फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआमदार निवासातील विजनवासात राहणा-यांची व्यथा:माणूसकीचा व्यवहार करा

आमदार निवासातील विजनवासात राहणा-यांची व्यथा:माणूसकीचा व्यवहार करा

Advertisements

जेवण देऊ नका ची पण स्वच्छता द्या ; पोलिसही ‘दूर रहो,इधर मत आना’म्हणून झिडकारतात

नागपूर: करोना विषाणूने संपूर्ण जगाला भयक्रांत केले असताना विदेशातून नागपूरमध्ये येणा-या प्रवाश्‍यांना मात्र करोनापेक्ष्ाही, आमदार निवासातील त्यांच्या १४ दिवसांच्या सक्तीच्या विजनवासाने भयक्रांत केले आहे.काल रात्री तीन वाजता दोया मधून आलेल्या एका नागपूरच्या नागरिकाला विमानतळावरुन सरळ आमदार निवासात सक्तीच्या निगरानीखाली ठेवण्यात आले,४८ तास त्यांना आमदार निवासात राहवे लागणार आहे, त्यांच्यात कोणतीही लक्ष् णे आढळून न आल्यास त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळणार आहे मात्र अद्याप २४ तास ही होत नाही तर शासनाने राखलेल्या ‘चमकोगिरी ’ बडदास्तीने हे प्रवाशी हादरुन गेले आहेत.

हा प्रवाशी कोलंबियाच्या मेक्सीम शहरातून पाच तासांचा प्रवास करुन मायामीला पोहोचला.चार तास मायामी तर जवळपास साढे तीन तासांचा प्रवास करुन दोहा येथे पोहोचला. दोहा येथून १३ तासांचा प्रवास करुन नागपूर विमानतळावर रात्री दीड वाजता त्यांचे आगमन झाले. आगमन झाल्यावर देखील मध्यरात्री चार तास त्यांना व इतर सहप्रवाश्‍यांना विमानतळावरच बसमध्ये बसवून ठेवण्यात आले. त्यांनी याचे कारण विचारले असता दूसर-या विमानांच्या प्रवाश्‍यांची वाट बघितली जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. या प्रवाश्‍याने तब्बल आठ तास विविध विमानतळावर घालवले होते,एकूण ४० तासांच्या प्रवासानंतरही चार तास त्यांना विमानतळावर बसमध्ये बसवून ठेवण्यात आले. बसमध्ये एका बिजनेस क्लासमधील तरुणीहीला बसवण्यात आले मात्र तिने ओक्साबोक्सी रडायला सुरवात केल्यामुळे तिला घरातील विजनवासात राहण्याची परवानगी देण्यात आल्याचे कळतेय.विमानतळावरच या प्रवाश्‍यांशी असणारी प्रशासनाची वागणूक एखाद्या गुन्हेगाराला जशी दिली जाते अशी वागणूक देण्यात अाल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्यासोबत बोलल्या जाणारी भाषा,वागणूक ही आत्मसन्माला ठेच पोहोचवणारी होती,असे भावनिक उद् गार या प्रवाश्‍याने काढले.

आमदार निवासात विदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी जी व्यवस्था करण्यात आली ती म्हणजे अस्वच्छेता कहर असल्याचे या प्रवाश्‍याने सांगितले. या प्रवाश्‍याने त्याला ठेवण्यात आलेल्या खोलीचे अनेक फोटाे व एक व्हिडियो व्हायरल केले.

आम्हाला स्वत:ला कुटुंबाची व समाजाची काळजी-
माझा स्वत:चा फॉर्म हाऊस हा नागपूरपासून ६ किलोमीटर दूर आहे. विमानतळावरुन मी स्वत: फॉर्म हाऊसवर जाणार होतो.मला आपल्या कुटुंबाला व समाजाला कोणत्याहीप्रकारे संकटात टाकायचे नाही,आम्हाला आपल्या राष्ट्रीय कर्तव्यांची एक सुशिक्ष्ति नागरिक म्हणून जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. सख्खा भाऊ भेटायला आला तेव्हा पोलिसांनी त्याच्यासोबत ही वाईट व्यवहार केल्याची तक्रार त्यांनी मांडली.‘उधर ही रहना..इधर मत आओ’म्हणून हिडीसफिडीस केले.‘जी नही भरा क्या?’इनका मोबाईल ही बंद कर देना चाहीये,अश्‍या शब्दात असंवेदनशील वागणूक देण्यात आली. इतक्या दिवसांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती शहरात, प्रशासन, सुरक्ष्ेच्या नावाने प्रवाश्‍यांना बंदिस्त करते,तेव्हा थोडी तर संवेदनशीलता प्रशासन आणि पोलिसांनी दाखवावी,अशी रास्त अपेक्ष्ा त्यांनी व्यक्त केली. एकदाच काय ते तुमचे नियम आम्हाला सांगून तरी द्या,आम्ही सगळे नियम पाळू मात्र गुन्हेगारांसारखी वागणूक प्रशासनाने आणि पाेलिसांनी आम्हाला देऊ नये, कारण आम्ही देखील या देशाचे एक जवाबदार नागरिक आहोत,अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.

