

प्रत्येक भाग, प्रत्येक जिल्हा प्रत्येक राज्य आणि संपूर्ण देशात हा लॉकडाऊन घोषित केला जातोय, देशाला वाचवण्यासाठी, देशातील प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकावर घरातून बाहेर पडण्याची बंदी लावली जात आहे, हा लॉकडाऊन पुढचे २१ दिवस अर्थात तीन आठवड्यांचा असेल असं मोदींनी स्पष्ट केलं.
संपूर्ण जगाला या महारोगानं हात टेकायला लावलेत. हे देश यासाठी प्रयत्न करत नाहीत असं नाही किंवा त्यांच्याकडे संसाधनांची कमतरता आहे असंही नाही. परंतु, वास्तवात करोनाचं संक्रमण ज्या वेगानं फैलावतंय त्यामानाने अनेक प्रयत्न फोल ठरत आहेत. काही लोकांच्या बेपर्वाईमुळे आणि चुकीच्या विचारांमुळे तुमचे आई-वडील, मुलं, कुटुंब, मित्र-मैत्रिणी आणि संपूर्ण देशच मोठ्या संकटात सापडू शकतो. बेपर्वाई अशीच सुरू लागली तर देशाला त्याची किती किंमत चुकवावी लागेल, याचा अंदाजाही लावणं कठीण, असं म्हणत निष्काळजी नागरिकांना मोदींनी फटकारलं.
गेल्या दोन दिवसांपासून देशातील अनेक भागात लॉकडाऊन करण्यात आलंय. राज्य सरकारचे हे प्रयत्न गंभीरतेनं घ्यायला हवेत. आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या आणि इतर देशांचा अनुभव ध्यानात घेता देशात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येतोय, असं पंतप्रधानांनी म्हणताचअनेक नागरिकांना आता पुढे काही तरी नवी घोषणा होतेय याची जाणीव झाली.या लॉकडाऊनमुळे देशाला आर्थिक नुकसान होईल. परंतु, एका एका भारतीयाचा जीव वाचवणं हीच भारत सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे, असंही मोदींनी म्हटलं.




आमचे चॅनल subscribe करा
