फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजअशी ही मनपा..असे हे मनपाचे डॉक्टर्स!लक्ष्मीनगर झोनच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली मोहोकर निलंबित

अशी ही मनपा..असे हे मनपाचे डॉक्टर्स!लक्ष्मीनगर झोनच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली मोहोकर निलंबित

Advertisements

नागपूर,ता. १९ मे: उपराजधानीची महानगरपालिका आणि या महानगरपालिकेचे विविध विभाग हे कश्‍यारितीने कार्यभार पार पाडतात याचे अनेक वृत्त दररोजच प्रसार-प्रचार माध्यमात प्रसिद्ध होतच राहतात मात्र करोना महामारीच्या या भयंकर आपत्तीत जेव्हा मनपाच्या आरोग्य विभागाने नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वकाही पणाला लावणे अपेक्ष्ति असताना काय ‘मरक्यूरी उजेड ‘पाडला हे मृतकांच्या संख्येवरुन दिसून पडतं. आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार हा अक्ष् र:चव्हाट्यावर आला असताना याच विभागातील आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले असून लक्ष्मीनगर झोनच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली मोहोकर यांना निलंबित करण्यात आले आहे.

डॉ.वैशाली मोहोकर या लक्ष्मीनगर झोनच्या स्त्री वैद्यकीय अधिकारी असून कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील)नियम १९७९ मधील नियम क्रमांक १० नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.डॉ.वैशाली मोहोकर,स्त्री वैद्यकीय अधिकारी,प्रभारी झोनल वैद्यकीय अधिकारी,लक्ष्मीनगर झोन क्र.१ आरोग्य विभाग यांना नागपूर महानगरपालिका सेवेतून पुढील अादेशापर्यंत तात्काळ निलंबित करण्यात आले असल्याची नोटीस देण्यात आली आहे.

आदेशात नमूद केल्याप्रमाणे डॉ.वैशाली मोहोकर यांचे मुख्यालय आरोग्य विभाग(वैद्यकीय) येथे राहणार असून वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.हा आदेश अमलात असलेल्या कालावधीत त्यांना कोणत्याही प्रकारची खासगी अथवा निमसरकारी नोकरी अथवा कुठल्याही प्रकारचा खासगी व्यवसाय करता येणार नाही.निलंबन कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा(पदग्रहण अवधी,स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन,बडतर्फी व सेवतुन काढून टाकणे या काळातील प्रदाने)नियम,१९८१ च्या नियम क्रमांक ६८ अनव्ये निर्वाहभत्ता देय राहील.

हा आदेश अधिक्ष् क(साप्रवि)मदन सुभेदार यांच्या हस्ताक्ष् राने १७ मे २०२१ रोजी पारित झाला आहे.नुकतेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सजंय चिलकर यांनी मनपाचे बहूचर्चित व ‘ख्यातनाम’ डॉ.प्रवीण गंटावार यांच्यासह प्रदीर्घ सुटीवर असणा-या अनेक वैद्यकीय अधिका-यांना २४ तासांच्या आत कामावर रुजू होण्याची नोटीस बजावली होती.ही नोटीस बजावून एका महिन्याचा अवधी उलटला असला तरी डॉ.गंटावार हे अद्याप रुजू झाले नाहीत मात्र त्यांच्यावर कोणतीही निलंबनाची किवा शिस्तभंगाची साधी नोटीस देखील आरोग्य विभागाकडून जारी झाली नसल्याचे कोडे अद्याप उलगडले गेले नाही.

डॉ.मोहोकर यांना मात्र आयुक्त डॉ.राधाकृष्णन बी.यांच्यासोबतची मुजोरी चांगलीच महागात पडली असल्याची चर्चा आहे.डॉ.मोहोकर यांना मनपा सव्वा लाख रुपये महिना पगार देते.विशेष म्हणजे डॉ.मोहोकर या मनपा व्यतिरिक्त तीन खासगी रुग्णालयात आपली सेवा देत असल्याची माहीती आहे.बर्डी येथील म्यूर मेमोरियल,महाल येथील डायग्नोसिस सेंटर व स्वत:त्यांचे खासगी रुग्णालय आहे!

मनपाची नोकरी डॉ.मोहोकर किवा डॉ.गंटावार सारखे वैद्यकीय अधिकारी फक्त हजेरी-पुस्तिकेवर स्वाक्ष् री करण्यापूरती व महीन्याकाठी लाखो रुपयांचा पगार मिळवण्यासाठीच पत्करतात हे सिद्ध झालं आहे.करोना महामारीच्या काळात म्हणूनच मनपाच्या आरोग्य विभागाने नागपूरकर जनतेचे किती प्राण वाचवले?अश्‍या करोना झाल्याचे कारण सांगून प्रदीर्घ सुटी घेणा-या व निलंबित होणा-या वैद्यकीय अधिका-यांच्या संख्येवरुन दिसून पडतंय.करोना काळात तर डॉ.मोहोकर या स्वत:चं कोविड सेंटर चालवतात आहे आणि त्यांना मनपाच्या आरोग्य विभागाकडूनच असे सेंटर चालविण्याची ‘परवानगी’ देखील मिळते तेव्हा मनपाच्या कारभारावर संशोधनात्मक ग्रंथ ही कमी पडेल व या कारभारावर तर नव्या ‘विश्‍वकोषाची’निर्मितीच झाली पाहीजे असे उपहासाने मनपात बोलले जात आहे.