आमदार निवासातील खोली म्हणजे करोना १०० टक्के होणार-
आम्हाला करोनाचा संसर्ग झाला नसेल तरी अश्‍या खोलीत राहून नक्कीच सर्दी आणि इतर रोग होणार अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आमदार निवासातील त्यांच्या खोलीची फर्शी ही पुसल्याच गेली नाही.चूकूनही विना चप्पलने पाय ठेवला तर एका सेंकदात तळपाय काळे होतील.खिडक्यांवर धूळीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे वारंवार शिंका येतात.मच्छरांनी जीव हैराण केले मात्र प्रशासनाने आम्हाला ‘हिट’ वापरण्यास दिले,ज्याची मला एलर्जी आहे. बेडवरील चादर अाणि उश्‍यांचे अभ्रे हे अतिशय घाणेरडे व मळलेले आहेत. टॉवेल देखील अनहायजेनिकच्या सबबीखाली स्वत:चा वापरु दिला जात नाही,त्यांचा टॉवेलही अतिशय घाणेरडा आहे. टॉयलेटचा फ्लश ओढला तर पाणी सर्व बाहेर पडतं.एक डेटॉल,एक कोलगेट,वेक्सीन आणि एक हिट दिल्या गेले मात्र ते ठेवायचे कुठे?बाथरुमध्ये कोणतीही सुविधा नाही.

डोरबेल बंद!परिणामी अन्नही खराब होतं-
अनेक खोल्यांच्या डोरबेल या बंद आहेत त्यामुळे जेवण घेऊन येणारा मूलगा हा कधी डबा बाहेर ठेऊन जातो,हे देखील कळत नाही.फळांचे देखील तेच हाल आहे.बेल वाजत नसल्याने कळत नाही,आणि फळ हे खराब झालेले असतात.विशेष म्हणजे सर्व फ्लोरवर ,नागपूर प्रशासनाचा बंदिस्त विजनवासात ठेवण्यात आलेल्या या प्रवाश्‍यांसाठीचे जेवण हे एका दोरीने ओढत आणले जाते. फर्श्या इतक्या घाणेरड्या आहेत की दाेरीने ओढत जे डबे आणले जातात त्यातच करोनाचे विषाणू पडत असावे असा संताप देखील या प्रवाश्‍याने व्यक्त केला.
आम्हाला जेवण नका देऊ पण स्वच्छ जगणं द्या आणि माणूसकीची वागणूक द्या बस एवढीच आमची मागणी असल्याचे या प्रवाश्‍याने सांगितले. मी स्वत: मोठ्या पदावरील अधिकारी आहे,मी असा काय गुन्हा केला की मला कैद्यांपेक्ष्ाही वाईट वागणूक दिली जात आहे?प्रशासनाला काही बोलायला गेले तर ‘हमको मत सिखाओ’अशी उर्मट भाषा वापरली जाते.

मोदींनी एकदाच काय ते विदेशातून आलेल्या नागरिकांसाठी ‘शिक्ष्ा’ निर्धारित करावी,१४ दिवस नाही आम्ही १४ महिनेही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत मात्र आमच्या त्रासामुळे आमचे कुटुंबिय ही अतिशय दूखी आणि व्यथित झाले असल्याचे दू:खं या प्रवाश्‍याने व्यक्त केले. किमान प्रशासनाने तरी आमदार निवासात ठेवण्यात आलेल्या प्रवाश्‍यांची उत्तम व चांगली व्यवस्था ठेवली असल्याचे पत्र परिषदांमध्ये सांगणे बंद करावे,अशी चीड देखील त्यांनी व्यक्त केली.

करोना संशयित प्रवाश्‍यांचे आमदार निवासासारख्या भागात अशी दयनीय अवस्था आहे तर…मेयो आणि मेडीकलमध्ये ठेवण्यात आलेले संशयित यांची काय अवस्था असेल?असा प्रश्‍न आता नागपूरकरांनाही पडला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या