

सरकार तुमचे,रेमडिसिव्हिर वितरणाचा अधिकार तुमचा दोषी मात्र महानगरपालिका?महापौरांचे प्रतिउत्तर
आरोग्यसेवा पुरविणे हे मनपाचेच काम:आ.विकास ठाकरे यांचा दावा
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. ५ मे: काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी नुकतेच विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांना पत्र लिहून नागपूर महानगरपालिकेने घरोघरी करोनावर जे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांना मनपाद्वारे कोणती औषधे पुरविली जातात?त्यांना मरणासाठी मनपाने वा-यावर सोडून दिल्याचे सांगत विभागीय आयुक्तांनी तात्काळ आदेशाद्वारे मनपाला घरोघरी सर्व्हे करुन गंभीर रुग्णांना रेमडिसिव्हर औषधाचा पुरवठा करण्याचे सांगावे अशी मागणी करणारे पत्र लिहले होते.यावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी सरकार तुमचे, जिल्हाधिकारी तुमचे,अन्न व प्रशासन विभाग तुमच्याच अख्यारितीत, रेमडिसिव्हिर वितरणाचे अधिकार ही तुमच्याच हातात,केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दहा हजार रेमडिसिव्हिर जे आणले त्याचे देखील वाटप जिल्हाधिकारीच करणार तरीही मनपाच दोषी कशी?असे या पत्रकाला प्रतिउत्तर दिले.
यावर आ.विकास ठाकरे यांनी नागपूर शहराला आरोग्य सेवा पुरविण्याची सर्वस्वी जबावदारी ही नागपूर महानगरपालिकेचीच असल्याचे पुन्हा ठामपणे नमूद केले.ही स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या पंधरा वर्षांपासून भारतीय जनता पक्ष्ाचेच पदाधिकारी चालवित असून आज करोना काळात रुग्णांपर्यंत आवश्यक मदत पोहचत नसेल,मनपाच्या ११ आरोग्य केंद्रांचा कोणताही लाभ जनतेला मिळत नसेल तर हे भाजपचेच अपयश असल्याचा ठपका ठेवला.
मनपाच्या एकाही आरोग्य केंद्रावर करोना रुग्णांसाठी अत्यंत गरजेची असलेली ‘फेरिपिरावीर’टॅब्लेट देखील उपलब्ध नाही,मनपाच्या या आरोग्य केंद्रात उपचार घेणा-या रुग्णांना,आमच्याकडे हे औषध उपलब्ध नाही तुम्ही बाहेरुन घेऊन या,असे सांगून गोर गरीब,गरजू रुग्णांना पैसा खर्च करायला लावल्या जात आहे,मनपाने नागपूरकर जनतेला मरण्यासाठी मोकळे सोडून दिले असल्याचा जळजळीत आरोप केला.मनपा फक्त करोना चाचण्या करतेय,पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना उपचारांची कोणतीही सुविधा उपलब्ध करुन देत नाही,मार्गदर्शन करीत नाही,त्यांची भीती दूर करीत नाही,मग चाचण्या तरी कशाला करता?असा संताप त्यांनी व्यक्त केला.
आज केवळ मनपामुळेच शहरात करोनामुळे मृत्यूची संख्या वाढली असल्याचा आरोप करीत पॉझिटीव्ह निघत असलेल्या रुग्णांना तातडीने औषधे उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी कोणाची,त्यांना योग्य ती उपचाराची सुविधा मिळवून देण्याची जवाबदारी मनपाची नाही का?असा सवाल केला.नुसतं चाचणी करुन मनपा जवाबदारीमुक्त होऊ शकते का?असा प्रश्न उपस्थित केला.सध्या मनपाचे प्रशासन आणि पदाधिका-यांचे धोरणच ‘पाहत बसा तुम्ही तुमचं’असं असून यामुळेच विभागीय आयुक्तांना पत्र लिहून घरी उपचार करणा-या व बेड न मिळू शकणा-या रुग्णांची जवाबदारी ही मनपावर निश्चित करण्याची मागणी केली असल्याचे खास ‘सत्ताधीश’कडे आ.विकास ठाकरे यांनी सांगितले.
रेमडिसिव्हिर नंतर आता फेविपिरावीसारखं अतिशय स्वस्त आैषध गरीब रुग्णांना मनपाच्या आरोग्य केंद्रात फूकट मिळण्याऐवजी ब्लॅकने मिळत असेल तर हे मनपाचे अपयश नाही का?न्यायालयाने देखील मनपाच्या एकंदरित भोंगळ कारभारावर तीव्र ताशेरे ओढले आहेत,हे महापौरांनी विसरु नये,आमचे नाही ऐकत किमान न्यायालयाचे तरी ऐका व जनतेला तातडीने आरोग्य सेवा पुरवा,अशी मागणी त्यांनी केली.
