फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजआज इंसानियत पर शर्मिन्दा हूं..इसका गुनाहगार मैं भी हूं

आज इंसानियत पर शर्मिन्दा हूं..इसका गुनाहगार मैं भी हूं

Advertisements

हत्तीणीची हत्या सरकार समर्थित!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.४ जून: केरळमधील मलप्पुरम जिल्ह्याच्या सायलेंट व्हॅली जगंलात २७ मे रोजी घडलेली घटना, ही मानवी संवेदनांनाच थक्क करुन केली. एका गर्भवती हत्तीणीला अनानस फळामध्ये फटाखे घालून खायला देण्यात आले. तो फटाखा तिच्या तोंडातच फूटला आणि…तिच्या मुखात आणि जिभेला गंभीर ईजा पोहोचली. असह्य वेदनेने विव्हळत ती गावाबाहेर धावत सूटली. मुखातील असंख्य जखमांमुळे तिने एका नदीचा आश्रय घेतला,आपले तोंड त्या पाण्यात बुडवले मात्र…!मृत्यूनंतरच त्या वेदनेतून तिची सूटका झाली.
या घटनेची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून नेटीझन्समध्ये सातत्याने सुरु असून अेनक सेलिब्रेटींनी देखील यावर अत्यंत दूखद प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.केरळ मधील साम्यवादी विचारसरणीच्या सरकारने १८ मे २०२० रोजी एक आदेश पारीत केला.यात जंगली रानडूक्करांना मारण्यासाठी केरळमधील नागरिकांना हवी ती उपाययोजना करण्याची मुभा देण्यात आली.या कायद्याचा फटका बसला मात्र त्या निष्पाप गर्भवती हत्तीणीला!

या कायद्याने जणू सर्वांना मोकळीक मिळाली वन्यप्राण्यांशी क्रूरतेने वागण्याची,त्याचीच परिणीती गर्भवती हत्तीणीप्रति झालेल्या पराकोटीच्या क्रोर्यात घडली. अनानसमध्ये तिला ज्वलनशील फटाखे चारण्यात आला, ज्याचा स्फोट तिच्या मुखात झाला. काही कालावधीनंतर ती तिच्या बाळाल जन्म देणार होती.भूकेने ती व्याकूळ होती. कृतघ्न मानवाने मात्र तिची भूक आपल्या क्रोर्याने शमविली.
दाह शमविण्यासाठी ही हत्तीणी नदीच्या पाण्यात तोंड बुडवून उभी राहीली आणि अखेर तिने तिथेच जलसमाधी घेतली!ही घटना उघडकीस आली ती तेथील वन क्ष्ेत्रातील रॅपिड रिस्पॉन्स चमूचे सदस्य असलेल्या मोहन कृष्णन या वनाधिका-याने लिहीलेल्या एक भावनिक फेसबूक पोस्टद्वारे.

भारतात वन्यजीव संरक्ष् ण कायदा हा १९७२ साली करण्यात आला होता.महत्वाचे म्हणजे केरळमधील सरकारने कायदा करुन हत्ती हा ’पाळीव’ प्राणी असल्याचे घोषित केले .परिणामी तेथील माणसांना हत्तींसोबत क्रूरतेने वागण्याचे जणू पारपत्रच मिळाले.केंद्रिय मंत्री मनेका गांधी यांची आज मार्मिक टिप्पणी होती,केरळमध्ये दरवर्षी ७०० ते ८०० हत्ती मारले जातात,अधिकृतरित्या मात्र दरवर्षी फक्त २५० ते ३०० हत्तींच्या मृत्यूची नोंद होत आहे.वायनाडच्या ३ जिल्हयामध्येच ६७ हत्ती मारले गेले आहेत. कोल्लममध्ये नुकतेच गेल्या महिन्यात एका हत्तीची अशी हत्या करण्यात आली होती. २०१७-१८ ची आकडेवारी आहे! देशात एक लाखांच्या वर हत्ती होते आता मात्र २७ हजार हत्ती हा प्राणि उरला असून केरळ व कर्नाटकाच्या जगंलातील क्ष्ेत्रात ७ ते ८ हजार हत्ती असल्याच अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

