फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशअयोध्या निकालावरील लेख; 'नॅशनल हेराल्ड'चा माफीनामा

अयोध्या निकालावरील लेख; ‘नॅशनल हेराल्ड’चा माफीनामा

Advertisements

नवी दिल्ली: अयोध्या निर्णयावर लेख लिहिल्याप्रकरणी ‘नॅशनल हेराल्ड‘ या दैनिकाने अखेर माफी मागितली आहे. या लेखातील भावना व्यक्तिगत होती. त्याचा नॅशनल हेराल्डशी काहीही संबंध नसल्याचं या वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

अयोध्येच्या निकालावर नॅशनल हेराल्डमध्ये एक लेख आला होता. त्यात अयोध्येच्या निकालाने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाची आठवण होत असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेसची पाठराखण करणारं हे दैनिक असल्याने भाजपने याप्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. हा लेख म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान आहे, असं सांगत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.

विश्व हिंदू परिषद आणि भाजपाला हवा तसाच कोर्टाने निर्णय दिला आहे, असं या लेखात म्हटलं आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयासारखं चांगलं न्यायदान कुठंच होत नसताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायावरच प्रश्नचिन्हं उपस्थित करणं चुकीचं असून या गोष्टीचा आम्ही निषेध नोंदवतो, असं संबित पात्रा म्हणाले.

  • We Apologise If The Article ‘Why A Devout Hindu…’ Hurt Anyone Or Any Group’s Sentiments: National Herald
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या