फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमअपघातग्रस्ताच्या जखमेवर पैसा लाटण्याचा हुडकेश्‍वर पोलिसांचा प्रकार

अपघातग्रस्ताच्या जखमेवर पैसा लाटण्याचा हुडकेश्‍वर पोलिसांचा प्रकार

Advertisements
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई:दोघांना अटक

नागपूर,ता.१८ सप्टेंबर २०२५:वडीलांच्या झालेल्या अपघातात, अपघात दावा प्राधिकरण येथे दावा दाखल करण्यासाठी लागणारे कागदपत्रे देण्यासाठी हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आकाश साकारे तसेच महिला पोलिस हवालदार शारदा सदाशिव भेरे यांनी कागदपत्रे मागणा-या इसमाला अनुक्रमे सहा हजार तसेच दोन हजारांची लाच मागण्याची धक्कादायक घटना हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात घडली.
लाच देण्याची ईच्छा नसल्याने इसमाने आपल्या वकीलाच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.लाचलुचपत प्रतिबंधक नागपूर विभागाने आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी सापळा रचून दोन्ही आरोपींना ८००० रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.दाेन्ही अरोपींनी आपल्या लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वत:च्या आर्थिक फायदासाठी लाचेची माणगी केली व ती स्वत: स्वीकारली.

त्यांच्या विरुद्ध हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अनिनियम १९८८(सुधारणा २०१८)अनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे,अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शुभांगी वानखेडे,पोलीस निरीक्षक रविंद्र सहारे,वैशाली आठवले,म.पोलीस हवालदार वंदना नगराळे,सरिता राऊत,पोलिस हवालदार अनिल बेहरे,अमोल मेंघरे,विजय सोळंके यांच्या पथकाने केली.
दावा दाखल करण्यासाठी अपघातासंबंधी कागदपत्रे पोलिस ठाण्यातून मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर अधिकार असताना त्यांना लाच मागण्यात आली. पोलिस विभागातील काही भ्रष्ट पोलिसांमुळे संपूर्ण पोलिस विभागाच संशयाच्या भव-यात सापडतो.या प्रकरणात आरोपींनी अपघातग्रस्त गृहस्थाच्या जखमांवर पैसा लाटण्याचा अश्‍लाघ्य अपराध केला असल्याची टिका होत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे,की कोणत्याही शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम(एजेंट)यांनी कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी कायदेशीर शुल्क शिवाय अन्य लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर येथे खालील क्रमांकावर संपर्क साधावा-
पोलीस अधीक्षक कार्यालय- ०७१२-२५६१५२०
टोल फ्री क्रमांक -१०६४
पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे-९७३०२००३८३
अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर-७०३८४३६४४१
पोलीस उपअधीक्षक शुभांगी वानखेडे-८१४९७८०२२६
पोलीस निरीक्षक रविंद्र सहारे-७०२०१३५९७७
पोलीस निरीक्षक वैशाली आठवले- ८३०८८४६८६७
पोलीस निरीक्षक सचिन मत्ते-९५१८३३९७३८
…………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या