केरळ या राज्यात हत्तींना मारुन टाकणे ही एक सामान्य बाब मानली जाते.१८०० हत्ती हे केरळमधील विविध मंदिरात सेवा देत आहेत तर ५०० हत्तींना पायात साखळदंड टाकून बांधून ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये भारतीय वन्यजीव संरक्ष् ण कायद्याचे कुठेही अस्तित्वच नसल्याचे ही घटना सिद्ध करते. हिमाचल प्रदेशात देखील माकडांसाठी असाच आदेश पारित झाला असल्याचे सांगितले जात आहे. तेथील नागरिकांना ’हनुमानांना’हव्या त्या पद्धतीने मारुन टाकण्याची सूट आहे.केरळमध्ये हीच बाब रानडूक्करांसाठी लागू करण्यात आली मात्र ती हत्तींच्या जीवावर उठली.

केरळ हे भारतातील सर्वाधिक साक्ष् र राज्य म्हणून गणल्या जातं मात्र ही घटना सिद्ध करते,साक्ष् र असणं म्हणजे सुसंस्कारी असणं असे नव्हे. वामपंथी विचारात हिंदू देव देवता,गजराज,गणपती,देवतांचे वाहन इ.बाबींना अजिबातच महत्व नाही. ही विचारसरणी देशातील संविधानच मानत नाही तर कायदे काय मानणार?अशी देखील तीव्र प्रतिक्रिया सोशल मिडीयावर उमटली.

महत्वाचे म्हणजे वायनाड जिल्हयातील एका तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे खासदार राहूल गांधी किवा केरळच्या मुख्यमंत्र्यांची या घटनेवर अद्यापही एकही प्रतिक्रिया समोर आली नाही.ऐरवी नेहमी अनेक बाबींवर भरभरुन ट्विट करणारे राहूल गांधी यांनी या घटनेवर ’ब्र’शब्द काढला नाही,याबद्दलही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.या हत्तीणीला विस्फोटक देऊन ठार मारणारे यांना मूळात तेथील साम्यवादी सरकार गुन्हेगारच मानत नाही का?असाही सूर कानी ऐकू येत आहे.

भूकेने व्याकूळ आणि १८ ते २० महिन्यांनी या जगात आपले बाळ येणार आहे याच विचारात ही हत्तीणी होती,तिने कोणाचेही कोणतेही नुकसान केले नव्हते, ती आक्रमक देखील नव्हती. एकाही माणसाला इजा पोहोचवली नव्हती. इतका चांगूलपणा तिच्यात होता…या शब्दात त्या वनाधिका-याने ती फेसबूक पोस्ट लिहली होती. सुप्रसिद्ध अभिनेते अक्ष् य कूमार यांनीही ट्वीटरवर व्यक्त होत ’हल्ली पशूंमधील पशूत्व कमी होत चालले आहे…माणसांमधील पशूत्व वाढत चाललं आहे’अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर केरळमधील याच एका घटनेवर नेटकरी हे दू:ख आणि आक्रोश व्यक्त करीत आहेत. एका नेटकरी याचेच हे शब्द आहेत…‘आज इंसानियत पर शर्मिंदा हूं…लग रहा है इसका गुन्हेगार मैं ही हूं…’

तथागतांचे पहले पंचशील आहे ’प्राणिमात्रांवर दया करा’-भंते हर्षदिप

केरळमधील घटना ही निश्‍चितच मानवाला माणूस म्हणून न शोभणारी आहे.करुणा आणि मैत्रीचा भाव हा माणूस म्हणून जगताना प्रत्येकाला आवश्‍यक आहे.मानव ही निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती समजली जाते.मात्र याच मानवातील विकृत प्रवृत्ती ही घात ही करीत असते. इतरांनाही जगण्याचा सारखाच अधिकार आहे, ही तथागत गौतम बुद्धाची पहीली शिकवण आहे. मात्र वर्तमान समाजमनाला याचा पूर्णपणे विसर पडताना दिसतोय. मन ही भूमी आहे.त्या भूमीवर बि पेरणे,मशागत करणे मानवाचे काम आहे. या बि सोबतच काही तण देखील उगवत असते. हेच तण मानवी मनातील ‘विकार’असतात.आपल्यातील सद् गुणांनी ते विकार दूर करायला हवेत.कोणताही मानव हा तणाचे बीज पेरत नसतो. आपल्याती सद् गूणांनी त्यावर मात करावी लागत असते. त्याला कंूपण घालावे लागत असते.
ज्याच्याकडून ही कृती घडली त्याच्याकडून अशी चूक पुन्हा घडू नये,त्याला सद् बुद्धि लाभावी.त्याने जरी हे अज्ञानातून केले असेल तरी या घटनेचा अर्थ म्हणजे त्याला ’जिवनच कळले नाही’जिवनाचा खरा अर्थ जर त्यांना कळला असता तर असे कृत्य घडलेच नसते. धर्म कोणताही असो,धर्माचं निमित्तच ‘जगाचं कल्याण आहे’पंचशीलमध्ये तर पहीलेच तत्व तथागतांनी हे ’समस्त प्राणिमात्रांवर दया’हेच सांगितले आहे.

