

नागपूर,ता.१३ एप्रिल २०२४: लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचा सामना करण्यासाठी भारतातील दोन डझनहून अधिक राजकीय पक्षांनी मागच्या वर्षी जुलैमध्ये एका आघाडीची स्थापना केली.प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पार्टी सोबतच सर्व प्रादेशिक पक्षांचा या आघाडीमध्ये समावेश आहे.’इंडिया’ अलायन्स म्हणजेच ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स‘ असं नाव त्याला देण्यात आलं आहे.
घटक पक्षांमधील एकजूट आणि जागावाटपाशी संबंधित करारावर या आघाडीचं यश अवलंबून आहे.जेणेकरुन एका जागेवर एक उमेदवार उभा करुन भाजपला टक्कर देता येईल.
त्याचाच भाग म्हणून नागपूर लोकसभेसाठी आम आदमी पार्टी आपल्या लोकसभेच्या निवडणूक प्रचाराचा पक्ष पातळीवर शुभारंभ करण्यात आला. नागपूरात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना आप ने पाठींबा जाहीर केला.

या प्रचाराचे दोन भाग आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये ‘हर घर दस्तक’या उपक्रमातून दहा हजार लोकांपर्यंत प्रत्येक प्रभागात या पाच दिवसांमध्ये पोहोचणे.
आम आदमी पक्षाची वार रूम ही प्रत्येक विधानसभा नुसार असेल. या देशाची लोकशाही डिटेक्टर शिप पासून वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी पूर्ण प्रयत्न करेल,अशी ग्वाही आपच्या पदाधिका-यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
७०७०२३७०७० या क्रमांकावर द्या मिसकॉल-
यावेळी आम आदमी पार्टीने एक मिस कॉल नंबर देखील जाहीर केला. ७०७०२३७०७०. या मिस कॉल नंबरच्या माध्यमातून आम आदमी पार्टी नागपूरच्या जनतेशी संवाद साधेल. येणाऱ्या पाच दिवसांमध्ये या नंबरच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रोत्साहित करणारे व इंडिया अलाईन्सला वोट देणारे अभियान राबवल्या जातील,अशी माहिती त्यांनी दिली.
……………………..




आमचे चॅनल subscribe करा
