फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमआता वकील सांगतात पोलिसांना कलम ३०७ लावू नका!

आता वकील सांगतात पोलिसांना कलम ३०७ लावू नका!

Advertisements

२२ वर्षीय विवाहितेला सासरच्यांनी एसिड टाकून जाळले

शापित सौंदर्याच्या साम्राज्ञीची मेडीकलमध्ये वेदनेशी झुंज

हूंड्यासाठी राक्षसी कृत्य: यवतमाळ पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप

नागपूर,ता.९ ऑक्टोबर २०२३: पिडीता ही फक्त २२ वर्षांची असून मूळची गुजरात येथील आहे.अतिशय सर्वसामान्य कुटूंबातील व रोजमजुरी करणा-या ५५ वर्षीय ,राहणार संजय नगर,बारडोली.जि.सुरत गुजरात येथील गृहस्थाची, पिडीता ही कन्या आहे. याच वर्षी मे २०२३ मध्ये तिचा विवाह यवतमाळ येथील भारत नगरी भोसा रोड,अवधूतवाडी यवतमाळ येथील असलम इसराईल शेख या ३० वर्षीय आरोपीसोबत विवाह झाला होता.

लग्नाच्या एका महिन्यानंतरच हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यास आरोपींनी सुरु केले.छोट्या छोट्या कारणांवरुन पिडीतेचा छळ केला जात होता.माहेरवरुन सोन्याची अंगठी नाही दिली,भेटवस्तू नाही दिल्या इत्यादी बाबींसाठी तिचा सातत्याने छळ केला जात होता.तिला मारहाणीसोबतच उपाशी ठेवले जाऊ लागले.चार महिन्यातच पिडीतेची शारीरिक अवस्था अत्यंत वाईट झाली. २१ सप्टेंबर २०२३ राेजी रात्री ११ वाजता पिडीतेचे हात पाय सासू व पतीने धरुन ठेवले व नणद व नणदोईने पिडीतेच्या चेह-्यावर ज्वलनशील पदार्थ ओतले.यात ती पूर्णत भाजून निघाली.पिडीतेचा चेहरा,मान व छातीला यामुळे गंभीर इजा झाली.

फिर्यादी वडीलांच्या मोठ्या मुलाच्या मोबाईलवर त्याचा साळा राहणार आर्वि,जि.वर्धा याचा फोन आला की पिडीतेची परिस्थिती पाहून घ्यावी.त्यांनी पिडीतेचे घर गाठून सासरच्यांना चांगलेच ठणकावले.यानंतर दुस-या दिवशी पिडीतेला सकाळी ११ वाजता २२ सप्टेंबर रोजी यवतमाळ येथील कँसर रुग्णालय असेलेले लाईफ लाईन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले व आरोपी फरार झाले.

पिडीतेचे वडील २३ सप्टेंबर रोजी यवतमाळ येथे पोहोचले.या घटनेची माहीती मुस्लिम काकर समजाच्या व्हॉट्स ग्रूपवर व्हायरल होताच,समाजातील काही समाज सेवींनी पुढाकार घेऊन पिडीतेला नागपूरच्या मेडीकल रुग्णालयात २३ सप्टेंबर रोजी दाखल केले.

महत्वाचे म्हणजे लग्नाच्या एक महिन्यापूर्वींच पिडीतेच्या वडीलांकडून लाखांचा हूंडा आरोपी कुटूंबाने घेतला असतानाही, अशा लोभी कुटूंबामध्ये आपली मुलगी देण्याची कृती म्हणजे, छातीवरचे ओझे उतरुन फेकण्याचा प्रकार असल्याची टिका आता होत आहे.फिर्यादी यांना एक मुलगा असून त्याचे शिक्षण सुरु ठेवण्यात आले मात्र पिडीता ही मुलगी असल्याने किंवा परिस्थितीचे कारण सांगून तिला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे परिणाम,अशा कितीतरी घटनांद्वारे समोर येत असतात.पिडीता ही केवळ चौथी पर्यंत शिकली असल्याची कबूली तिच्या वडीलांनीच दिली असून,सासरची माणसेही तिला ‘अनपढ’म्हणून हिणवत होती,हे विशेष.

