फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजअशंत: शिथिलता नागपूरकरांच्या मूळावर! शुक्रवारी एकाच दिवशी ५६ बाधितांची भर

अशंत: शिथिलता नागपूरकरांच्या मूळावर! शुक्रवारी एकाच दिवशी ५६ बाधितांची भर

Advertisements

नागपूरात बाधितांची एकूण संख्या ६८२ वर

नागपूर,ता. ५ जून: पाचव्या लॉक डाऊन दरम्यान राज्यात अशंत:शिथिलता प्रदान करताच बाधितांच्या संख्येत दररोज लक्ष् णीय वाढ होत असून नागपूरात आज एकाच दिवशी ५६ बाधितांची भर पडली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.नागपूरात आता बाधितांची एकूण संख्या ही ६८२ वर पोहोचली असून नागपूरकर हे आता चांगलेच चिंताक्रांत आणि भयक्रांत झाले असल्याचे दृष्य आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने प्रादुर्भाव होण्याची शहरातील ही पहीलीच वेळ आहे. या पूर्वी एकाच दिवशी एकूण ४४ रुग्णांची भर पडली होती.

नागपूरात आता नव्याने आढळून येणा-या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये मुंबईवरुन नागपूरात दाखल झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या असल्याचे आढळून आले आहे. देशात अंतर्गत विमान सेवेला प्रारंभ होताच गेल्या तीन महिन्यांपासून विविध शहरात अडकून पडलेल्या नागरिकांनी नागपूरची वाट धरली,परिणामी बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असून दूर्देवाने मुंबईहून नागपूरात आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.परिणामी नागपूरकर आता चांगलेच चिंतित झाले असून यावर प्रशासन आता कोणता उपाय योजणार आहे याकडे त्यांचे लक्ष् लागले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून सतरंजीपुरा व मोमीनपुरा भागापर्यंत मर्यादीत असणा-या कोरोनाने आता जणू संपूर्ण नागपूरच ‘कवेत’घेतल्याचे दृष्य आहे.चिंतेची बाब म्हणजे मार्च महिन्याच्या तिस-या आठवड्यात बजाज नगरमधून हद्दपार झालेला ‘कोरोना’ ने पुन्हा या भागात शिरकाव केल्याने या भागातील नागरिक हे चांगलेच दहशतीत आले आहे.

शहरातील प्रत्येकच झोनमध्ये कोराना संक्रमितांची उपस्थिती दिसून पडत आहे.परिणामी नागपूर महानगरपालिकेचे कोरोनाविषयी माहिती पुरविणारे ’पत्रक’ हे देखील दिवसागणिक ‘लांब’होत आहे कारण यात नागपूर शहरातील अधिकाधिक भागांची भर पडत आहे.

मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्याला लक्ष्मीनगर झोनमधील खामला,अभ्यंकर नगर आणि बजाज नगरमध्ये क्रमश: ८,१ आणि ३ बाधितांची उपस्थिती होती.पुढे धरमपेठ झोनमधील जयनगर,पांढराबोडी,रविनगर,सदर,काशीनगर भागात १,१,२,१ बाधित आढळून आले.हनुमान नगर झोनमधील काशीनगर,जवाहर नगर,मानेवाडा रोड,भगवान नगर,हावरा पेठ,ओंकार नगर चौक,एम्प्रेस सिटी,पार्वती नगर,गणेशेपठ येथे ६,२,५,१,४,१ बाधित आढळले. धंतोली झोन हा सर्वाधिक सुरक्ष्ति राहीला होता मात्र शेवटी गेल्या महिन्यात या भागातील जयभीम नगर,रेल्वे क्वॉर्टर(अजनी)नरेंद्र नगर,जुना बाबुळखेडा,चंद्रमणी नगर येथे १,१,२,२,१ बाधित आढळले.नेहरु नगर झोनमधील नंदनवन,वाठोडा, मोमीनपुरा,टिमकी,भानखेडा बैरागीपुरा,गोलीबार चौक,हंसापुरी,संत्रा मार्केट येथे१,१,२३८,४७,२,१३,१०,१ बाधित आढळून आलेत. गांधी बाग झोनमधील संत्रा मार्केट,गांधी पुतला,खदान,सिरसपेठ,जुनी मंगळवारी,टांगा स्टॅण्ड इतवारी,तकीया दिवान येथे १,५,१,१,२,१ रुग्ण आढळलले.सतरंजीपुरा झोन मध्ये सतरंजीपुरा,शांतीनगर,कुंदनलाल गुप्ता नगर,दलालपुरा इतवारी,नाईक तलाव बांगलादेश,तांडापेठ येथे ११२,१२ ,१,१,७७ ,३ रुग्ण आढळून आलेत.लकडगंज झोनच्या हिवरी नगर येथे १,आसीनगर झोनमध्ये राजीव गांधी नगर,संगम नगर,यशोधरा नगर,टेका हबीब नगर,टिपू सुलतान चौक,इंदोरा येथे २,२,१,३,१ रुग्ण,मंगळवारी झोनमध्ये जरिपटका,गौतम नगर,गिट्टीखदान,कुशीनगर,खलाशी नगर(गड्डीगोदाम)गोरेवाडा,संतोषी नगर,नारा येथे १,५,१,१,२३,१,१ असे एकूण ६१६ बाधितांची यादी मनपातर्फे प्रसिद्ध करण्यात आली.

