मध्ये फूटाळा येथील ५.५ एकर जागा ही माझे वडील स्व.दिलीप चौधरी कुटूंबियांच्या स्वामित्वाची दर्शविण्यात आली आहे.१९९३ साली न्यायालयाने देखील हे स्वामित्व मान्य केले आहे.१९८४साली पंजाबराव कृषि विद्यापीठाने दिलीप चौधरी व त्यांच्या कुटुंबियांवर या जागेसाठी दावा दाखल केला होता.६ सप्टेंबर १९८५ साली रिट पिटीशन क्र.RCS क्र.१०३८/१९८४ तहत नागपूरच्या कनिष्ठ विभागातील २० साव्या दिवाणी संयुक्त खंडपीठाने चौधरी कुटूंबाच्या बाजूने निर्णय दिला असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
यानंतर कृषि विद्यापीठाने या निर्णया विरोधात पुन्हा अपील केली.परंतु, ३ जुलै १९९३ रोजी पुन्हा चौधरी कुटूंबाच्या बाजूने निकाल देण्यात आला.१९८७ साली कृषि विद्यापीठाने पुन्हा RCS क्र.२१५४/१९८७ अन्वये याचिका दाखल केली जी १७ जानेवरी २०२४ रोजी न्यायालयाने पुन्हा फेटाळली.
२०१८ मध्ये या जमीनीची भूमापन कार्यालयाद्वारे मोजणी झाली व सर्व कायदेशीर कागदपत्रात या जमीनीचे हकदार चौधरी कुटूंब असल्याचे नमूद आहे.नियमानुसार जर कोणालाही जमीनीवरील स्वामित्व सिद्ध करायचे असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय, जमीनीवरील ताबा हटवला जाऊ शकत नाही.
असे असतानाही आ.विकास ठाकरे हे राजकीय पद व प्रशासकीय दबावाचा वापर करुन राजकीय वैर साधत असल्याचा आरोप कमलेश चौधरी यांनी केला.माझी राजकीय कारर्कीद संपविण्यासाठी ज्वाला धोटे यांच्या व इंग्रजी दैनिकाचा माजी वरिष्ठ पत्रकार अंजया अनापार्थी यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन विकास ठाकरे सूड उगवत असल्याचा आरोप याप्रसंगी कमलेश चौधरी यांनी केला.
भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांसोबत आ.विकास ठाकरे यांची आतील गाठभेट व गळाभेट असून आर्थिक व्यवहार देखील झाला असल्याचा धक्कादायक आरोप करीत, आ.विकास ठाकरे हे भाजपच्या इशा-यावर नागपूर शहरात काँग्रेस पक्षाची ताकत कमकुवत करीत असल्याचा गंभीर आरेाप त्यांनी केला.
याचाच एक भाग म्हणजे माझ्या विरोधात खोटी एफआयआर दाखल करण्यात आली व कारवाईसाठी प्रशासनावर दबाव आणण्यात आला.प्रशासनावर दबाव आणून फुटाळा येथील आमचे घर देखील पाडण्याचा प्रयत्न आ.विकास ठाकरे करीत आहे.यासाठी ज्वाला धोटे या महिलेचा ते वापर करीत आहे.मुळात ज्वाला धोटे यांच्या ‘अन्याय निवारण समिती’नावाच्या सामाजिक संस्थेची कोणतीही कायदेशीर नोंदणी धर्मादाय आयोगाकडे नाही,असा दावा त्यांनी केला.वाडी येथील ज्वाला धोटे यांचे स्वत:चे घर अनाधिकृत असून हाई टेंशन वीज तारांशी जुळलेले आहे,ज्यामुळे तेथून आवागमन करणारे नागरिक तसेच कर्मचा-यांचे प्राण धोक्यात आले असल्याचा आरोप कमलेश चौधरी यांनी केला.
महत्वाचे म्हणजे पंतप्रधान कार्यालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्या अनाधिकृत घरावर कारवाई करण्याचे आदेश झाले आहेत मात्र,प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.विशेष म्हणजे हाई टेंशन वीज प्रवाहाच्या खाली कोणतेही घर तसेच निर्माणकार्य नसावे असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत.तरी देखील उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करीत ज्वाला धोटे यांनी अनाधिकृत भूखंडावर घर बांधले,त्यांचे घर अनाधिकृत आहे हे सर्व प्रशासकीय अधिका-यांनाही माहिती आहे मात्र,कोणीही त्यांच्या घरावर बुलडोजर चालविण्याची हिंमत करीत नाही,असा आरोप कमलेश चौधरी यांनी केला.
