फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआता ग्रंथालये,अभ्यासिका खासगी संस्थेच्या ताब्यात!

आता ग्रंथालये,अभ्यासिका खासगी संस्थेच्या ताब्यात!

Advertisements

स्थायी समितीचा प्रस्तावावर शिक्कामोतर्ब

नागपूर,ता. २५ फेब्रुवरी: नुकतेच मनपाच्या उद्यान विभागाद्वारे शहरातील उद्याने ही नागरिकांसाठी स:शुल्क करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता मात्र नागरिकांच्या तीव्र रोषासमोर मनपा प्रशासनाला नमते घेत हा प्रस्ताव मागे घ्यावा लागला.आता मात्र शहरातील ग्रंथालये व अभ्यासिका या खासगी संस्थांना चालविण्यास देण्याच्या प्रस्तावास आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली असून एकूण ४३ संस्थांचे अर्ज पात्र ठरले असल्याची माहिती स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष् पिंटू झलके यांनी मनपा मुख्यालयात आयोजित पत्र परिषदेत दिली.

ज्ञानलोक योजनेअंतर्गत १९ ग्रंथालये व ७७ अध्ययन केंद्र नाेंदणीकृत खासगी संस्थांना संचालन करण्यास देण्यासंबधी ऑन लाईन अर्ज बोलविण्यात आले होते.यामध्ये एकूण ६८ संस्थांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २५ अर्ज अपात्र ठरले तर ४३ संस्थांचे अर्ज पात्र ठरले.या संस्थांना पुढील ३ वर्षांसाठी ग्रंथालये तसेच अध्य्यन केंद्रांचे संचालन करण्यासाठी मान्यता मिळणार आहे.यासाठी २,०६,८२,००० रुपये अपेक्ष्ीत खर्चाला मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

याशिवाय २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बीओक्यू मध्ये अस्तित्वात असलेल्या पाईप लाईन बदलविणे तसेच नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी ७८ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून सभागृहाच्या मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येईल,अशी माहिती झलके यांनी दिली.महत्वाचे म्हणजे ऑरेंज सिटी वॉटर(आेसीडब्ल्यू)सोबत झालेल्या कंत्राटामध्येच या अटी व शर्थी मंजूर असताना ८८.८३ कोटींचा वेगळा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यामागील हेतू याबाबतचे गूढ कायम आहे.

सामुदायिक मुत्रीघरांसाठी वाढीव खर्च-
शहरातील सामुदायिक शौचालये मुत्रीघरे(सिमेंट क्रांकिट व फायबर)यांत्रिकी पद्धतीने देखभाली व साफसफाईकरीता २ वर्षांच्या कालावधीसाठी नवीन निविदा मागवण्यात आल्याची माहिती पिंटू झलके यांनी दिली.यावर पुन्हा कोट्यावधींचा खर्च हाेणार असून मनपाने सफाई ऐवजदारांची संख्या आधीच वाढवली आहे.त्यांच्यावरील खर्चाशिवाय पुन्हा नवीन कंत्राट सामुदायिक शौचालये व मुत्रीघरांसाठी ‘ब्रिक्स’कंपनीला देण्यात आला.हा १ कोटींचा खर्च नागपूरकर नागरिकांच्याच भुर्दंडी बसणार असल्याने मग मनपामध्ये वाढीव ऐवजदार कोणते काम करतात?असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या