मात्र यात आज शुक्रवारी आणखी ५६ बाधितांची भर पडली असून धंतोलीसारख्या पॉश वस्तीत आज दोन रुग्ण आढळली. एकंदरित कोरोना विषाणूच्या संसर्गाने नागपूर शहरातील जवळपास सगळेच प्रभाग व्यापलेले असून नागपूरकरांची चिंता आता शिगेला पोहोचली आहे.

कोरोना हा जरी बरा होणारा रोग असला तरी,यामुळे वाट्याला येणा-या विलगीकरणाची सक्ती, प्रतिबंधित क्ष्ेत्रात होणारी वाढ,आधीच आर्थिक डबघाईस अालेला रोजगार,घरभाडे,मुलांचे शिक्ष् ण,घरातील वृद्धांचे आजारपण इ.अनेक समस्या या नागपूरकर नागरिकांच्या समोर ‘आ‘वासून उभ्या आहेत. ‘भीती’आणि ‘आर्थिक संकटहे प्रत्येक वर्गाच्या,प्रत्येक वयाच्या,प्रत्येक वस्ती,प्रभाग,पॉश वस्तीतील नागरिकांच्यासोबत हातात हात घालून,जीवनाच्या श्‍वासासोबत  चालत आहेत. ५ महिन्यांच्या चिमुकलीपासून तर ७३ वर्षीय वयोगटात कोरोना बाधित अाढळल्याने या संसर्गापासून सुटण्याचा कोणताही मार्ग तरुणांनाही गवसत नाही आहे.

आज आलेल्या माहितीप्रमाणे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून(एम्स) १०,मेयोच्या प्रयोगशाळेतून ४३, मेडीकल मधून २ तर एका खाजगी प्रयोगशाळेतून १ रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे.या प्रयोगशाळेतून तपासण्यात आलेल्या बाधितांमध्ये लोकमान्य नगरसह,गांधीबाग, टिमकी,भानखेडा,धंतोली व माेमिनपुरा भागातील रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.

मेयोच्या प्रयोगशाळेत पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये एक हिंगणा मार्गावरील लोकमान्य नगर,दूसरा लकडगंज,तिसरा अमरावती मार्गावरील कोंढाळी जवळचे बाजारगाव,चौथा सेमिनली हिल्सवरील गजानन नगर येथील रहीवाशी तर मेयोच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालात आज एक अमरावतीचा तर दूसरा गोंदियाचा रहीवाशी आहे.फूफ्फूसांना झालेल्या संसर्गामुळे या दोघांवरही सध्या मेडीकलच्या कोव्हिड-्९ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आज दूर्गा नगर येथील ५६ वर्षीय महिलेला सारी वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.

