फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजअविनाश महालक्ष्मे लिखित 'घानमाकड' चे रविवारी प्रकाशन

अविनाश महालक्ष्मे लिखित ‘घानमाकड’ चे रविवारी प्रकाशन

Advertisements

नागपूर,दिनांक ४ जानेवारी २०२५: अविनाश महालक्ष्मे यांनी ग्रामीण जीवनावर लिहिलेल्या ‘घानमाकड’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता आहे.

प्लॅटिनम जुबिली सभागृह, बी आर ए मुंडले स्कूल, दीक्षा भूमी चौकाजवळ येथे होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे, तर प्रमुख अतिथी म्हणून साहित्य अकादमी सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे व महाराष्ट्र टाइम्स नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित उपस्थित राहतील.

या पुस्तकाचे मुखपृष्ठ व आतील रेखाटने प्रा. अजय रायबोले यांची आहेत. नागपूरच्या विजय प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. ग्रंथप्रेमीनी या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या