

डॉ.उदय गुप्ते यांनी उलगडला सप्तकच्या स्थापनेमागील मजेशीर घटनाक्रम
आज सप्तकचा ४० वा वाढदिवस . १० ऑगस्ट १९८० ला परवीन सुलताना च्या गाण्यानी सप्तक ची सुरुवात झाली .जवळपास ३ महिने आमची तयारी सुरु होती .सप्तक च्या स्थापने मागे मजेशीर घटनाक्रम आहे . सुरुवातीला भीमसेनजी चा कार्यक्रम करायचा हा एकमेव उद्देश होता . कारण बँक ऑफ बरोडा इतवारी चे कस्टमर असलेले भीमसेन भक्त अम्मूभाई कक्कड (हे नंतर सप्तकचे प्रेसिडेंट होते , २००२ मध्ये निवर्तले )यांनी तिथे कार्यरत असलेल्या विलास मानेकर आणि उदय ( राजा ) पाटणकर याना आव्हान दिले की तुम्ही भीमसेनजी चा कार्यक्रम आयोजित करत असाल तर मी ५ हजार रुपये देतो . दोघांनी ते आव्हान स्वीकारले .
कार्यक्रमाचा खर्च जास्त होता , त्यासाठी पैसा गोळा करायचा तर संस्था हवी . त्यासाठी बऱयाच मित्रमंडळी ना एकत्र करून एक मीटिंग घेतली , मात्र जेव्हा प्रत्येकाने स्वतः जवळचे १०० रुपये सुरुवातीच्या खर्चासाठी टाकायचे ठरले तेव्हा सातच लोक उरले ,संस्था सुरु करण्या च्या formalities झाल्यावर राजा पुण्या ला गेला आणि भीमसेन जी ना १० ऑगस्ट तारीख मागितली . ते शांतपणे म्हणाले , डिसेंबर पर्यन्त शक्य नाही , हवी असल्यास १० जानेवारी ८१ देऊ शकतो , राजानी ती स्वीकारली , पण १० ऑगष्ट ला सप्तक सुरु करायचे या निर्धाराने परवीन सुलताना याना भेटला . त्यांनी १० ऑगस्ट तारीख स्वीकारली .
आम्ही तयारी सुरु केली . पैसा गोळा करणे हे काम किती खडतर असते याचा तेव्हा अनुभव आला . आमची भिस्त अम्मूभाई , विलास ,आणि राजा यांचावर. ते दिवस रात्र फिरले , व्यवसायीका ना १०० रुपयाची जाहिरात मागितली तर ११ रुपये पुढे करायचे आणि एवढेच शक्य आहे असे म्हणायचे . ज्या संस्थेचे कधी नाव ऐकले नाही त्यांना पैसे देताना ते साहजिकच कचऱयाचे. आम्ही घरोघरी जाऊन तिकिटे विकली . सुदैवाने वेळेवर तिकीट विक्री चांगली झाली आणि पुरेसा निधी जमवू शकलो ,
कार्यक्रमाचे आधीचे ३ दिवस आम्ही सर्व जण thrilled आणि excited होतो . परवीन सुलताना २ दिवस आधीच आल्या. आम्ही सतत त्यांच्या दिमतीला असायचो . रवी भुवन च्या त्यांच्या खोलीच्या बाहेर आमच्या पैकी एक जण सतत बसून असायचा , त्यांना काही लागले तर तत्परतेने मदत करायचा ,बाकी संस्थांच्या पदादिकार्यांना या कार्यक्रमाच्या मागे कुणी तरी सधन आणि मोठी व्यक्ती असावी असा दाट संशय होता , ते शोधण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला . एवढा मोठा प्रोग्रॅम ही किरकोळ दिसणारी , परिस्थीनी आणि अधिकारांनी साधारण असलेली तरुण मंडळी करू शकतात यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता . शेवटी त्यांनी परवीन याना सुद्धा विचारले की या आयोजक लोकांच्या मागे कोणाचा वरदहस्त आहे , अर्थात कुणीच नव्हते हे कळायला त्यांना काही वर्षे लागली !
कार्यक्रमाच्या वेळी आम्ही जरा tense पण उत्साहात होतो , जस्टीस आर एस पाध्ये प्रमुख पाहुणे आणि उदघाटक होते , बँक ऑफ बरोडा चे मॅनेजर नारायणन विशेष अतिथी होते .आकाशवाणीच्या कै प्रेमा पांडे यांनी सुंदर संचालन केले . कार्यक्रम अत्यन्त देखणा झाला .परवीनजींनी आपल्या मुलायम आवाजांनी , तयारीच्या गाण्यानी श्रोत्यांना भारावून टाकले , mesmerize केले .
आमच्या आयोजनाचे फार कौतूक झाले , या यशामुळे आम्ही उत्साहित झालो , थोडाफार पैसा सप्तकच्या गाठीशी आल्यामुळे आत्मविश्वास आला , पुढचे कार्यक्रम करण्याची उमेद आली ,
सप्तक च्या पुढच्या वाटचाली बद्दल नंतर केव्हातरी …….




आमचे चॅनल subscribe करा