संपूर्ण करोनाच्या काळात डॉ.मोहोकर किंवा डॉ.गंटावार यांच्यासारख्या महापालिकेच्या वैद्यकीय अधिका-यांनी नागपूरकर जनतेच्या आरोग्यासाठी कोणतीही सेवा न करता पगार उचलला,मनपातर्फे पुरविण्यात आलेल्या गाडीचा लाभ उचलला.फक्त १५ मिनिटे हे डॉक्टर्स आपल्या झोनच्या आरोग्य केंद्रावर Visit देऊन,स्वाक्ष् री करुन निघून जात असल्याची माहिती आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे मनपाच्या आरोग्य विभागात सर्व प्रमुख पदावर नागपूर शहरातील हे संपूर्ण ‘कोहिनूर डॉक्टर्सची सेवेसाठी निवड’२००९ मध्ये मनपा सत्ताधा-याच्या एका हेव्हीवेट नेत्यानीच केली असल्याची माहिती आहे. निलंबित झालेल्या डॉ.मोहोकर,अद्याप कारवाईचा स्पर्श ही न झालेल्या डॉ.प्रवीण गंटावार,सत्ताधा-यांची संपूर्ण मर्जी सांभाळणारे डॉ.नरेंद्र बहीरवार आदी विभूती करोना काळ पूर्वीपासूनच नागपूरकर जनतेप्रति नव्हे तर त्या सत्ताधा-यांप्रति असा टक्केवारीचा ‘सेवाधर्म’निभावत असल्याचे सांगितले जात आहे.
नागपूरकर जनतेेचे आरोग्य गेले खड्डयात,‘सत्ताधारी नेत्यांची ‘टक्केवारी’फिक्स झाली की त्यांना त्यांच्या पदावरुन कोणीच ‘माय का लाल’काढू शकत नाही,हे डॉ.गंटावार प्रकरणावरुन सिद्ध झाले.डॉ.गंटावार ही मनपाची आरोग्य विभूती तर गेल्या ऑगस्ट २०२० पासूनच प्रदीर्घ सुटीवर असून धंतोली स्थित आपल्या खासगी ’कोलंबिया’रुग्णालयात करोना बाधित रुग्णांप्रति ‘सेवाधर्म’निभावण्यात व्यस्त असल्याचा व्हिीडीयोही व्हायरल झाला आहे.

आता डॉ.मोहोकर यांचे निलंबनाचे पत्र जारी झाले असले तरी ज्याप्रमाणे मनपाच्या गांधी नगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या एका बिलिंग करणा-या लिपिकाला ज्याने त्या रुग्णालयात लाखो रुपयांचा अपहार केला,निलंबित करुन पुन्हा अति.आयुक्त राम जोशी यांच्या आदेशाने परत कामावर घेण्यात आले त्याच प्रमाणे डॉ.वैशाली माहोकर या सुद्धा काही काळानंतर ’भ्रष्टाचाराच्या गंगेत‘शुद्ध होऊन मनपाच्या सेवेत पुन्हा रुजू होतील,अशी चर्चा आहे.

विशेष म्हणजे डॉ.संजय चिलकर यांनी माध्यमांचा दवाब वाढताच डॉ.गंटावार यांच्यासहित अनेक वैद्यकीय अधिका-यांना(एमओएच) नोटीसी जारी केल्यात.काही ‘कर्तव्यावर’परतलेत मात्र अनेकांचा ’करोना’हा ‘बराच लांबल्या’ने ते अद्यापही कर्तव्यावर हजर झाले नाहीत.
करोनासारख्या महाभयानक त्रासदीने आज नागपूरकरच नव्हे तर ग्रामीण भागातील करोना बाधितांनी या शहरात शासकीय रुग्णालयांसमोर खाट उपलब्ध न झाल्याने अक्ष् र: रुग्णालयांच्या परिसरातच तडफडून प्राण सोडलेत,अश्‍या त्रासदीच्या वेळी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर म्हणजे नागपूर महानगरपालिकेवर गरीब,गरजू जनतेला आरोग्याचे प्राथमिक उपचार तरी पुरविण्याची जवाबदारी होती ती मनपा,तो आरोग्य विभाग आणि त्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांनी कसे कर्तव्य बजावले आहेत याची पुष्टि या निलंबनाच्या कारवाईतून होते.

सत्ताधारी आणि प्रशासन यांनी ‘हातात हात घालून’ज्याप्रमाणे नागपूरकर जनतेला ‘नागवले’ते बघता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तरीही भाजपच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ’आता मनपाची सत्ता तरी गमावू नका’असा अनाहूत सल्ला आपल्याच पक्ष्ाच्या भ्रष्ट कारभारींना कसा देऊ शकतात?याबाबत वारंवार आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या