Advertisements

बाजपेयी-आडवाणींनी देखील ऐकले होते तिचे किंचाळणे

इंदिरा गांधींच्या ‘घोषित’आणिबाणिने राजकीय नेतेच नव्हे तर कलाकारांचाही केळा छळ
‘अघोषित ’आणिबाणिचे बळी गुजरात कॅडरचे अधिकारी संजीव भट ही सडत आहेत तुरुंगात
देशातील विरोधी पक्ष मूग गिळून गप्प:सत्ताधारी आणिबाणिच्या सुवर्ण महोत्सवात दंग
नागपूर,ता.२५ जून २०२५: भारताच्या संवैधानिक इतिहासाचे एक काळे पान म्हणजे देशावर २५ जून १९७५ रोजी लादण्यात आलेली आणिबाणि.त्या काळ्याकुट्ट इतिहासाला पन्नास वर्ष झाली.देशातील केंद्रीय सत्ताधा-यांद्वारे तसेच भाजपची सत्ता असणा-या राज्यात आणिबाणिच्या दिवसाविरोधात काँग्रेसवर प्रहार करणा-या कार्यक्रमांची उधळण झाली तर देशातील गलितगात्र विरोधी पक्ष हा विद्यमान सरकारच्या धोरणांविरुद्ध आक्रमक असलेला दिसून पडत नाही.या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा हे कारण असू शकतं मात्र,देशाचे संविधान गुंडाळून अर्निबंध सत्ता आपल्या हातात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतली होती व संपूर्ण देशाला छळ-छावणीत बदलले होते,हा या देशातच्या इतिहासातले एक असे काळे पान आहे,ज्याची दर वर्षी २५ जून रोजी भाजपा देशवासियांसमोर उजळणी करीत असते.
गेल्या पन्नास वर्षात देशात मिसा कानून लागू झाल्यावर झालेली राजकीय नेत्यांची व विरोधकांची धरपकड,तुरुंगातील हालअपेष्टा,राजकीय परिणाम इत्यादीवर भरभरुन लिहल्या गेले आहे.याच श्रृंखलेत सर्वस्वी निर्दोष असणारी कन्नड चित्रपटातील एक नावाजलेली अभिनेत्री स्नेहलता हिला झालेली अटक,तुरुंगात झालेले तिचे हाल,बसलेला मानसिक धक्का,कुटूंबिय,मुलांच्या आठवणीने कंठलेले अतिशय दु:खाचे दिवस,तुरुंगात जडलेला रोग व शेवटी मृत्यूने केलेली सुटका,सोशल मिडीयावर या अभिनेत्रीची कथा ही खूप व्हायरल झाली असून लाखो नेटीझन्सनी आणिबाणिचे हे गंभीर स्वरुप या अभिनेत्रीच्या माध्यमातून अनुभवली.
आंध्रप्रदेशमध्ये १९३२ साली जन्म झालेल्या स्नेहलता रेड्डी ही कन्नड चित्रपटातील एक नावाजलेली अभिनेत्री होती.त्यांची नात जुई कुमार रेड्डीने आणिबाणिच्या काळात घडलेल्या त्यांच्या विषयीच्या घटना समाज माध्यमांवर शेअर केल्या. असे म्हटले जाते स्नेहलता व समाजवादी विचारसरणीचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते.आणिबाणिच्या काळात जॉर्ज फर्नांडिस हे भूमिगत झाले होते.पोलिस त्यांचा शोध घेत होती.त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी स्नेहलता यांना तुरुंगात डांबले.यासाठी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.२ मे १९७६ रोजी डायनामाईट केसअंतर्गत त्यांना अटक करुन बेंगलुरुच्या तुरुंगात डांबण्यात आले.तुरुंगात त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला.त्यांना एका अगदी लहानशा बैरकमध्ये ठेवण्यात आले.त्याच बैरकच्या एका कोप-यात त्यांना स्वत:चे मल-मूत्र विर्सजन करावे लागत होते.परिणामी,इतक्या दूषित वातावरणातून त्यांना अस्थमाने गाठले.त्यांना जमिनीवर झोपावे लागत होते.१९ महिने देशात आणिबाणि लागू होती.
स्नेहलता यांनी अभिनयाशिवाय अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती.याशिवाय त्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या.याच कार्यातून त्यांची जॉर्ज फर्नांडिससोबत ओळख झाली होती.त्यांनी कन्नड,तेलुगु सिनेमा तसेच तेलुगु नाटकांत देखील बरेच काम केले होते.त्यांचे लग्न कवि,गणितज्ञ आणि चित्रपट दिग्दर्शक पट्टाभि रामा रेड्डी यांच्यासोबत झाले होते.हे दाम्पत्य स्वातंत्र्य सेनानी डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या विचारांच्याप्रति समर्पित होते.त्यांना दोन अपत्ये होती.

