

कलावंतांच्या चेह-यावर फूलला आंनद
असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉय इंडियाने केली कलावंतांना धान्याची मदत
नागपूर,ता. २९ मे: महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते नुकतेच गांधी बाग बगिच्यामध्ये इंडिया टी.व्हीच्या सौजन्याने शहरातील १०० गरजू कलावंतांना धान्याच्या किट वाटपाचा ‘नेत्रदिपक सोहळा’पार पडला.या सोहळ्यात कलावंताना भिक्ष्ेकरींच्या रांगेत बसवण्यात आले कलावंतांना देण्यात आलेल्या किटमध्ये बुरशी लागलेले शेंगदाणे,सोंडे पडलेली कनिक,एक पाव साखर,१० रुपयांचा मसाला पाकिट इ.अशी थट्टा करणारे धान्य वाटप झाले.या वृत्ताची बातमी ‘सत्ताधीश’ने प्रसिद्ध केली,या वृत्ताचा मागोवा घेत पत्रकार सुदर्शन बागडे यांनी ‘सत्ताधीश’सोबत संवाद साधला,त्या कलावंतांना एक संस्था मदत करण्यास तत्पर असल्याचा निरोप दिला,आज सकाळी ८ वा. बडकस चौकात ऑस्कर सांस्कृतिक संगीत कला अकादमीच्या अत्यंत गरजू अश्या ३० कलावंताना १५ दिवस पुरेल अशी धान्याची किट शहरातील एक दानशूर संस्था असोसिएशन ऑफ प्रोगेसिव्ह एम्प्लॉयी इंडियातर्फे वाटप करण्यात आली.पत्रकार सुदर्शन बागडे यांनी आपल्या सह्दयतेचा परिचय देत माणूसकीच्या देणगीत या महामारीच्या काळात असा खारीचा वाटा उचलला.
याप्रसंगी कलावंतांच्या चेह-यावर आनंद फूलला.भूक ही माणसाला दररोज लागत असते.सकाळी व सायंकाळी दोन वेळा माणसाच्या पोटाची खळगी भरणे अत्यंत गरजेचे असते त्याशिवाय माणूस जगू शकत नाही,हा प्रकृतीचाच नियम आहे.प्रकृतीला कळतं मात्र मायबाप सरकारला जगण्याचे नियम कळत नाहीत किंबहूना कळत असूनही स्वत:चं अपयश लपवण्यासाठी लॉकडाऊन लावून वारंवार जनसामान्यांना घरात चार भिंतीत डांबून ठेवण्यात येत आहे.
स्वाभिमानी कलावंत हा कोणासमाेरही हात पसरत नाही मात्र गेल्या १४ महिन्यांपासून मायबाप सरकारने मग ते दिल्लीश्वर असोत की महाराष्ट्राची सरकार करोनावर मात करण्यासाठी त्यांच्याकडे रुग्णालये,डॉक्टर्स,औषधे कोणतीही सुविधा नाही,असलीच तर फार तोकडी ती देशातील सव्वाशे कोटी जनतेला पुरेशी ठरणार नव्हतीच म्हणूनच लोकांना आरोग्य सुविधा पुरवू शकत नाही व करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी लॉकडाऊनच्या नावाखाली घरातच डांबण्याचा उपक्रम सुरु केला.सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आणली,दूकाने,उद्योग सर्वकाही बंद करण्यात आले वरुन पोलिसांचा कडक पहारा बसवला.
हा देखील विचार नाही केला एवढा प्रदीर्घ काळ हाताला कामच नाही राहणार तर लोकं जगतील कसे?करोना महामारीचा प्रादुर्भाव आणि जनसामान्यांची उपासमार यामध्ये कोणताही ‘मध्यम’ मार्ग न काढता मायबाप सरकारने लोकांना करोनाने मरा नाही तर उपासमारीने मरा या तत्वावर अक्ष् रश: वा-यावर सोडले.
समाजातील काही दानशूर व्यक्ति,संस्था यांनी गेल्या वर्षभर पुढे येऊन तळागाळातील लोकांची मदत केली मात्र करोना एवढा लांबला की त्यांचीही शेवटी दानत संपली.पोटाच्या भूकेला करोना कळत नाही,आतड्या पिळवटून निघाल्या कि जठारग्नीत काही ना काही अन्न ढकलणे गरजेचे असते,त्यात घरातील लहान -लहान मुले ही जर भूकेने व्याकूळ झाली असतील तर माणसला नियतीसमोर हतबल होण्याशिवाय व मायबाप सरकारला शिव्या देण्यावाचून पर्याय राहत नाही.
अश्यावेळी त्याला आशा असते कुठून तरी त्याला रेशन किटची तरी मदत मिळावी,त्याच्या बालबच्च्यांच्या पोटात दोन घास पडावे,अनेक कलावंतांनी ज्यांनी एकेकाळी स्टेज गाजवला त्यांनी आज आपल्या बायको मुलांच्या उपासमारीमुळे भाजीची दूकान थाटली,कोणी सुरक्ष्ा रक्ष् काची नोकरी पत्करली कोणी चहाची टपरी टाकली,मात्र घरात चार तोंडे खाणारी,घरभाडे,विजबिल,दूकानाचे भाडे,मुलांचे शिक्ष् ण,गॅस सिलेंडरचे वाढते दाम,पेट्रोलने उलटलेली शंभरी,अवाक्या बाहेर गेलेले डाळ,तांदूळ,तेल,भाज्यांच्या किमती यामुळे त्यांचे पार कंबरडे मोडले.