शेवटी इतकेच म्हणील ’अरे मानवा जगताना तू
हिंसक होऊ नको
पतणाच्या चिखलात स्वत:ला
कधीच रोवू नको
कृती तू उत्तम नियतीची
ही जान ठेवना जरा
माणूस म्हणूनी जगण्याची
तू शिकून घे रे त-हा
अकुलशलाच्या धाग्यात हे
जीवन ओवू नको
अरे मानवा जगताना तू…हिंसक होऊ नको

ती हत्तीणी पाळीव असल्यामुळेच आक्रमक झाली नाही-स्मिता मिरे(संचालिका,सेव्ह स्पीचलेस)

केरळमध्ये हत्ती हे पाळीव प्राणी म्हणून पाळले जातात मूळात एवढा मोठा जीव पोसण्याची केरळमधील नागरिकांची ऐपत आहे का?त्यांना ते मग काहीही खाऊ-पिऊ घालतात,त्यांच्याशी क्रोर्याने वागतात,त्यांना सोडून देतात.केरळमधील ज्या गर्भारणी हत्तीणीसोबत एवढं क्रोर्य घडलं ती हत्तीणी देखील पाळीवच असली पाहिजे. एवढे मोठे स्फोटक तिच्या तोंडात फूटले तरी ती आक्रमक झाली नाही,तिने कोणालाही नुकसान पोहोचवले नाही. ती जंगली असती तर नक्कीच आक्रमक झाली असती.

मूळात केंद्र सरकारने वन्य जीव कायद्या बनवला आहे त्यात साधा कासव,पोपट यासारखे प्राणी किवा पक्ष्ी नागरिकांना पाळता येत नाही मग केरळमधील सरकारने हत्तींना पाळीव प्राणि म्हणून मान्यता दिलीच कशी?महत्वाचे म्हणजे ही घटना घडून ९ दिवसांचा काळखंड उलटला तरी एकाही गुन्हेगाराला तेथील सरकारने अटक केली नाही?बलात्कारी किवा खून करणा-या गुन्हेगाराला अद्याप २४ तासात अटक झाली असती मात्र एका गर्भवती हत्तीणीचा जीव घेणारे गुन्हेगार केरळ सरकारला सापडू नये? मूळात त्यांना त्यांच्या शोधच घ्यायचा नसून ते या घटनेला क्रोर्य किंवा कृत्य मानायलाच तयार नाहीत. जगभर या घटनेची निंदा झाल्यावर आताही फक्त औपचारिक गुन्हे दाखल होतील. निर्भया घटनेप्रमाणेच हत्तीणीसोबत क्रोर्य करणारे यांचे चेहरे सभ्य व संवेदनशील समाजाला कळलेच पाहिजे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. माणसाची वाचाच बसली आहे. ते खूप हेल्पलेस फील करीत आहेत. या घटनेबाबत सामान्य नागरिकांना काहीच करता येत नसल्याने ते हताश झाले आहेत मात्र प्रत्येकाच्या मनात हेच आहे,गुन्हेगार कोण आहेत,हे केरळ सरकारला चांगल्याने माहिती आहे,त्यांना मात्र ते सरकार हात देखील लावत नाही आहेत.

आमच्या संघटनेची एकच मागणी आहे. असे क्रोर्य भारतात कुठेही घडता कामा नये. केंद्र सरकारने आतातरी वन्यप्राणी संरक्ष् ण कायदा हा संपूर्ण देशासाठी एकच राबवावा. राज्यांना वेगळे कायदे करण्याचा अधिकार देऊ नये.संपूर्ण भारतात एकच व सारखा कायदा असायला हवा.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या