फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमअवैध वसूली प्रकरणातून लक्ष वेधण्यासाठीच माझी बदनामी:अमित दुबे

अवैध वसूली प्रकरणातून लक्ष वेधण्यासाठीच माझी बदनामी:अमित दुबे

Advertisements

पोलिस मुख्यालयात बदलीमुळे पत्नीला केले समोर

खोटे आरोप करुन कारवाईपासून करायची आहे सूटका

नागपूर,ता. २५ जानेवारी २०२२: मी अमित दुबे एक उच्च शिक्षित तरुण असून पत्रकारितेची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली आहे. पत्रकारितेच्या आवडीतूनच राष्ट्रवादी कांग्रेस मिडिया सेलचा शहर अध्यक्ष ही झालो. प्रपंच चालावा यासाठी एका साप्ताहिक वृत्तपत्राशी जुळलो मात्र मला सर्व पत्रकार बांधवांना हेच सांगायचे आहे माझ्या विरोधात पत्र परिषद घेणारी महिला नूतन वानखेडे या पोलिस कर्मचारी आनंद वानखेडे यांच्या पत्नी आहेत आणि त्यांनी माझ्यावर काल दिनांक २४ जानेवरी २०२२ रोजी माझ्या बदनामीच्या उद्देशाने जे गंभीर आरोप लावलेत ते संपूर्ण सत्य नसून फक्त माझ्या तसेच पत्रकारितेच्या क्षेत्राच्या बदनामीसाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे, याचा मी पूरजोर विरोध करीत असल्याचे, पत्रकाद्वारे अमित दुबे यांनी माध्यमांना कळवले.

पोलिस कर्मचारी आनंद वानखडे यांच्या पत्नीने पत्र परिषदेत सांगितले की माझे त्यांच्या पतीच्या चुलत बहीणीवर एकतर्फी प्रेम होते. आनंद वानखेडे यांनी माझ्याविरुद्ध २०१३ पासून अनेक वेळा वेगवेगळे बयाण नोंदवले.माहितीच्या अधिकारात मी याची माहिती ही गोळा केली. कधी आनंद वानखेडे सांगतात माझे त्यांच्या बहीणीवर एकतर्फी प्रेम होते, तर कधी आमचे प्रेमसंबंध होते तर कधी मैत्री होती असे वेगवेगळे बयाण नोंदवून गेल्या दहा वर्षांपासून माझाच मानसिक छळ करीत आहेत. यामुळेच मी त्यांची तक्रार देखील केली होती.

आनंद वानखेडे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून पोलिस विभागात भर्ती होण्या पूर्वीच एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात एका एमआयडीसीच्या कर्मचा-याला जीवाने मारण्यासंबंधी कलम ५०६ अन्वये गुन्हाची नोंद झाली होती. यानंतर मी त्यांच्या विरोधात २०१४ मध्ये मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती जमा करण्या संबधीची तक्रार गुन्हे अन्वेशन शाखेत नोंदवली. यामुळे चिडून आनंद वानखेडे यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला देखील केला होता.यात माझा हात मोडला व आनंद वानखेडे याच्यावर कलम ३२५, ५०४ अन्वये गुन्हा दाखल झाला. आनंद वानखेडे यांनी त्यावेळी माझ्यावर तक्रार परत घेण्यासाठी सातत्याने दवाब आणला होता मात्र मी तक्रार परत घेतली नाही.

[हे पण वाचा…..

पोलिसावर राजकारणी ‘भारी’

https://sattadheesh.com/?p=14506]

यामुळेच चिडून आनंद वानखेडे यांनी माझ्यावर खोटी अट्रोसिटीची तक्रार दाखल केली.यामुळे माझ्या कारर्कीदीलाच ग्रहण लागले. यानंतर आनंद वानखेडे हे गणेशपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असताना एका लाखो रुपयांच्या वसूली प्रकरणात अडकले, एका पोलिस खबरीच्या आत्महत्या प्रकरणात ही आनंद वानखेडेचे नाव आले होते.हे वृत्त सर्वच वृत्तपत्रानी आनंद वानखेडे यांच्या नावानिशी छापले होते.