पती,सासू सफिया शेख वय वर्ष ५५,नणद रुखसार शेख वय वर्ष २८,नणदोई हलीम वय वर्ष ३४ यांच्या विरोधात यवतमाळ येथील पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून अद्याप फक्त पती व सासरे यांनाच अटक झाली आहे.सासू,नणद,नणदोई तसेच नणदोईचा मोठा भाऊ हबीब हे अद्याप फरार आहेत.

पिडीतेचा नवरा हा दारुच्या गाडीवर वाहनचालक असल्याने त्याची पोलिसांमध्ये चांगलीच पैठ असल्याचा आरोप केला जात आहे.यामुळेच पिडीतेला गंभीररित्या जाळल्यानंतर ही तब्बल १२ तास ती वेदनेने विव्हळत असताना तिला माणूसकी म्हणून किवा नियमाप्रमाणे उपचार मिळाले नाही.

हूंडा प्रतिबंध कायद्यानुसार तसेच सर्वोच्च न्यायलयाचे स्पष्ट निर्देश असताना पिडीता ही ३५ वर्षा खालील असेल तसेच तिच्या विवाहाला ६ महिन्यांचा अवधी झाला नसेल तर डीवायएसपी स्तरावरील पोलिस आधिका-याने २४ तासांच्या आता पिडीतेपर्यंत पोहोचणे व संपूर्ण चौकशी करने बंधनकारक आहे.पिडीतेला आरोपींनी कँसर रुग्णालयात दाखल केले त्याच वेळी रुग्णालयाने मेडीकल लिगल केस (एमएलसी) पोलिसांकडे पाठवणे बंधनकारक असताना,रुग्णालयाची भूमिका देखील संशयाच्या भोव-यात अडकली आहे.नियमानुसार २४ तासांच्या आत पिडीतेच्या आई-वडीलांना घटनेची माहिती देणे बंधनकारक असताना या घटनेत पिडीतेच्या वडीलांना दोन दिवसांचा अवधी पिडीतेपर्यंत पोहोचायला लागला….!

या घटनेत पीएसआय स्तरावरील पोलिस अधिकारी याने सुरवातीला गुन्हा नोंदविण्यासच नकार दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले!समाजाच्या दबाबानंतर दोन दिवसांनंतर गुन्हा नोंदवण्यात आला.यात ही पोलिसांनी कलम ३०७ लावलीच नाही.याविषयी विचारले असता पिडीतेच्या एका नातेवाईक वकीलानेच पोलिसांना सांगितले की या केसमध्ये कलम ३०७ म्हणजे ‘जीवाने मारण्याचा प्रयत्न’ही कलम लाऊ नका….!याचा अर्थ आता महाराष्ट्रातील पोलिस हे कुण्या वकीलांच्या सांगण्यावरुन कलम ३०७ दाखल करावे की नाही,असा निर्णय घेण्याचा नवा पायंडा पाडत आहे,असेच म्हणावे लागेल.

यवतमाळ पोलिसांचा पिडीतेप्रति घडलेल्या क्राेर्याप्रति संवेदनशून्य व्यवहार बघता समाजातील तरुणाईने पुसदचे काँग्रेसचे आमदार, वक्फ बोर्डचे अध्यक्ष तसेच अल्पसंख्यांक समुदायाचे अध्यक्ष वझाहत मिर्झा यांना या घटनेची माहिती दिली.त्यांनी एसपीला कॉल केला.एसपीने २४ तासात कलम ३०७ दाखल करतो म्हणून मिर्झा यांना आश्‍वासन दिले.सर्वच आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले मात्र गुन्हा घडून एक महिना वीस दिवसांचा कालावधी लोटून देखील फक्त पिडीतेचा नवरा व सासरे यांनाच अटक झाली.इतर सर्व आरोपी हे ‘कानून के लंबे हात’असूनसुद्धा पोलिसांच्या लेखी ‘फरार’आहेत व हबीब (नणदोईचा मोठा भाऊ)याच्या साम,दाम,दंड,भेद नीतीतून अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्नात असल्याचा आरोप पिडीतेचे नातेवाईक करीत आहेत.

