

(छायाचित्र – स्वयंसेवी संस्थेचे सेवक महापौरांशी वाद घालताना)
मेयाेमधील घटनेची करीत होता व्हिडीयोग्राफी
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २९ मार्च: शहराचे प्रथम नागरिक महापौर दयाशंकर तिवारी हे सध्या शहरातील वाढत्या करेाना प्रकरोपामुळे चिंताग्रस्त असून नागपूरकरांना या महामारीपासून दिलासा देण्यासाठी व अनेकांची मरणापासून सुटका करण्यासाठी दिवसरात्र कार्यरत आहेत,अशीच एक ‘धावती‘भेट त्यांनी परवा नागपूर जिल्ह्याचे मध्यवर्ती शासकीय रुग्णालय व गाेर,गरीब,गरजूंचे आशास्थान असणा-या मेयो रुग्णालयात दिली.अधिक्ष् क डॉ.अजय केवलिया यांच्यासोबत चर्चा करीत असतानाच एका स्वयंसेवी संस्थेचे युवक हे करोना बाधिताला उपचारासाठी मेयोमध्ये घेऊन आले असता अनेक तास बाधिताला तातकळत बसावे लागले,कहर तर तेव्हा झाला जेव्हा अनेक तास या बाधिताला भर्ती व्हायाला एखादी खाट तर मिळालीच नाही मात्र बसायला एखादी साधी खूर्ची ही तिथे उपलब्ध झाली नसल्याने या स्वयंसेवी संस्थेच्या तरुणाईचा माथा भडकला.
त्यांनी मेयोेचे अधिक्ष् क डॉ.केवलिया यांच्यावर आगपाखड करण्यास सुरवात केली,महापौर देखील घटनेच्या वेळी तिथेच उपस्थित होते,मनपाचे काही डॉक्टर्स मेयोमध्ये सेवा देणार असल्याचा उपक्रम राबविण्यासाठी ते तिथे हजर होते.इलेक्ट्रोनिक माध्यमातील दोन पत्रकार ही तिथे महापौरांची ‘बातमी’कवर करण्यासाठी गेले होते,मात्र त्यापैकी एका पत्रकाराने ही घटनाच व्हिडीयोमध्ये कैद केली.
डॉ.केवलिया यांनी लागलीच महापौरांच्या कानात पत्रकार हा व्हिडीयो काढत असल्याचे सांगितले आणि लागलीच महापौरांचा ‘नेहमीप्रमाणेच‘ भडका उडाला!
त्या पत्रकारावर ओरडतच महापौरांनी ‘व्हिडयो बनाके ये तुमने अच्छा नही किया’असा दम दिला!.इतर सहकर्मींना लागलीच महापौरांच्या ‘गुस्स्याचा’ हा किस्सा कळाला.स्वयंसेवी संस्थेची तरुण मुले ही चांगलीच भडकली होती.आमचं कोणतही नातं या करोना बाधितासोबत नाही,आम्ही फक्त माणूसकीच्या नात्याने त्यांना या शासकीय रुग्णालयात भर्ती करण्यास आलो,उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास केवलिया हे परत आणून देणार आहेत का रुग्णांना?असा संतप्त सवाल त्यांनी केला.
खरे तर शहरातील प्रथम नागरिक यांनाच हा सवाल डॉ.केविलिया यांना करणे गरजेचे असताना ते त्या तरुणाईवर व पत्रकारावर भडकले.नुकतेच महापौर यांच्या पत्नीला करोनाचा संसर्ग झाला.त्यापूर्वी महापौरांच्या ९६ वर्षीय मातोश्री यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता,त्यांच्यावर मेयोमध्येच उपचार करण्यात आले मात्र सामान्य रुग्णावर उपचाराची वेळ येते तेव्हा याच शासकीय मेयो रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना घंटो तातकळत बसल्यानंतरही साधी बसण्यास एक खूर्चीही मिळू नये!ते ही महापौर तिथेच उपस्थित असताना,यावर माध्यमात बरीच चर्चा झडली.करोनामुळे संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेवरच भयंकर ताण पडला आहे,अपुरी व्यवस्था आहे.डॉक्टर्स आणि कर्मचा-यांचा तुटवडा आहे,यामुळे डॉ.केवलिया व महापौरांची चिडचिड होणेही स्वाभाविक आहे मात्र यात सर्वसामान्य रुग्णांचा काय दोष?
