फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआचारसंहितेचा भंग: सहा गुन्हे दाखल

आचारसंहितेचा भंग: सहा गुन्हे दाखल

Advertisements

नागपूर: आचारसंहितेचे न करता पालन जिल्ह्यातील काही उमेदवारांनी मिरवणुका काढल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात मिरवणूक आणि लाउडस्पीकरसंदर्भात सहा गुन्हे दाखल झाले असून यात काटोल मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

भारतीय घटनेच्या कलम ३२४अन्वये संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका मुक्त, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवार वैधानिक कर्तव्ये योग्यरीतीने पडावीत, यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. प्रचार रॅली काढण्यापूर्वी रॅलीची वेळ, तिची सुरुवात, मार्ग आणि समाप्तीची वेळ निश्चित करावी आणि माहिती पोलिसांना द्यावी, अशी तरतूद आहे. रॅलीमुळे रहदारीवर परिणाम होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी लागते. दोन राजकीय पक्षांना एकाच दिवशी एकाच मार्गावरून प्रचार रॅली काढायची असेल तर वेळेबाबत पोलिसांशी बोलावे लागते. रॅली रस्त्याच्या उजव्या बाजूने काढावी, असे नियम आहेत. मात्र, या नियमांचे पालन झाले नसल्याने गुन्हे दाखल करण्यात आले.

पुरुषोत्तम मोरे यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. सावनेरमध्ये पवन जयस्वाल यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅलीत परवानगीपेक्षा जास्त लोकांना सहभागी करून घेतल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामटेकमध्येही बसपाचे उमेदवार संजय सत्तेकर यांच्यावर अवैध रॅली काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. स्पीकर वापरण्यासाठीही नियम आखून दिले आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निकालापर्यंत सभेमध्ये व वाहनावर वापरायच्या स्पीकरसंबंधी काही नियम आहेत. ग्रामीण भागात सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत स्पीकरवरून प्रचार करता येतो. मात्र, शहरी भागात ही वेळ सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत आहे. सावनेरमध्ये या नियमाचे उल्लंघन झाल्याने दिवाकर नेरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या