फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजआमदार अभिजित वंजारी यांच्या पुढकाराने मिळाला पंधराशे युवकांना रोजगार

आमदार अभिजित वंजारी यांच्या पुढकाराने मिळाला पंधराशे युवकांना रोजगार

Advertisements

‘मेगा जॉब फेअर’उपक्रमाचे यश

नागपूर,ता.८ नोव्हेंबर २०२२: गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने ‘मेगा जॉब फेअर’ चे आयोजन काल सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी जगनाडे चौकातील हॉटेल रिजेन्टा येथे करण्यात आले होते.या उपक्रमात देशभरातील प्रतिथयश व नामांकित अश्‍या ५० कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता तर दहा हजार पेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली होती.या उपक्रमात तीन हजार युवांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या.त्यापैकी पंधराशे विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळण्यास आमदार अभिजित वंजारी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून अश्‍या प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतील असे त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.

या उपक्रमासाठी संपूर्ण विदर्भातून दहा हजार पेक्षा जास्त युवांनी नोंदणी केली होती.क्षमते अभावी नोंदणी थांबवावी लागली असल्याचे अभिजित वंजारी यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना अभिजित वंजारी म्हणाले,की विदर्भाच्या तरुणांमध्ये अफाट क्षमता,ृकल्पकता आणि सर्जनशीलतेची एक नैसर्गिक वृत्ती आहे.त्यांच्यात उच्च आकांक्षा असून धोरण,कौशल्य व तंत्रज्ञनाचा उपयोग करुन त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात रुपांतरीत करण्यासाठी फक्त संधीची आवश्‍यकता असते.

विदर्भातील नागपूर पदवीधर मतदासंघातील सहाही जिल्ह्यांमध्ये अश्‍याच स्वरुपाचे रोजगार व स्वयंरोजगार मेळावे आयोजित करण्याचा मानस ही त्यांनी व्यक्त केला.

या रोजगार मेळाव्याला वंजारी ग्रुप्स ऑफ इंन्टिटयुशनचे संचालक डॉ.हेमंत सोनारे,कमला नेहरु महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप बडवाईक,उपप्राचार्य डॉ.प्रदीप दहीकर,कमला नेहरु फार्मसीचे डॉ.जगदशी बाहेती,गोविंदराव वंजारी इंजिनिअरिंग कॉलेजचचे प्राचार्य डॉ.सलिम चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

या कंपन्यांचा होता सहभाग-

AXIS BANK, DIFUSION ENGINEERING, DTDC, HDFC LIFE, JABIL, LOGOSKIM SOLUTION, ELITE GENERAL,ORIS TECHNOLOGIES, PHIAN INFOTECH, TATA MOTORS, TRUST SOFTWARE,
LIGHT HOUSE, LAXMIAGNI, VENKYS, DHAN INFOTECH, FUKOKU INDIA LTD,
ALACRITY SOLUTION, BAIDYANATH, DINSHAWS, ENDURANCE, JUST DIAL, OPPO,
BSA CORPORATION, HARMAN INTEWRNATIONAL, BLUE DART, MAGNETIC
MARELLI MOTHERSON, ECLERX DIGITRON, PAVNA GROUP, PCI ANANLYTICS,
YOGANANDA GRAPHICS, ARTEFACT PROJECT, INNOVATIVE, MEDIAN HOTEL,
REDIA GUARD, REDIANT GUARD, RENETA PRECISION, ROYAL WEBTECH,
SANVIJAY ROLLING, SUMAX, SYNTEL, VAIBHV ENTERPRSE, RANATA, MERIDIAN
INN, INDORAMA, DHOOT TRANSMISSIONS, BAJAJ STEEL INDUSTRIS, RSB
TRANSMISSION, TAL, UCN, DIFUSSION, ALACRITY, GITPL, TRUFORM, JV RESUME
INDIA, INFOLINK CMGC INDIA, ORANGE BITS, GATTI, BAJAJ REINFORSMENT,
ENDURANCE SOLUTIONS, PHIAN, MARELLI, ATOS SYNT.

……………………………………………………………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या