७० पैकी ५७ वर्ष या देशात काँग्रेसचे एकछत्री राज्य होते,यानंतर २०१४ पासून लई भारी व संपूर्ण बहूमताचे दिल्लीत भारतीय जनता पक्ष्ाचे राज्य प्रस्थापित झाले मात्र या सरकारने देखील देशाच्या एकूण अर्थसंकल्पात आरोग्य सारख्या मूलभूत गरजेसाठी फक्त २ टक्के निधी ठेवला?
करोनाचे तर उलट आभार मानले पाहीजे या विषाणूने सरकारी अनास्थेची पाेल खाेलून ठेवली.महानगरपालिका या देखील जनतेच्या प्राथमिक आरोग्याची काळजी वाहण्यासाठीच कोट्यावधीचा आस्थापना खर्च उधळते अश्यावेळी रुग्णांनी बघावे तरी कोणाकडे?
या पूर्वी देखील विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये मध्य नागपूरात ‘चुनावी आखाडा‘ एका संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला असता मंचावरच महापौरांनी भर कार्यक्रमात एका पत्रकाराच्या मुस्काटीत हाणून दिली,एका महिला पत्रकाराच्या हातातून कार्यकर्त्यांना सांगून मोबाईल फोन हिसकला व त्यामधील व्हिडीयो डिलिट केले.हा व्हिडीयो आज ही यू-ट्यूबवर सर्वाधिक व्यूव्हर्सचा रेकॉर्ड धारण करुन आहे हे विशेष!
आज होळीच्या दिवशी दूपारी मेयोमधून आपल्या आप्त स्वकीयांचे दोन मृतदेह घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाची काहीली होत होती मात्र शवागारात स्टाफच नव्हता!डॉ.केवलिया यांना फोन फिरवला असता मी १५ मिनिटात पोहोचत असल्याचे उत्तर पत्रकाराला मिळाले.ते न पोहोचता त्यांचा स्टाफ मात्र पोहोचला,यानंतर झोनकडून शववाहिकेची वाट,अंत्यसंस्काराच्या अत्यंत पीडादायक क्ष् णांमधून नातेवाईकांची होणारी वाटचाल,याचा आम पब्लिकला संताप नाही येत का महापौर साहेब?
महापौरांचा संताप खासगी रुग्णालयातील ‘लृटमारु’कारभारावर का निघत नाही?शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालये हाऊस फूल झाल्याने आता नागपूरकर चक्क कामठीच्या एका नामांकित हॉस्पीटलपर्यंत धाव घेत आहे!तीन महिन्यांपूर्वी आयसीयूचे दर १५ हजार असताना आज त्या रुग्णालयात आयसीयूचा दर हा दररोजचा ३५ हजार झाला आहे!गेल्या १० दिवसांपासून एक नागपूरकर पत्रकार आपल्या सास-यांचा उपचार तिथे करीत असून आता त्या कुटुंबाची आर्थिक दानत संपली.तेथील डॉक्टरांना ते कधी बरे होतील?त्यांना जनरल वार्डमध्ये कधी शिफ्ट करणार?असा प्रश्न विचारला असता,उमर्टपणे उत्तर मिळतं,कितीही दिवस लागू शकतात,सांगता येत नाही.
जनरल वार्डमध्ये ठेऊ शकत नाही,नसेल उपचार परवडत तर घेऊन जा रुग्णाला!मात्र आता पर्यंत ७-८ लाखांचा चुराडा झाला त्याचे काय?नागपूर असो किवा कुठलेही खासगी रुग्णालय,यांनी करोना महामारीचा फायदा घेत रुग्णांची लृट चालविली आहे,हे बघून महापौरांना संताप का नाही येत?