या घटनेमुळे पोलिस विभागातील ज्येष्ठ अधिका-यांनी आनंद वानखेडे यांची बदली पोलिस मुख्यालयात केली. या बदलीच्या विरोधात आनंद वानखेडे यांनी आपल्या वरिष्ठ अधिका-यांच्या विरोधातच मॅटमध्ये याचिका दाखल केली.

याच महिन्यात १२ जानेवारी २०२२ रोजी एका अल्पवयीन बालकाच्या प्रकरणात तीस हजार रुपयांच्या अवैध वसूली प्रकरणात या अल्पवयीन बालकाच्या कुटुंबियांनी आनंद वानखेडे याच्याविरुद्ध तक्रार केल्याने ज्येष्ठ अधिका-यांनी त्याची पुन्हा मुख्यालयात हकालपट्टी केली.यामुळे आनंद वानखेडे हा संतापला व त्याने आपल्या पत्नीला पुढे केले.पत्र परिषदेच्या माध्यमातून माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले.

पोलिस ठाण्यातून पोलिस मुख्यालयात बदली झाल्याने आनंद वानखेडे याची अवैध वसूली बंद होणार असल्याने त्याने ही बुद्धिबळाची खेळी केल्याचा आरोप अमित दुबे यांनी पत्रकात केला.

पत्र परिषद घेतल्याने त्याच्यावरील कारवाईचे प्रकरण शांत होईल असे त्याला वाटले,यासाठीच हा संपूर्ण डाव रचण्यात आला.ज्येष्ठ अधिका-यांचे लक्ष त्याच्या अवैध वसूली प्रकरणावरुन विचलित करण्यासाठीच आनंद वानखेडे याने हा पत्र परिषदेचा डाव खेळला. या मुळे अधिका-यांना त्याच्या विषयी सहानूभूती निर्माण होईल व त्याच्यावर कारवाई होणार नाही,आनंद वानखेडे याला हे माहिती झाले आहे की त्याच्या अवैध वसूली प्रकरणातून त्याची सुटका होने कठीण आहे त्यामुळेच त्याने पत्नीला समोर करुन माझ्यावर खोटे आरोप केलेत.

तो स्वत:च्या कारनाम्यांमुळेच संकटात आला असून त्यापासून वाचण्यासाठीच माझ्या बदनामीचा डाव त्याने रचला. मी एक उच्च शिक्ष्त व्यक्ती असून कधीही कोणालाही जातीवाचक शिवी दिली नाही,माझे ते संस्कार नाहीत मात्र त्यांच्या पत्नीने माझ्यावरच पंचवीस लाख रुपये मागत असल्याचा फार चुकीचा आरोप केला.यासाठी त्यांनी आता मानहानिच्या खटल्यासाठी तयार रहावे,असा इशारा दुबे यांनी दिला.मी माझ्या जीवनात कधीही कोणालाही पंचवीस रुपये देखील मागितले असतील तर त्यांनी याचा पुरावा द्यावा,असे आव्हान त्यांनी केले.

मी कधीही कोणालाही शिवीगाळ केली नाही,करीत नाही,मी सामाजिक क्षेत्राशी जुळलेला एक कार्यकर्ता असून पत्रकारितेशी जुळलेला व्यक्ती आहे.फक्त माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हा संपूर्ण डाव रचण्यात आला असून याचा मला अत्यंत मानसिक त्रास झाला आहे.
आता मी स्वत:आत्महत्या करण्याच्या विचारात आहे.असे जर घडले तर त्याची सर्वस्वी जवाबदारी ही आनंद वानखेडे या पोलिस कर्मचा-यावर असेल,असे त्यांनी नमूद केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या