स्नेहलता यांच्यावर आरोप ठेवण्यात आले की त्या डायनामाईटनी (विस्फोटक) दिल्लीचे संसद भवन आणि इतर मुख्य इमारतींना धमाका करुन उडविणार होत्या!मात्र,त्यांच्यावर एक ही आरोप सिद्ध होऊ शकला नाही.‘मँनेटेनेंस ऑफ इंटरनल सिक्योरिटी एक्ट‘(मीसा)अंतर्गत त्यांना तुरुंगातच डांबून ठेवण्यात आले.मीसा कायदा हाच तो कायदा होता ज्या अंतर्गत देशात कोणालाही उचलून तुरुंगात डांबण्यात आले होते.
कुलदीप नैयर लिखित ‘इमरजेंसी रिटोल्ड‘मध्येही स्नेहलता रेड्डी यांच्यासोबत तुरुंगातील अत्याचारांविषयी सविस्तर लिहले आहे.ती इतकी लहान कोठडी होती ज्यात फक्त एकच व्यक्ती राहू शकत होती.याच कोठडीत एका कोप-या एक लहानसे छिद्र होते ज्यात तिला मल-मूत्र विसर्जन करावे लागत होते.संपूर्ण ८ महिने स्नेहलता अश्या एका गुन्ह्यात त्या नरकयातना सहन करीत होत्या जो गुन्हा त्यांनी कधीच केलाच नाही!स्नेहलता यांच्या बॅरकच्या बाजूच्या बॅरकमध्येच अटल बिहारी बाजपेयी व लालकृष्ण आडवाणी कैदेत होते.फार नंतर त्यांनी सांगितले,त्यांना नेहमी बॅरकमधून एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज येत होता!त्या कन्नड अभिनेत्री स्नेहलता रेड्डी होत्या हे त्यांना फार नंतर कळले.
त्या अस्थमाच्या रुग्ण झाल्यावरही त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाही उलट तुरुंगात त्यांना वेगवेगळ्याप्रकारे फार कठोर शासन केले जात राहीले.खूप जास्त प्रकृती बिघडल्यानंतर १५ जानेवरी १९७७ रोजी त्यांना पैरोलवर सोडण्यात आले.मात्र,पाच दिवसांनीच २० जानेवरी रोजी त्यांचा मृत्यू झाला!अस्थमा असतानाही अंगावर एक ही वस्त्र न ठेवता बॅरकच्या गार फर्शीवर झोपायला लावत असे.उपचारासाठी तिला मोहताज करण्यात आले.तिला ते जगणे असह्य झाले होते.आपल्या डायरीत तिने कारागृहातील भयाण जगणे नमूद केले.वेदनेने ती तळमळत राहीली.ओरडत राहीली.किंचाळत राहीली मात्र,आणिबाणिच्या त्या क्रूर काळाला तिच्या अगतिकतेची कोणतीही दया आलीच नाही.पॅरोलवर सोडल्यानंतर तिच्या कुटूंबियांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले त्यावेळी देखील पोलिसांनी तिचा मानसिक छळवाद केला.तिला परत त्यांच्या कैदेत जायचे नव्हते त्या नरकयातना भोगण्यापेक्षा त्या गुणी अभिनेत्रीने जगाचाच निरोप घेणे पसंद केले व ह्दयघाताने,तुरुंगातून पॅरोलवर सुटल्यानंतर अवघ्या पाच दिवसातच तिचा मृत्यू झाला.
माजी केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी देखील संसदेत स्नेहलता रेड्डी यांची ही चित्तथराक दास्तान मांडली होती.यावर ट्रोलर्सनी मणिपूरमधील दोन निष्पाप महिलांची नग्न धिंड काढण्यावर भाजपला घेरले.
यातूनच विषय निघाला तो गुजरातमधील पोलिस दलातील अधिकारी संजीव भट्ट यांचा.त्यांनी २००२ साली गुजरात दंगलीत तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.भट्ट हे तेव्हा जगाच्या नजरेत आले जेव्हा त्यांनी मोदी यांच्या गुजरात दंगलीच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवत न्यायालयात अहवाल सादर केला होता.नंतर एसआयटीने या आरोपांना खारिज केले होते.