पी.के जैन नावाच्या बिल्डरने २०२१ -२२ मध्ये ऐन करोनाच्या काळात लॉकडाऊनची संधी साधत, हजारी पहाड ते फ्रेंड्स कॉलनी दरम्यान असणारा डी.पी रोड त्याच्या टाऊनशिपला फायदा पोहोचविण्यासाठी बंद केला.परिणामी या भागातील नगरसेवक म्हणून मी येथील नागरिकांसांबत तीव्र आंदोलन केले व जैन बिल्डरच्या मनमानीला चाप बसवित नागरिकांसह मी तो डी.पी.रोड पुन्हा खुला केला.जैन बिल्डरच्या मनमानीमुळे ज्या मध्यमवर्गीयांनी या भागात घर बांधण्यासाठी प्लॉट्स विकत घेऊन ठेवले होते,त्यांच्या प्लॉट्सचा दर शून्यावर आला कारण डी.पी.रोड बंद झाल्याने येथील नागरिकांना दीड किलोमीटरचा फेरा मारुन झोपडपट्टीतून यावे लागत होते! ज्वाला धोटे यांनी त्या बिल्डरसोबत या प्रकरणी वाटाघाटी करण्याची बोलणी केली होती,याच संदर्भात त्या माझ्या घरी देखील आल्या होत्या. मात्र,माझ्या आंदोलनानंतर या प्रकरणात त्यांची भूमिकाच संपली, आर्थिक नुकसानीमुळे, तेव्हापासून त्यांना माझ्याशी वैयक्तिक शत्रूत्व असल्याचे कमलेश चौधरी यांनी सांगितले. माझ्या स्वर्गीय वडीलांच्या ४५ वर्षांचे व माझे स्वत:चे १८ वर्षांचे राजकारणात आम्ही जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढत असल्याचे चौधरी यांनी सांगितले. मी तीन वेळ नगरसेवक म्हणून निवडून आलो असून दोन वेळा मी आपल्या प्रभाग १२ मधून अपक्ष निवडून आलो असल्याचे ते सांगतात.
आता नगर भूमापन कार्यालयात ज्वाला धोटे व अंजया अनापार्थी यांना पाठवून अधिका-यांना धमकावून,प्रसंगी लालूच दाखवून कार्यालयातील चौधरी कुटूंबियांच्या फूटाळा येथील नोंदीमध्ये फेरफार करण्याचे आदेश आ.विकास ठाकरे यांनी दिले असल्याचा आरोप याप्रसंगी कमलेश चौधरी यांनी केला.त्यांनी ऐकवलेल्या ध्वनिफितमध्ये,मी आमदार आहे,जेवढे सांगितले तेवढे काम करा,असे ठाकरे म्हणाले असल्याचा आरोप कमलेश चौधरी यांनी केला.आमदार असल्याचा लाभ घेत, भूमापन कार्यालयातील अधिकारी,माफसूचे अधिकारी,मनपाचे अधिकारी व पोलिस अधिकारी यांना ठाकरे धमकावित असल्याचा आरोप चौधरी यांनी केला.भूमापन कार्यालयातील मालमत्ताची कागदपत्रे बनावट असल्याचा दावा करण्यास अधिका-यांना भाग पाडत असल्याचा,कागदपत्रांवर ओवर राईटिंग करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला.सर्टिफाईड कॉपी चौधरी कुटूंबियांकडे असताना, भूमापन कार्यालयातील दस्तावेजांवर किती ही खाडाखोड त्यांनी केली तरी न्यायालयात ते सत्यता सिद्ध करु शकणार नसल्याचा दावा कमलेश चौधरी यांनी केला.
मी स्वत: तीन वेळा पोलिसांना जिवितेचे संरक्ष् ण मागितले,पोलिस आयुक्तांना देखील लेखी निवेदन दिले मात्र,मुख्यमंत्र्यांच्याच गृहनगरात त्यांचा पोलिस विभाग एका माजी नगरसेवकाला,लेखी निवेदन देऊनसुद्धा, पाेलिस संरक्षण देण्यास धजत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदार असण्याचा व नासुप्रचे विश्‍वस्त असण्याचा गैरफायदा आ.ठाकरे यांनी घेतला. जिथे सामान्य नागरिकांकडे रजिस्ट्री असतानाही डिमांड आल्यावर आर.एल काढण्यास किती चपला घासाव्या लागतात.जिथे फक्त कब्जा पत्रावरुन आ.ठाकरे यांनी पत्नीच्या नावे तब्बल शंभर प्लॉट्स नावावर केले असल्याचा आरोप कमलेश चौधरी यांनी केला.या कागदपत्रात वी.वी.ठाकरे याचा अर्थ आ.ठाकरे यांची पत्नी वीणा ठाकरे यांच्या नावासमोर एक ‘डॉट’ही न देता लगेच एस.एन बोरडे जे भाजपचे जुने ओबीसीचे नेते आहेत तसेच स्वत:नासुप्रमधील अधिकारी इंगळे यांच्या पत्नी पी.वी.इंगळेंच्या नावावर हे प्लॉट्स असल्याचे सांगून त्या शंभर प्लॉट्सची यादीच याप्रसंगी कमलेश चौधरी यांनी पत्रकारांना दिली.
आ.विकास ठाकरे यांनी नागपूर शहरात भाजपसोबत मिळून काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचे षडयंत्र बंद केले नाही तर,भाजप नेत्यांसोबत त्यांचे आर्थिक व्यवहार व इतर पुरावे वेळोवेळी माध्यमांसमोर उजागर करण्याचा इशारा याप्रसंगी कमलेश चौधरी यांनी आ.विकास ठाकरे यांना दिला.
‘सत्ताधीश’ने यावर आ.विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क केला असता,त्यांचा संपर्क क्रमांक बंद होता.
…………………………………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या