

ज्येष्ठ गझल गायिका बिना चॅटर्जी सुखरुप
नागपूर,ता. ११ सप्टेंबर: सध्या करोना महामारीच्या काळात कोणाच्या व्हाटॅस ॲपवर कशी बातमी येऊन धडकेल,याची प्रत्येकाने चांगलीच धास्ती घेतली आहे. अशीच एक घटना आज नागपूरच्या कलाकार विश्वात अनावधाने घडली. नागपूर आकाशवाणीच्या ‘अ’दर्जाच्या गायिका व एका शाळेतील संगीत शिक्ष्ि का असणा-या शहरातील ज्येष्ठ गझल गायिका बिना चॅटर्जी यांचा व्हिडीयो अनेकांच्या व्हाॅटस ॲपवर व्हायरल झाला,त्यात त्यांचा तरुणपणीचा ब्लॅग ॲण्ड व्हाईट फोटोसमोर दोन गुलाबाची फूले दाखवली असून मधोमध ‘याद ना जाये बिते दिनो की’या रफी साहेबांचं सदाबाहर गीताच्या ओळी लिहल्या आहेत,हा व्हिडीयो व्हॉट्स ॲपवर येताच अनेकांच्या काळजाचा ठोका चूकला!
बिना यांच्या मोबाईलवर फोन खणखणू लागले मात्र पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळालाच नाही त्यामुळे संशयाचे माेहोळ आणखी गडद झाले. नागपूर शहराचे संगीत सुरमणि पं.प्रभाकर धाकडे गुरुजी यांच्या त्या शिष्या असल्यामुळे परिणामी धाकडे गुरुजींकडे याबाबत विचारणा सुरु झाली. ते देखील माहिती ऐकून व्यथित झाले!शहरातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका छाया वानखेडे यांना देखील विचारणा करण्यात आली मात्र त्या देखील अनभिज्ञ होत्या.त्यांनी देखील काळजीपोटी बिना यांना फोन करण्यास सुरवात केली.काही काळ वातावरण अतिशय तनावपूर्ण होतं.
बिना या शहरातील एक सर्वोकृष्ट गझल गायिका असून त्यांच्या हळूवार,मखमली आवाजाला शहरात तोड नाही. फेसबूकवर त्यांनी अनेक गझल अपलोड केल्या आहेत. त्यांची प्रत्येक गझल श्रोत्यांना मनाच्या एका पारलौकिक विश्वात नेऊन पोहोचवते.प्रत्येक शब्द आणि प्रत्येक सूर त्यांचा‘चाशनी में डूबा’असा अलौकिक आनंद श्रोत्यांना देतो. अश्या या महान गायिकाचा करोनाच्या काळात श्रद्धांजलीसारखा अनुभूती देणारा ऑडीयो त्यांच्या फोटोसह व्हॉट्स ॲपवर येताच नागपूरचे कलाविश्व हादरले. त्यांची ९ सप्टेंबर रोजी फेसबूक पोस्ट ही ‘दे पाएगा ना धोखा तू मुझको बार बार..लकडी की हांडी,आग पर चढती है एक बार’ही शायर डॉ.विजय मित्तल यांच्या गझलेचा मुखडा त्यांनी पोस्ट केला होता,त्यांच्या या पोस्टमुळे देखील चर्चेला उधाण आले होते.
मात्र थोड्याच वेळाने नेहमीसारखा त्यांचा खणखणीत हास्याचा आवाज त्यांनी कॉल बॅक केला असता कानी पडताच…कला जगताला हायसं वाटलं….अनेकांनी त्यांचं आयुष्य वाढलं असल्याचे सांगितले आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली.‘सत्ताधीश’ने आज खास त्यांचा हा सुरेल आवाजातील व्हिडीयो आपल्या वाचकांसाठी अपलोड केला आहे.
या पूर्वी नागपूरचे कला जगातील शेखर घटाटे, ऑकेस्ट्रा फनकारचे संस्थापक मोहम्मद अफजल,उत्कृष्ट गायक विजय चिवंडे,गायक सुधीर मानके असे अनेक कालवंत हे करोनाच्या काळातच काळाच्या पडद्याआड गेल्याने नागपूरचे कलाविश्व हे आधीच चांगलेच हादरले आहे.त्यामुळे असा वेगळाच ऑडीयो बिना यांचा व्हॉटस ॲपवर येताच कलाविश्व काहीकाळ असे हवालदिल झाले होते .‘सत्ताधीश’त्यांच्या दीर्घायुष्याची मनोनम कामना करते.
आज सकाळीच पत्रकार जगतातील दोन मृत्यूने पत्रकार जगत देखील दू:खाच्या काळोखात बुडाले असून,करोना पुढे माणूस किती हतबल झाला आहे,याची प्रचिती वारंवार पत्रकार जगतालाही येत आहे.आज दैनिक सकाळचे माजी प्रूफ रिडर सागर जाधव यांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली,करोना काळात नुकतीच त्यांची नोकरी सुटली होती,अत्यंत बिकट हलाकीच्या आर्थिक परिस्थितीचा सामना करीत असतानाच त्यांना करोनाने गाठले. सकाळ दैनिकाची नोकरी सुटल्यानंतर त्यांनी नागपूरातील अनेक दैनिकांचे उंबरठे झिजवले मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली.याच काळात ते पॉझिटीव्ह व्यक्तिच्या संपर्कात आले असल्याचे सांगितले जात आहे. नोकरी सुटल्यावरही त्यांनी हिंमत सोडली नव्हती. नोकरीसाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते.अश्यातच दहावीत असणा-या मुलाला ८३ टक्के गूण मिळाल्याने ते आनंदित होते मात्र नियतीला त्यांचे हे ही सुख बघवल्या गेले नाही.अतिशय शालीन स्वभावाचे, मनमिळाऊ असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन अपत्ये निराधार झाली.
याशिवाय दैनिक ’लोकशाही वार्ता’ मधील युवा असणारे सदस्य नितीन पाचघरे यांचे देखील पहाटेच्या वेळी ह्दयघाताने निधन झाल्याची वार्ता सकाळीच व्हॉट्स ॲपवर येऊन धडकली आणि पत्रकार जगत स्तंभित झाले.करोना संसर्गामुळे गेल्या १५ दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते.याशिवाय वाडी भागातील पत्रकार सुनील शेट्टी यांनी देखील करोना काळात कालच जगाचा निरोप घेतला.आपल्या सहका-यांच्या अश्या मृत्यूमुळे कलाकार जगतासोबतच पत्रकार जगत देखील हवालदिल झाले आहे. अनेक दैनिकांमध्ये अनेक कर्मचारी हे करोनाबाधित होत आहे मात्र जीव मुठीत घेऊन पत्रकारांना वार्तांकन करणे क्रमप्राप्त असल्यामुळे इलाज नाही.
‘सत्ताधीश’या सर्व दिवंगत पत्रकार व माध्यमकर्मींना विनम्र श्रद्धांजली अर्पित करते.




आमचे चॅनल subscribe करा
