

नागपूर,ता. १४ एप्रिल २०२२: राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी बुधवारी(ता.१३)शहरातील मध्सवर्ती कारागृहातील महिला कैद्यांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी महिला कैद्यांची व्यवस्था व उपाययोजनांबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायद्या १९९३ अन्वये कलम १०(१)अंतर्गत कारागृह तसेच सुधार गृह जिथे महिला कैद्यांना ठेवण्यात येतं त्या ठिकाणी आवश्यक सुधारणा व उपाय योजनांच्या निरीक्षणासाठी महिला आयोगाच्या सदस्यांना जाने क्रमप्राप्त आहे.
राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी यावेळी कारागृहात महिला कैद्यांना मिळणारे भोजन,झोपण्याची व्यवस्था,स्नानागृह,शौचालये,महिला कर्मचा-यांसोबत अधिकारी व कर्मचा-यांचा व्यवहार,न्यायालयीन प्रकरणात वकील मिळत नसलेल्या कैद्यांना त्याची सोय करुन देणे,त्यांच्या मुलांचे पालनपोषण,शिक्षणाची व्यवस्था,आरोग्य या विषयी माहिती घेतली.

याशिवाय त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.येथील मध्यवर्ती कारागृहात ७८ महिला कैद्यांचा समावेश आहे.यासोबतच ५ वर्षांच्या खालील ७ लहान मुले आहेत.आभा पांडे या वेळी अनेक महिला कैद्यांसोबत व्यक्तिगत संवाद ही साधला.जिवनात जो काही गुन्हा घडला असेल तो एक अपघात होता,जुने सगळे विसरुन नव्या जिवनाला सुरवात करण्याची आवाहन त्यांनी महिला कैद्यांना केले.तुरुंगातील वेळेचा देखील महिलांनी सदुपयोग करावा,शिका,अभ्यास करा,योग,ध्यान व धर्माला आत्मसात करण्याची प्रेरणा त्यांनी दिली.
याप्रसंगी आभा पांडे यांनी संपूर्ण कारागृह प्रशासन तसेच मध्यवर्ती कारागृहाच्या अधिक्षक दिपा वैभव यांच्या कामाचे कौतूक केले.दिपा यांचे कारागृहातील महिला कैदी व त्यांच्या मुलांसाठीचे चोख कर्तव्य बजावणे याचे आभा पांडे यांनी विशेष कौतूक केले.
यावेळी त्यांनी महिला कैद्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी महिला कैद्यांसोबत जेवण ही केले.
याप्रसंगी कारागृह अधीक्षक दिपा आगे,महिला व बाल कल्याण अधिकारी अपर्णा कोल्हे,प्रकल्प अधिकारी आरती मानकर,तुरुंग अधिकारी ,अहिरे,माया धतुरे.गुल्हाने,,विधी सल्लागार सुवर्णा धनकुटे,संरक्षण अधिकारी सुनिल माहूरे,जिल्हा परिक्षक अधिकारी चंद्रकांत बोंडे तसेच जिल्हा समन्वयक अनिल रेवतकर आदी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
