फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणआचार्य अत्रे नाट्यगृह येथील माल वाहतूक लिफ्टचे काम दोन महिन्यात पूर्ण करा...

आचार्य अत्रे नाट्यगृह येथील माल वाहतूक लिफ्टचे काम दोन महिन्यात पूर्ण करा :उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

Advertisements

दुरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत आयुक्तांनी घेतला निर्णय:डॉ.गोऱ्हे यांच्या बैठकीचे फलित

पुणे दि. २९ ऑक्टोबर: कोव्हिडं-१९ ची लाट ओसरल्यानंतर नाट्यगृहाच्या कामांना चालना देण्याच्या पूर्वीच नाट्यगृहाची कामे पूर्ण करण्यासंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित केली. दिनांक २९ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या राज्यातील नाट्यगृह दुरुस्ती संदर्भातील बैठकीमध्ये ज्येष्ठ नाट्य व चित्रपट कलाकार सुबोध भावे यांनी कल्याण येथील नाट्यगृहांमध्ये असुविधेबाबत लक्ष वेधले होते. त्या अनुषंगाने आज दुरदृश्य प्रणालीद्वारे आदेश बांदेकर, सुबोध भावे, महेश पाठक, प्रधान सचिव नगर विकास, मिसाळ, विभागीय आयुक्त कोकण, डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका,बैठकीत उपस्थित होते.

यावेळी ना.डॉ. गोऱ्हे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात नाटकाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था नसल्याबाबत अभिनेता सुबोध भावे यांनी प्रश्‍न उपस्थित केला.या प्रश्नांबाबत लिफ्ट लवकर बसविण्याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी सूचना दिली. यावर आयुक्त सूर्यवंशी यांनी दोन महिन्यात लिफ्टचे काम पूर्ण करू असे सांगितले.
सर्व नाट्यगृहांमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधा याची यादी करण्यात आलेली असून ती यादी सांस्कृतिक विभागाने तात्काळ सर्व महानगरपालिकांना पाठवाव्यात तसेच कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृह मध्ये लिफ्ट पारदर्शक असावी म्हणजे होणारे गैरप्रकार थांबतील व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही आवश्यक बाब असल्याचे सांगितले.

तसेच नाट्यगृहांमध्ये कार्यरत असणारे महानगरपालिकेचे कर्मचारी यांना आवश्यक असणारे प्रशिक्ष् ण देण्यात यावे आणि ज्या ठिकाणी यापूर्वीच कलाकारांना राहण्याची सुविधा उपलब्ध आहे तिथे स्वच्छता व आवश्यक सुविधा योग्य प्रकारे असल्याबाबतची खात्री महानगरपालिका आयुक्त यांनी करावी असेही निर्देश ना.डॉ.गोऱ्हे यांनी दिले. प्रत्येक महानगरपालिकामध्ये पदाधिकारी व अधिकारी यांची या नाट्यगृहांमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधाच्या अनुषंगाने एक व्यवस्थापन समिती स्थापन करावी असेही डॉ. गोऱ्हे यांनी सूचना केली.

डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या की, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील नाटयगृहांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने राज्यातील नाटयगृहांचे प्रश्न सोडविताना प्राधान्यक्रम ठरवून ते प्रश्न मार्गी लावावेत. नियुक्त करण्यात आलेल्या पथकाची माहिती विधानसभा उपसभापती यांच्यासह महानगरपालिका आयुक्तांनाही द्यावी. या पथकाने प्रत्येक नाटयगृहांची पाहणी करुन प्राधान्याने तेथील समस्या सोडविण्यावर भर द्यावा.

यावेळी सुबोध भावे यांनी डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद असून त्यामधील सर्व दुरुस्ती करून घ्यावी असे विचार मांडले. आदेश बांदेकर अध्यक्ष सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबई व जेष्ठ नाट्य व चित्रपट कलाकार निर्माते दिग्दर्शक यांनी अनेक वेळा नाटकाचे प्रयोग संपल्यानंतर किंवा नाटकाच्या तालमी उशिरा संपल्यानंतर कलाकार व सर्व कर्मचारी यांना ‘निवासाची सोय’ आवश्यक असते ती सोय अनेक ठिकाणी आहे फक्त ती योग्य प्रकारे करावी. त्याबरोबर व्यवस्थापक यांनीही या सुविधांकडे लक्ष ठेवावे असे सांगितले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महानगरपालिका यांनी लिफ्ट साठी आवश्यक असणारा खर्च मंजूर करण्यात आलेला असून हे काम दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. तसेच डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह मध्ये नुकतेच अडीच कोटी रुपये खर्च करून आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तथापि या सुविधांमध्ये आणखी आवश्यक असणाऱ्या गोष्टी अभिप्रेत असतील तर त्यासाठी कलाकारांच्या बरोबर एक संयुक्त बैठक घेऊन त्या सुविधा पूर्तता करण्यात येईल असे सांगितले.

नगरविकास सचिव महेश पाठक यांनी सर्व नाट्यमंदिरात तपशीलवार सुचना देण्यात येऊन समित्या करण्यासाठी राज्यस्तरीय आढावा घेण्यात येईल सांगितले.तर विभागीय आयुक्त मिसाळ यांनी कोकणातील नाट्यमंदिरांतील सुविधांचा आढावा घेण्याची ग्वाही दिली.
कल्याण डोंबिवलीचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी तेथील नाट्यमंदिरांचा आढावा घेण्यास येण्याची विनंती केली असता ना.नीलमताई गो-हे यांनी आदेश बांदेकर व सुबोध भावे यांच्यासह उपसभापती कार्यालयातील दोन अधिकारी यांनीही त्यांच्या सोबत जाऊन सुधारणा व प्रगतीचा आढावा घेण्यास निर्देश दिले.

ही बैठक आयोजित केल्याबद्दल अभिनेते व निर्माता आदेश बांदेकर तसेच सुबोध भावे यांनी ना.डॉ.गोऱ्हे व शासकीय अधिकारी यांचे संपूर्ण नाट्य-कलावंताच्या वतीने आभार मानले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या