एकीकडे पुणे,मुंबई,नाशिकच्या महानगरपालिकेंची करोना संक्रमण थांबण्याची कामगिरी बघा आणि एकीकडे महाराष्ट्राच्या उपराजधानीतील महानगरपालिकेची कामगिरी बघा!तुम्ही नागरिकांकडून पाण्याचा,मालमत्तेचा,रस्त्यांचा प्रत्येक गोष्टींचा कर वसूलतात त्या मोबदल्यात त्यांना आरोग्य सुविधा पुरविण्याची,वेळेवर बेड उपलब्ध करुन देण्याची,डॉक्टर्स,औषधे आणि ऑक्सीजन उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी ही नागपूर महानगरपालिकेची नाही तर कोणाची आहे?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नागपूर महानगरपालिका हे आपले अपयश झाकण्यासाठी सगळी जवाबदारी ही मेयो व मेडीकलवर झटकत असून,त्या शासकीय रुग्णालयांची देखील एक ठराविक क्ष् मता आहे,रुग्णांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली असतानाही आपापल्यापरीने ही शासकीय रुग्णालये नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचा तोकडा का असेना प्रयत्न करीत आहेत मात्र मनपाने आपली आरोग्य केंद्रे किमान गेल्या १४ महिन्यांच्या करोनाच्या काळातही अद्यावत करुन ठेवली असती तरी नागरिकांना दिलासा मिळाला असता,रुग्णवाहीकेत,बाहेर रस्त्यांवर,रुग्णालयांच्या परिसरात तडफडून दम तोडण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती.
नुकतेच नॅशनल कँसर इन्सिटिट्यूटमध्ये १०० खाटांचे उद् घाटन झाले मात्र त्यातील फक्त २० खाटांवरच उपचार मिळत असल्याची जळजळीत टिका आ.विकास ठाकरे यांनी केली.नुसता प्रसिद्धीचा हव्यास करण्याची ही वेळ आहे का?असा प्रश्न त्यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांना विचारला.
शहरातील दहनघाट हे कोणाच्या अख्तयारित येतात?कंत्राटदारांना कंत्राटे देऊन टाकण्यात आली,त्यांची माणसे करोनाच्या संकटात तिथेही सर्वसामान्य नागरिकांना लृटत असल्याचेच दृष्य नाही का?कोणती कारवाई होत आहे या कंत्राटदारांवर?अकराही दहनघाटांचे कंत्राट कोणत्या ‘खास’व्यक्तिंना दिलीत?२००७ मध्ये मनपात मी विरोधी पक्ष् नेता असताना आ.परिणय फूके यांच्या भावाला दिलेल्या दहनघाटांवरील कत्रांटांचे सर्व बिंग मीच फोडले होते ना?एका मृतदेहाला जाळण्यासाठी १० मन लाकडे लागत असताना भाजप सत्ताधा-यांनी ४० मन लाकडांचा हिशेब वसूल केला.महेश ट्रेडिंग कंपनी कोणाची होती?त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होताच चार दिवसांनी ते फूके यांच्या खात्यात कसे जमा झाले होते?तुम्हाला खरोखरंच नागपूरकरांची काळजी आहे का?करोना महामारीच्या काळात तरी तुम्हाला नागपूरकरांची काळजी आपल्या संपूर्ण सत्ताकाळत वाटली का किवा वाटतेय का?अजूनही नागरिकांच्या आरोग्यप्रति गंभीर आहात का?मग ते कृतीतून का नाही दिसत?असा संताप त्यांनी व्यक्त केला.
दूर्देवाने मनपा सत्ताधा-यांना सवाल विचारण्यासाठी अधिकृत असणारे विरोधी पक्ष् नेते हेच कार्यक्ष् म नसल्याने सत्ताधा-यांचे फावत आहे.मनपात विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्याची टिका करीत तानाजी वनवे यांच्यावर अप्रत्यक्ष् निशाना साधला.आज संजय महाकाळकरसारखा दमदार विरोधी पक्ष् नेता मनपात असता तर चित्र काही वेगळे असते,मात्र आमच्याच पक्ष्ाच्या गटबाजीने घात केला आणि भ्रष्ट सत्ताधा-यांचे चांगलेच फावले,अशी व्यथा ही त्यांनी व्यक्त केली.




आमचे चॅनल subscribe करा
