फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआज चार करोना बाधितांची भर: आकडा पोहोचला १३३ वर

आज चार करोना बाधितांची भर: आकडा पोहोचला १३३ वर

Advertisements

सतरंजीपुराशी कनेक्शन: सिम्बॉयसिस येथे होते विलगीकरणात

नागपूरात काल सोमवार दि. २७ एप्रिल रोजी महापालिका आयुक्त तुकराम मुंढे यांनी सतरंजीपुरा येथील १२०० जणांना क्वारंटाईन करणार असल्याचे सांगून काल रात्री ४५० जणांना शहरातील वाठोडा येथील सिम्बॉयसिसमध्ये विलगीकरणात पाठवले. मात्र या पूर्वीच संतरंजीपुरा येथील १२६ जणांना विलगीकरण कक्ष्ात ठेवण्यात आले होते,त्यापैकी आणखी ४ जणांचा करोना चाचणीचा अहवाल हा आज मंगळवार दि.२८ एप्रिल रोजी पॉझिटीव्ह आला असून आता नागपूर शहरात करोना बाधितांची संख्या ही १३३
वर पोहोचली आहे,हे चारही जण सिम्बॉयसिस येथे विलगीकरणात होते.

सतरंजीपुरा येथील मृत करोना बाधिताच्या संपर्कातील ‘संपर्क साखळी’ ही खंडीत करण्याच्या दृष्टिनेच नागपूरातील ’हॉट स्पॉट ’ ठरलेल्या या भागातील नागरिकांचे विलगीकरण करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.मृत व्यक्तिच्या संपर्कात आलेले या भागातील नागरिक प्रशासनाला सहकार्य न करता,खोटी माहिती देणे,माहिती दडवणे, आपापल्या भागात सामाजिक अंतराचे नियम न पाळणे, एकमेकात सरळ सरमिसळ करणे असले प्रकार करीत होते.अश्‍या वागणूकीमुळेच पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा हा नागपूरात वाढत गेला. सुरवातीला मृत व्यक्तिीच्या संपर्कातील ८० जण हे करोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले होते,आज यात आणखी ४ जणांची भर पडली व मृत व्यक्तिपासून बाधितांचा आकडा हा आता ८४ वर पोहोचला आहे. सामाजिक अंतराचे नियम न पाळल्यामुळेच यात लक्ष् णीय वाढ होण्याची शक्यता गृहीत धरुन मनपा आयुक्तांनी मृत व्यक्तिच्या घराजवळील आजूबाजूच्या १५० लाेकांचे आधी विलगीकरण केले होते मात्र आता मृत व्यक्तिच्या घरामागील ओळीत राहणारे सर्व १२०० लोकांचे विलगीकरण करण्यात येणार असून आज मंगळवारी जवळ जवळ ७५० लाेकांना काल रात्री पासून वाठोडा येथील सिम्बॉयसिसमध्ये विलगीकरण कक्ष्ात ठेवण्यात आले तर इतरांना देखील विलगीकरणात पाठवण्याची प्रक्रिया ही अद्याप सुरु आहे.

घरी राहूनच सतरंजीपुरा येथील या लोकांचे स्वॅब घेतल्या जाऊ शकले असते. ज्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली असती त्यांनाच फक्त रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते,अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्हिीडीयोद्वारे दिली.मात्र येथील लाेकांनी माहिती दडवली,प्रशासनाची दिशाभूल केली,मृत व्यक्तिच्या संपर्कात येणा-या काही कुटुंबियांना बाहेर ठिकाणी लपविण्याचे कार्य केले.यामुळे धोका निश्‍चितच वाढला याशिवाय एकाच भागात राहत असल्यामुळे ते कोणतेही सामाजिक अंतर पाळत नसून सातत्याने‘ मुक्त विहार’करीत असल्यामुळेच या ठिकाणच्या जवळपास १२०० लाेकांच्या सक्तीच्या विलगीकरणाचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे मुंढे यांनी सांगितले.जवळपास २८० घरकुलातील हे लोकं असल्याची माहिती त्यांनी दिली.

आज पॉझिटीव्ह निघालेल्यांपैकी चारही महिला आहेत ज्यांचे वय अनुक्रमे २८,२९,३० व ५० वर्षे आहेत. उपचारासाठी यांना मेडीकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ५ एप्रिल रोजी सतरंजीपूरा येथील ६७ वर्षीय अब्दूल लतीफ यांचा मृत्य झाला होता. त्यांना क्ष् य रोग होता. त्यांना बघायला त्यांच्या जावईचा मित्र घरी आला होता जो दिल्ली मार्गे नागपूरात आला होता. त्याच्याकडून अब्दूल लतीफ यांना ‘काेरोना’ची लागण झाली होती. अब्दूल लतीफ यांना तीन विवाहीत मुली,मुलगा,सून,नातवंडे असून त्यांच्या खूप चांगल्या स्वभावामुळे त्यांचे सामाजिक वर्तूळ फार मोठे होते.

सतत त्यांना भेटायला व तब्येतीची विचारपूस करण्यास अनेक जण घरी येत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल हा ‘पॉझिटीव्ह’आला होता.परिणामी त्यांच्या मुली,सूना,जावई,नातवंडे व जवळच्या संपर्कात येणारे १५० लोकांचे विलगीकरण करण्यात आले. मात्र संपर्कात आल्यामुळे सुनेच्या भावापर्यंत ही लागण पोहोचली होती. नागपूरात जेव्हा करोना बाधितांची संख्या ८० वर पोहोचली होती त्यातील ५० जण हे अब्दूल लतीफ यांच्या संपर्कातील होते. दूर्देवाने अब्दूल लतीफ यांच्या लहान लहान नातवंडांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले. मनपा प्रशासनाने सुरवातीला अब्दूल लतीफ यांच्या घराजवळील जवळपास १५० लोकांना विलगीकरण कक्ष्ात पाठवले होते. मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या एका कुटुंबातील १० जण हे लपून राहीले होते.नंतर त्यांचाही शोध घेण्यात आला. प्रशासनाने ही संपर्क साखळी तोडण्यासाठी वारंवार सतरंजीपुरा येथील मृत व्यक्तिच्या परिसरात,संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून सामोरे येऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते मात्र येथील लोकांनी प्रशासनाला सहकार्य न करता उलट माहिती दडवली. परिणामी एका मृत करोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या ‘१२००’ लाेकांवर लहान-लहान मुलांंसह आज आपापली घरे-दारे सोडून विलगीकरणात राहण्याची वेळ आली,हे देशातील एकमेव उदाहरण असल्याचे सांगितल्या जात आहे.

‘विशेष म्हणजे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरात’ असा उल्लेख करुन,आज अनेक राष्ट्रीय वृत्त वाहीन्यांवर देखील फक्त एका मृत करोना बाधितामुळे नागपूरातील सतरंजीपूरा येथील १२०० लोकांचे विलगीकरण हाच विषय ’चर्चिला’जात होता.१४० पैकी ८४ जणांना एका मृत काेरोना बाधितामुळे संसर्ग झाल्याचे अाश्‍चर्य देखील व्यक्त केले जात होते.

आज ७ करोना बाधित बरे होऊन गेले घरी
नागपूरात एकूण ४० बाधितांनी केली कोरोनावर मात-

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या