भट्ट हे डिसेंबर १९९९ ते सप्टेंबर २००२ दरम्यान गांधीनगरमध्ये स्टेट इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये डिप्टी कमिश्नर होते.गोधरा हत्याकांडनंतर ते मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जवाबदारी देखील सांभाळत होते.गुजरात दंगली नंतर सप्टेंबर २००२ मध्ये भट्ट यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला मोदी यांच्या भाषणांची रेकॉर्डिंग दिली होती.यानंतर त्यांची बदली करण्यात आली.
भट्ट यांच्यावर २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित खोटे पुरावे निर्माण करण्याचा, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड तसेच गुजरातचे माजी पोलिस महानिदेशक आर.बी.श्रीकुमार यांच्यासोबत आरोप दाखल करण्यात आले.गुजरात सरकारने भट्ट यांना पोलिस सेवेतून देखील बेदखल केले.या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जी फेटाळण्यात आली.
यानंतर जामनगर येथे पोलिस सेवेत असताना १९९० मध्ये पोलिस कोठडीत एका आरोपीच्या मृत्यूचा आरोप भट्ट यांच्यावर करण्यात आला.या आरोपाखाली त्यांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली असून,१९९६ मध्ये पालनपुरमध्ये राजस्थानच्या एका वकीलाला फसविण्यासाठी अम्ली पदार्थ ठेवण्याच्या आरोपात त्यांना गेल्या वर्षी मार्च २०२४ मध्ये २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून सध्या ते राजकोटच्या मध्यवर्ती तुरुंगात बंद आहेत.

१९९४ मध्ये शस्त्रास्त्रे हस्गतच्या एका प्रकरणात एकूण २२ आरोपींना अटक करण्यात आली होती.त्यातील एक आरोपी नारन जादव याने ६ जुलै१९९७ रोजी न्यायालयात भट्ट यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.त्याने पोलिस कोठडीत भट्ट तसेच हवालदार वजुभाई चौ यांनी टेररिस्ट ॲण्ड डिसरप्टिव एक्ट(टाडा)तसेच शस्त्रास्त्रे कायद्यांतर्ग कबुलनाम्यासाठी अन्वित छळ केल्याची तक्रार केली.पोरबंदर पोलिसांनी ५ जुलै १९९७ रोजी ट्रांसफर वारंटवर जादव यांना अहमदाबादच्या साबरमती तुरुंगातून भट्ट यांच्या घरी घेऊन गेली होती. जिथे जादव यांच्या गुप्तांगावर तसेच शरीराच्या इतर भागांना वीजेचे झटके देण्यात आले.जादव याच्या मुलाला देखील वीजेचे झटके देण्यात आले.जादव याच्या या आरोपांवर न्यायालयाने यावर चौकशीचे आदेश दिले होते.न्यायालयाने ३१ डिसेंबर १९९८ रोजी गुन्हा दाखल करुन संजीव भट्ट व हवालदार चौ याच्या विरोधात समन जारी केले.
गंमत म्हणजे १५ एिप्रल २०१३ रोजी न्यायालयाने या इतक्या जुन्या प्रकरणात भट्ट व हवालदार चौ यांच्या विराेधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले!चौ याच्या मृत्यूनंतर हे प्रकरण थंड बसत्यात गेले होते मात्र,२००२ च्या गुजरात दंगलीनंतर मोदी यांच्या विरोधात संजीव भट्ट यांनी भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा पाय फूटले व सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.गुजरातच्या पोरबंदर न्यायालयाने सात महिन्यांपूर्वी भट्ट यांची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे.
याचिकाकर्ता हा त्याच्या विरुद्ध भट्ट याने गुन्हा कबूल करण्यासाठी टॉर्चर केल्याचा आरोप सिद्ध करु शकला नाही तसेच भट्ट हे त्यावेळी पोलिस अधिकारी होते,असे असताना त्यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी कायदेशीररित्या परवानग्या घेण्यात आल्या नाही,असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाने नोंदवले व या आरोपातून भट्ट यांची निर्दोष मुक्तता केली मात्र,१९९० च्या आरोपात मिळालेली तुरुंगाची शिक्षा अद्याप ते भोगत आहे.
थोडक्यात,तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ व २६ जूनच्या मध्यरात्री देशात आणिबाणिचीची ऑल इंडिया रेडियोवर घोषणा केली होती.मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात ‘अघोषित’ आणिबाणि देशात लागू असल्याचे सांगून, माझे वडील हे राजकीय सूडाचे बळी ठरल्याचे भट्ट यांची कन्या आकाशी भट्ट या जागतिक पटलावर सांगत आहेत.आकाशी भट्ट या ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयात पोस्ट डॉक्टरल फेलो आहेत.
…………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
