Advertisements

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसुचित जाती जमाती आयोगातर्फे तक्रार निवारण परिषदेचे आयोजन
नागपुर२२ जुलै २०२५: समाजातील वंचित, पीडित, शोषित घटकांना न्याय देणे ही राज्य अनुसुचित जाती-जमाती आयोगाची प्रमुख भुमिका असून ,ही भुमिका घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होती. डॉ. बाबासाहेबांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आयोग संपूर्ण राज्यात अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे. असे विधान राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केले. अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आज नागपुरात राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगातर्फे तक्रार निवारण जनसुनावणी परिषदेचे आयोजन करण्यात आले,याप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कंविक्शन सेंटरला अनेक बांधवांनी या तक्रार परिषदेचा लाभ घेतला. या आयोजनाचा मुख्य उद्देश शासकीय विभागांकडून किंवा इतर सामाजिक घटकांकडून होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन न्याय मिळवून देणे हा होता. या प्रसंगी एका भव्य शिबिराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कंविक्शन सेंटर येथे करण्यात आले होते .कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून झाली.
याप्रसंगी बोलताना आयोगाचे उपाध्यक्ष ॲड . धर्मापाल मेश्राम म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून आज पासून म्हणजेच २२ जुलै २०२५ ते २२ जुलै २०२६ या संपूर्ण वर्षभरात राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या प्रलंबित समस्या तत्काळ सोडविण्यासाठी राज्यातील अनुसूचित जाती-जमातीसाठी २९ आरक्षित विधानसभा मतदारसंघातही, तक्रार निवारण जनसुनावणी परिषद घेतली जाणार आहे.
यावेळी नागपूर शहर पोलीस आयुक्त डॅा. रवींद्र सिंगल, आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त आयुषी सिंग, उपायुक्त दिगंबर चव्हाण , मुख्यत्वे करून उपस्थित होते .आदिवासी विभागाचा अप्पर आयुक्त आयुषी सिंग यांनी आपले मत मांडताना सामान्यातील अतिसामान्य लोकांपर्यंत न्याय पोहोचण्यात समाजाचा खरा विकास असल्याचे मत मांडले. नागपुर शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सुद्धा आपल्या भाषणात पोलीस विभागामार्फत, जर कारवाईमध्ये हयगय होत असल्यास पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित असून त्यांना आपली तक्रार द्यावी त्यावर नक्की कारवाई होईल असा शब्द दिला.
या जनसुनावणी परिषदेत शेकडो प्रकरणांवर आयोगाचे उपाध्यक्ष ॲड .धर्मपाल मेश्राम यांचा प्रमुख उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात येत असून, पीडित जनतेला तात्काळ न्याय देण्याचा प्रयत्न आयोगाच्या वतीने केला जात आहे. या परिषदेत राज्यभरातून पीडित नागरिक आपली समस्या घेऊन सहभागी झाले. यावेळी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार अत्याचार पीडित मृतकांच्या पात्र वारसदारांना निवृत्ती वेतनाची रक्कम मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी सामुहिक संविधान वाचन करून महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले. या जनसुनावणी परिषदेत विविध विभागांच्या कल्याणकारी योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते.
यावेळी समाजकल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद कुलकर्णी , सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुखदेव कौरती,आयोगाचे विधी अधिकारी अँड राहुल झांबरे,महिला व बाल कल्याण विभागाचा विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे ,
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ चे प्रादेशिक व्यवस्थापक शैलेश उईके ,उपजिल्हाधिकारी विशाल कुमार मेश्राम ,महापालिकेचे उपआयुक्त अशोक गराटे, मनपाचे वैद्यकिय अधिकारी ( दवाखाने) डॉ सेलोकर , मनपा घनकचरा व्यवस्थापन अधिकारी डॅा. गजेंद्र महल्ले, विभागीय वैद्यकिय अधिकारी डॉ दिपांकर भिवगडे, नागपुर सुधार प्रण्यास चे विभागीय अधिकारी कमलेश टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता सुनील उईके , उपअभियंता प्रशांत नेहारे, निलेश बोबडे, सचिन चामाटे, आर. जी. काकडे, विजय राठोड, मोहन बानाबाकोडे , जिल्हा व्यवस्थापक एम टी डी सी चे योगिता काकडे, अनिल वाळके, एस. व्हि. राचरलावर, सिद्धार्थ खोब्रागडे, अनिल वाळके , तहसीलदार संतोष खंडारे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक (सर्व) अरुण क्क्षिरसागर, सतीश आडे, पोपट घायतोंडे, व रमेश खुणे, उपनिरीक्षक कुणाल शेडमाके यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.याशिवाय आयोगाचे इतर सदस्य, अनुसूचित जाती जमाती समाजाचे अनेक सामाजिक कार्यकर्ते, पीडित नागरिक उपस्थित होते.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh Official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
…………………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
