फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमअमितेशकुमार यांनी सास-यांवर कायेदशीर कारवाई करावी:ज्वाला धोटे यांची माणगी

अमितेशकुमार यांनी सास-यांवर कायेदशीर कारवाई करावी:ज्वाला धोटे यांची माणगी

Advertisements


भाजप सोडून सास-यांनी केले सर्व राजकीय पक्षांवर सोशल मिडीयावर अशलाघ्य कॉमेंट्स

कर्तव्याच्या वर्दीवर अमितेशकुमार यांची भगवी टोपी:कायद्याचे सर्रास उल्लंघन

अमितेशकुमार यांच्या सास-यांविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात नोंदवली तक्रार

नागपूर,ता. १७ डिसेंबर २०२१: उपराजधानीचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे सासरे बिमलचंद्र गुप्ता तसेच त्यांचे साडभाऊ अमित मोहपात्रा यांनी त्यांच्या फेसबूकवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उपहास करणारी ‘विक्रम आणि वेताल’ची पाेस्ट टाकली.एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर ज्या पंतप्रधानांनी देशासाठी बलिदान दिले अश्‍या स्वर्गीय इंदिरा गांधी,राजीव गांधी यांची देखील क्रूर थट्टा करणा-या पोस्ट सोशल मिडीयावर पोस्ट केली.अमितेश कुमार हे सरकारी नोकर असून त्यांच्या खाकी वर्दीला एक संवैधानिक सन्मान प्राप्त असताना त्यांनी आपल्या खाकी वर्दीसोबतच डोक्यात ‘भगवा’ फेटा बांधला असल्याचा फोटो देखील त्यांच्या सास-यांच्या, बिमलचंद्र गुप्ता यांच्या फेसबूकवर वर आहे,अमितेश कुमार यांच्या वाढदिवशीचा तो फोटो असून स्वत:अमितेश कुमार यांनी तो लाईक करुन त्यांचे अभिष्टचिंतन करणा-यांचे आभार मानले आहे,एवढ्या महत्वाच्या जवाबदारीच्या पदावर राहणारे नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी, सर्रास कायद्यांची आणि नैतिकतेची पायमल्ली केल्याने, आपल्या पदाचा राजीनामा द्यावा किवा आपले प्रिय सासरे बिमल चंद्रा गुप्ता यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे यांनी केली.

याप्रसंगी प्रोजेक्टरवर त्यांनी अमितेश कुमार यांचे सासरे व साडभाऊ यांनी सोनिया गांधी,राहूल गांधी,प्रियंका गांधी यांच्या सह राष्ट्रवादीचे प्रफूल्ल पटेल,सुप्रिया सुळे,अनिल देशमुख आदी अनेक नेत्यांचे छायाचित्र फेसबूकवर टाकून, अशलाघ्य अश्‍या टिका टिपण्णी केल्याच्या पाेस्ट पत्रकारांना दाखवल्या.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,मायावती,अखिलेश यादव यांना देखील त्यांनी सोडले नाही.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोअर कमिटीचा उल्लेख त्यांनी ‘चोर कमिटी’असा केला आहे.बिमलचंद्र गुप्ता हे मध्यप्रदेशमधील भाजपचे एक मोठे पदाधिकारी व प्रस्थ आहेत.पक्ष वेगळा असून शकतो,वैचाकिर मतभेद देखील असू शकतात मात्र देशासाठी हूतात्मा झालेल्या राजकीय नेत्यांवर त्यांच्या मृत्यूनंतर असे उपहास, भारताच्या संस्कृतीत बसत नसल्याचे त्या म्हणाल्या. अमितेश कुमार हे महाराष्ट्र सरकारच्या अधीन असणारे शासकीय अधिकारी असताना त्यांनी समाज माध्यमांपासून स्वत:ला अलिप्त ठेवायला हवे होते.

किमान आपल्या सास-यांचे सर्व फेसबूक पोस्ट या राजकीय स्वरुपाच्या व देशातील महान नेत्यांवर टिका-टिपण्णी करणा-या आहेत हे कळल्यानंतर त्यांनी आपल्या सास-यांना ‘अनफॉलो किवा अनफ्रेण्ड ’ करायला हवे होते मात्र अमितेश कुमार हे उलट त्यांचे फॉलोवर राहतात.

अमितेश कुमार यांचे साडभाऊ अमित मोहपात्रा यांनी देखील त्यांच्या फेसबूकवर राहूल गांधी यांचा उपहास करणा-या पोस्ट अपलोड केल्या आहेत.

या दोघांविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात आज तक्रार नोंदवण्यात आली असून,पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावर तातडीने कारवाई करावी,अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशारा ज्वाला धोटे यांनी दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच राष्ट्रीवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी देखील या गंभीर प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन अमितेश कुमार यांना जाब विचारावा व योग्य कारवाई करण्याचे आव्हान या प्रसंगी ज्वाला धोटे यांनी केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या