नावेद सौदागर तसेच जावेद काकर या सेवाव्रती गृहस्थांनी सातत्याने पिडीतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.यासाठी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांना देखील फोन करुन घटनेची माहिती दिली.अबू आझमी यांनी देखील यवतमाळच्या एसपीसोबत संवाद साधला.नागपूरात असणा-या राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी देखील या घटनेची दखल घेत मेडीकलमध्ये उपचार घेणा-या पिडीतेची भेट घेतली.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात अवघ्या २२ वर्षीय पिडीता जीवघेण्या वेदनेने विव्हळत असून, न्यायाची मागणी करीत आहे.फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांना देखील यासंबंधी लवकरच निवेदन देणार असल्याचे नावेद सौदागर सांगतात.यवतमाळचे एसपी व पीएसआय यांच्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.कायद्याप्रमाणे हूंडा बळीच्या घटनेत योग्य तपास न करणा-या तपास अधिका-यांवर आरोप सिद्ध झाल्यास दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.महाराष्ट्रात अद्याप या कायद्याचा वापर बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे.परिणामी,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत तपासात हलगर्जी करणा-या तसेच ‘अर्थपूर्ण ’व्यवहारातून आरोपींना पाठीशी घालणारी कृती केल्याचे सिद्ध झाल्यास, आरोपी पोलिसांवर कठाेर कारवाईची मागणी केली जात आहे.

मेडीकलमधील डॉक्टारांचे म्हणने आहे,पिडीतेवर एसिड अटॅक झाला नाही मात्र इतर ज्वलनशील पदार्थामुळे पिडीतेचा चेहरा,मान व छातीला गंभीर इजा झाली आहे.कायदाप्रमाणे ॲसिड अटॅक सारखाच गुन्हा इतर कोणत्याही ज्वलनशील पदार्थाबाबतही लागू होतो कारण पिडीतेला यामुळे इजा झालेली असते,असे ॲड.शिल्पा गिरडकर यांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना सांगितले.कायदाप्रमाणे ज्वलनशील पदार्थ विकण्यास बंदी असताना आरोपींनी ज्या दूकानदाराकडून हा पदार्थ विकत घेतला त्या दूकानदारालाही १९९९ च्या पॉयझन एक्टनुसार पोलिसांनी कायदेशीररित्या अटक करावी,अशी मागणी ॲड.गिरडकर यांनी केली.

एका मानवाधिकार संघटनेने देखील मेडीकलमध्ये उपचार घेणा-या पिडीतेची भेट घेऊन सर्वतोपरी मदत देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

मुस्लिम काकर समुदायातील व्हॉट्स ॲप ग्रूपवर पिडीतेची माहिती व्हायरल झाल्यामुळे समाजातील दोन संवेदशनशील माणसे ही पिडीतेच्या कायदेशीर व वैद्यकीय मदतीसाठी सरसावली,तांत्रिक प्रगतीचा हा एक फायदाच म्हणावा लागेल,मात्र अशा किती तरी पिडीता मानवी लोभाला बळी पडून, हुंडाबळीतून अकाली जग सोडून निघून गेल्या,अनेक तरुणी कायमच्या अधू व दिव्यांग झाल्या,आयुष्याचे आघात मनावर सोसत असताना न्यायाची पहीलीच पायरी असणा-या पोलिसी यंत्रणेलाही आता संवेदनशील होणे तितकेच गरजेचे आहे,असेच आता म्हणावे लागेल.

…………………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या