धंतोलीकर भयक्रांत
धंतोलीत एलआयसी समाेरील गल्लीत तसेच यशवंत स्टेडियम समोरील एचडीएफसीच्या  गल्लीत असे दाेन कारोना बाधित आढळून आल्याने धंतोलीकर हे भयक्रांत झाले आहेत. यातील एक बाधित हा आज सकाळीच मुंबईवरुन धंतोलीत आल्याचे सांगितले जात आहे. आज आढळून आलेला रुग्ण हा ज्या घरी आला होता,त्या घरी सर्व वयोवृद्धच मंडळी वास्तव्यास असून तीन भावांनी बिल्डरकरवी तीन मजली इमारत बांधून घेतली होती. या तिन्ही भावांची मुले हे मस्कत तसेच विदेशात नोकरीवर असून घरात फक्त वयोवृद्ध मंडळीचाच वावर असल्याचे सांगितले जात आहे. यातील एका घरातील वृद्धाची तब्बयेत बघण्यासाठी मुलाचा मित्र हा मुंबईवरुन आला असल्याची चर्चा आहे. सध्या मुंबई व पुण्याहून येणा-या नागरिकांना महाराष्ट्रात इतर कुठेही राहण्यास जागा मिळत नसल्याने नागपूरमध्ये येणा-यांची संख्या ही लक्ष् णीय आहे. आज धंतोलीत आढळून येणा-या तरुणाची थर्मल स्क्रिनिंग मुंबई तसेच नागपूर विमानतळावर करण्यात येऊनसुद्धा तो बाधित आढळल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. धंतोलीत आज शुक्रवारी १ किलोमीटरच्या अंतरावर एकसाथ २ बाधित आढळ्याने धंतोलीकरांची चिंता वाढली आहे.

धंतोलीत सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांची संख्या असून दोन किलोमीटरच्या परिसरातच एकूण १७० मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालयांचा भरणा आहे.न्यायालयाने धंतोली ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या याचिकेवर सुनावणी करताना या पुढे धंतोलीत एक ही नव्या रुग्णालयाला मनपाला परवानगी देण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र धंतोलीत दोन बाधित आढळल्याने ज्येष्ठ नागरिकांसोबतच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चूकला आहे. ज्या इमारातीत हे रुग्ण सापडलेत,त्यांच्य शेजारच्या इमारतीतील चौकीदारांना बाधितांच्या इमारतीच्या फाटकाला चूकूनही न शिवण्याचा आदेश देण्यात आला असल्याची माहिती आहे. या भागातील दूकानदारही चांगलेच धास्तीत आहे.अनेक रुग्णालये असल्यामुळे हे क्ष्ेत्र प्रतिबंधित करता येणे शक्य नाही.मात्र असे घडल्यास तीन महिन्यांनी अनेक अटींसह काही तास दूकाने उघडण्याची मुभा मिळाली,ती देखील हिरावली जाईल का?या काळजीने येथील दूकानदारांचे काळीज पोखरले आहे.

काल आणखी दोन मृत्यू-
मेडिकलच्या अतिदक्ष् ता विभागात काल गुरुवार दि. ४ जून रोजी अमरावती येथील ६५ वर्षीय व्यक्तिाचा मृत्यू झाला. तर मध्य प्रदेशातील सतना येथील ६२ वर्षीय महिलेचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात कोरोनामुळे मृत्य झालेल्यांची संख्या ही काल १३ झाली असून,शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती ही पुढीलप्रमाणे आहे.-

५ एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
२९ एप्रिल रोजी मोमिनपुरा येथील ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
५ मे रोजी पार्वतीनगर येथील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
११ मे रोजी पांढराबोडी येथील २९ वर्षीय युवकाचा मृत्यू
१६ मे रोजी गड्डीगोदाम येथील ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
१७ मे रोजी शांतीनगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
१८ मे रोजी मोमिनपुरा येथील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू
२५ मे रोजी मोमिनपुरा येथील ५४ वर्षीय व्यक्ती
२७ मे रोजी सतरंजीपुरा येथील ७१ वर्षीय महिलेचा मृत्यू
3१ मे रोजी रस्त्यावरचा भिक्षेकऱ्याचा मृत्यू
३१ मे रोजी हिंगणा रोडवरील ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
४ जून रोजी अमरावती येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
४ जून रोजी मध्य प्रदेशातील ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या