एकेका खासगी रुग्णालयात नोटांची मशीन लागली आहे पैसे मोजायला,दररोजची कमाई ही ५० लाखांच्या वर आहे,कुठे आहेत महानगररपालिकेचे ऑडीटर?मुंढेंच्या काळात होते ते महापौरांच्या काळात कुठे गायब झाले?हा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना छळतो आहे.केंद्र सरकारचा नियम आहे खासगी रुग्णालयांनी दरफलक दर्शनी भागावर लावावा,महापौरांनी किती खासगी रुग्णालयावर धाड टाकून असा दर फलक न लावण्यासाठी त्यांना दंडित केले?
सर्वात भयंकर बाब म्हणजे करोना काळात सर्वसामान्य जनतेच्या लृटीसाठी टपून बसलेल्या अनेक खासगी रुग्णालयात त्यांच्याचकडे स्टाफ नसल्यामुळे आता तर १४-१४ वर्षांच्या परिचारिका आढळून येतात आहेत!कधी दिले यांना प्रशिक्ष् ण?शासनाच्या नियमात हे बसतं का?महापौर शहरातील खासगी रुग्णालयांचा स्टाफ तपासतील का?खासगी रुग्णालयाचे व्यवस्थापक हे कश्याप्रकारे नागपूर शहराच्या नागरिकांना उर्मटेतेची वागणूक देऊन उलट मुजोरी करतात,त्यांचा ‘माज‘महापौर साहेब उतरवणार का?असा सवाल विचारला जात आहे.
नागपूरकर नागरिकांना मनपा प्रशासनाने वा-यावर सोडले आहे हे जनतेनेही स्वीकारले आहे मात्र दररोज करोनासंबधी ‘चमकोगिरी’वृत्त प्रसिद्ध होतात तेव्हा मात्र जनतेचा संताप रास्त नसतो का?
ऑस्ट्रेलिया व कनाडामधील एका परिचिताने सांगितल्याप्रमाणे त्या देशात कडक लॉक डाऊनचा अर्थ असतो प्रत्येक नागरिकाच्या घरी धान्य सरकारने पोहोचवणे!तसा तो दिला जात आहे त्यामुळे त्या देशातील नागरिक घराबाहेर पडतच नाही.भारतात लॉक डाऊनचा अर्थ आहे ‘भूकेने मरा मात्र घरातच रहा!‘काम नसल्यामुळे अर्धे शहर भूकेने मरतंय,महापौरांना याचा संताप येत नाही का?
आता शहरातील प्रत्येक खासगी रुग्णालयाला फक्त कोविड रुग्णालय होण्याची का लालसा आहे?इतर आजारांच्या रुग्णांनी कुठे जावे?महापालिकेच्याच पाचपावली येथील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन खाटांची व्यवस्था असताना ते धूळखात पडले आहेत,या केंद्रात ८६ खाटा उपलब्ध असूनही नागपूरकर जनतेला त्याचा कोणताही उपयोग होत नाही,महापौरांना याचा संताप येत नाही का?
मुंढे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी या ८६ ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात आली होती.मात्र कर्मचारीच नसल्यामुळे हे केंद्र धूळ खात पडलं आहे आणि महापौर हे मेयोमध्ये मनपा दवाखान्यातील डॉक्टर्स आता सेवा देणार याची दवंडी पिटतात तेव्हा महापौरांवरच नागरिकांचा संताप उद् भवणे रास्त नाही का?
महापौरांना जर खरंच जनतेच्या जिवाची काळजी आहे तर त्यांनी ‘जुगाड‘पत्रकारिता करीत नसणा-या पत्रकारांना धमकावू नये व शहरातील खासगी रुग्णालयांची तपासणी करुन जनतेची या लृटीपासून सुटका करावी,फक्त एलॅक्सीस व व्होकहार्ट या दोन रुग्णालयांना तीन महीन्यांपूर्वी ७६ लाखांचा दंड ठोठावून जमाना बितला,यानंतर किती खासगी रुग्णालयंावर काय कारवाई झाली?याची माहीती या शहराचा प्रथम नागरिक म्हणून जनतेला द्यावी,अशी अपेक्ष्ा व्यक्त केली जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