माय बाप सरकार फक्त मुंबईत वातानुकूलीत कक्ष्ात बसून लॉकडाऊन वाढवायचा का?की कडक निर्बंध लावायचे?अशी ‘वांझोटी’ चर्चा झोडण्यात व्यग्र आहे.सरकारी नोकर सोडलेत कर कोणाच्याही हाताला काम नाही,भूकेचा प्रश्न मात्र हा दररोजचा आहे,हे मात्र सरकार लक्ष्ात घेत नाही.पुढेही अजून काही महीने तरी मायबाप सरकार कार्यक्रमांना परवानगी देणार नाही,ही काळ्या दगडावरची रेष आहे,हे कलावंतांनाही माहिती आहे.
अश्यावेळी पत्रकार बागडे यांच्यासारखा सहह्दयी माणूस हा कलावंतांच्या डोळ्यातील आसवांनी घायाळ होतो,आपल्या ओळखीच्या असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉय इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या व्हॉट्स ॲप ग्रूपवर कलावंतांची कैफियत मांडतो,त्यांना मदतीचे आवाहन करतो आणि या ग्रूपमधील प्राध्यापक,आयएएस अधिकारी,वकील इ.समाजातील सुशिक्ष्ि त मंडळी लगेच त्या आवाहनाला प्रतिसाद देत एका दिवसात ३० कलावंतांसाठी रेशन किटची व्यवस्था करतात,हे ही नसे थोडके.
ऑस्कर संस्थेचे अध्यक्ष् पी.कूमार यांनी देखील असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉय इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी आज अनेक कलावंतांच्या चेह-यावर आनंद फूलवला असल्याची प्रतिक्रिया दिली.एवढंच नव्हे तर येत्या काळात देखील कार्यक्रमांवर बंदीच असणार आहे अश्यावेळी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत पोहोचलेल्या कलावंतांना समाजातील दानशूर व्यक्तिंकडून असाच मदतीचा हात मिळावा,अशी अपेक्ष्ा व्यक्त केली.
कलावंतांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्यासाठीच पी.कूमार यांनी या संस्थेची स्थापना याच वर्षी जानेवारीत केली होती.या संस्थेची अधिकृत नोंदणी देखील शासन दरबारी केली आहे.आज नागपूर शहरातील अनेक कलावंत या संस्थेशी जुळत असून आजच्या जीवघेण्या व अत्यंत कठीण समयी संस्थेकडे अाशेने डोळे लावून बसली आहे. असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉय इंडिया यासारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने हा कठीण काळ ही निघून जाईल व पुन्हा कलावंतांना स्वाभिमानाने जगण्याचे सोनेरी दिवस परत येतील असा आशावाद पी.कुमार व्यक्त करतात.
असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉय इंडिया या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष् प्रा.विलास तेलगोटे हे देखील ,मी पण कलावंतच असल्याचे सांगतात.त्यामुळे मला कलावंतांचा स्वाभिमान कळतो,त्यांची मदत म्हणजे मी स्वत:च्या कुटुंबियांचीच मदत करीत असल्याची भावना व्यक्त करतात.
असोसिएशनच्या डॉ.कांबळे या देखील याप्रसंगी उपस्थित होत्या.कलावंतांच्या आवाहनावर हा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्या सांगतात.फार नाही देऊ शकलो मात्र ३० कुटुंबियंाना १५ दिवस रेशन पुरेल एवढी व्यवस्था मात्र नक्की करु शकलो,व कलावंतांचे खुललेले चेहरे बघून आमचं मन समाधानाने भरुन पावलं,असे त्या सांगतात.
आज एका कलावंतांने आपली व्यथा मांडताना विदारक वास्तव मांडले,दोन छोटे छोटे बालबच्चे असणा-या कलावंतांच्या पत्नीने कधीच घराचा उंबरा ही ओलांडला नव्हता मात्र…..करोना का डर आणि सरकार का कहर ने….या माऊलीला आज बंगल्यांवर भांडी घासण्यासाठी घराचा उंबरा ओलांडण्यासाठी बाध्य केलं,असे सांगून हा कलाकार ढसाढसा रडला!
या शहरातील महापौरांनी तर या कलावंतांची थट्टा केलीच मात्र ‘बडे बडे’ अश्या सर्वच राजकीय नेत्यांनी आता आपला हात आखडता घेतला आहे.३० लाख लोकांची लोकसंख्या आहे,कोणाकोणाला मदत पुरवणार?अशी मानसिकता असणा-या या राजकारण्यांच्या शहरात सुदर्शन बागडे यांच्यासारखा एक पत्रकार पुढे येऊन ‘एक दिया ताे दिल से जला कर देखो….अंधेरा छट जायेगा’असा आशावाद, उजाड झालेल्या कलावंतांच्या मनात पेरण्यात सज्ज होतो…एवढंच नाही तर त्यांच्या मदतीसाठीही सज्ज हाेतो,स्वयंसेवी संस्थेकडे शब्द टाकतो….त्यांच्या या माणूसकीला ‘सत्ताधीश’चा सलाम.




आमचे चॅनल subscribe करा
