फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजअटल यांची कारगिल नीती एलओसीच्या अलीकडेच,मोदी पोहोचले पलीकडे!

अटल यांची कारगिल नीती एलओसीच्या अलीकडेच,मोदी पोहोचले पलीकडे!

Advertisements

पाकिस्तानात शंभर किलोमीटर आत पंजाब प्रांतात घूसून दहशतवाद्यांचे चार तळ केले उधवस्त
पाकव्याप्त काश्‍मीर व पंजाब प्रांतसह दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे ध्वस्त
भारतीय सैन्याने स्वत:च्या हद्दीत राहून बजावली नेत्रदिपक कामगिरी
मोस्ट वाँटेड मसूद अजहर कुटूंबातील १० व ४ सहकारी यांचा मृत्यू
‘ऑपरेशन सिंदूर’पंतप्रधानांच्या संवेदनशील मनाची देतो साक्ष
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.७ मे २०२५: मे १९९९ मध्ये कारगिलमध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले होते.त्यावेळी अटल बिहारी बाजपेयी हे देशाचे पंतप्रधान तर जॉर्ज फर्नांडिस हे देशाचे संरक्षण मंत्री होते.अटल बिहारी बाजपेयी यांना हे युद्ध कोणत्याही स्तरावर जाऊन जिंकायचे होते.यामुळे ते स्वत: तीन दिवस कारगिलमध्ये युद्धस्थळी उपस्थित होते.पाकिस्तानी सैन्याने बर्फ पडत असलेल्या थंडीच्या ऋतूचा फायदा घेत एलओसी क्रॉस करुन भारतीय हद्दीतील संरक्षण चौक्यांवर ताबा मिळवला होता.या भागातील बर्फ वितळणे सुरु झाल्याशिवाय भारतातर्फे कारवाई होऊ शकत नव्हती.हे युद्ध मैदानी नव्हते.भारतीय सैन्या समोर असा शत्रू होता ज्याला बघणे तर दूर त्याला शोधणे देखील अशक्यप्राय होते.त्यांचा नायनाट करण्यासाठी किती काळ लागेल हे सांगणे दूरापस्त होते.
कारगिलच्या उंच टोकावरील बर्फ वितळण्यास सुरवात होताच भारतीय सैन्य आक्रमण करणार होते तसेच बर्फ पडण्या पूर्वी या युद्धात विजय मिळवण्यास सज्ज झाली होती.मे १९९९ मध्ये कारगिल युद्धाला सुरवात झाली व २६ जुलै १९९९ रोजी ‘ऑपरेशन विजय’ भारतीय सैन्यासह संपूर्ण देशातर्फे साजरा करण्यात आला.निवृत्त मेजर जनरल सी.प्रकाश यांनी सांगिल्याप्रमाणे ,कारगिल युद्धात पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांचे धोरण अतिशय आक्रमक होते.पाकिस्तानच्या सैन्याने एलओसी क्रॉस करुन भारतीय हद्दीत घूसखोरी केल्याचे कळताच त्यांनी सैन्याला पाकिस्तानी सैन्याला हूसकावून लावण्याचे आदेश दिले होते.मात्र….कोणत्याही परिस्थितीत भारतीय सैन्य एलओसी क्रॉस करुन पाकिस्तानच्या हद्दीत जाणार नाही,हे देखील त्यांचे आदेश होते!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र, एकवेळा नव्हे तर दोन वेळा पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांची तळे उधवस्त करण्याचे आदेश भारतीय सैन्याला दिले.२०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यात भारतीय सैन्याचे ४० जवान शहीद झाले, त्याचा सूड बालाकोट हवाईहल्ला घडवून घेण्यात आला.यासाठी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांची तळे उधवस्त करण्यात आली.२२ एप्रिल २०२५ रोजी काश्‍मीरच्या पहलगाम या पर्यटनस्थळी पुन्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ निरपराध पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले,याचा सूड आज भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’राबवून घेतला.यावेळी फक्त पाकव्याप्त काश्‍मीर नव्हे तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भारतीय हद्दीच्या शंभर किलोमीटर आत घूसून दहशतवाद्यांची ४ तळे भारतीय सैन्याने काल मध्यरात्री अवघ्या २५ मिनिटात उधवस्त केली.यासाठी भारतीय सैन्याला भारतीय हद्द ओलांडण्याची देखील गरज भासली नाही.भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईकद्वारे हे ऑपरेशन यशस्वी केले.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत काल पाकिस्तानातील दहशतवाद्यांची एकूण ९ तळे उधवस्त करण्यात आली,यात हजारो निरपराध लोकांचा बळी घेणारा व पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातीत बहावलपूरात ४७ एकर जागेत दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारा मौलाना मसूद अजहर याच्या कॅम्पचा देखील समावेश आहे.या हल्ल्यात मसूद याच्या कुटूंबातील १० व ४ सहकारी मिळून एकूण १४ जणांचा मृत्यू झाला असून,या हल्ल्यात त्याची मोठी बहीण,तिचा पती,एक पुतण्या,पुतण्याची पत्नी,एक पुतणी व त्यांच्या ५ मुलांचा समावेश आहे.याशिवाय त्याचे ४ सहकारी देखील या हल्ल्यात मारले गेले.या घटनेच्या पार्श्वभूमीवर मसूद याने प्रतिक्रिया देत, त्याला या हल्ल्यामुळे कोणतीही निराशा किवा अफसोस नाही, उलट माझ्या मनात हाच विचार आहे मी देखील या १४ मृतकांच्या खुशहाल कारवांमध्ये सहभागी का नाही’असे सांगून,माझ्याही जाण्याची वेळ आली होती मात्र,खुदाने त्यांना वाचवले,अशी प्रतिक्रिया बीबीसी या वृत्त वाहीनीला दिली.मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आणि मोस्ट वाँटेड पाकिस्तानी दहशतवादी आहे.मसूदने पाकिस्तानात राहून भारताविरोधात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहे.

पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केल्यानंतर,जगभरातून भारताला पाठिंबा मिळत आहे.
सहकुटूंब पहलगाममधील निसर्गाचा आनंद लृटत असताना २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन,कलमा म्हणायला लावून नंतर कुटूंबियांसमोरच २६ पुरुष पर्यटकांच्या डोक्यात,कमरेत,मानेवरआणि पोटात गोळ्या घालून त्यांची निर्घृण हत्या केली.काश्‍मीरमधील या क्रौर्याचा बदला आज भारतीय सैन्याने घेतला.त्याच दिवशी तातडीने घटनास्थळी पोहोचलेले देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी‘दहशतवाद ठेचणार‘असा इशारा दिला होता.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दहशतवाद्यांना पाताळातूनही शोधू’अशा इशारा देत, हल्ला करणारे आणि कटकारस्थान करणारे यांना ते कल्पनाही करु शकणार नाही,अशी अद्दल घडवली जाईल,१४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांना पाठीशी घालणा-यांचा कणा मोडून टाकेल,असा इशारा २४ एप्रिल रोजी दिला होता.काश्‍मीरमधील पहलगाम या निसर्गरम्य ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेली ‘हिंदू ’पर्यटकांची हत्या,या घटनेने प्रत्येक भारतीयाला अस्वस्थ केले होते.पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांची मजल एका नवपरिणीत जोडप्याला कायमचे विभक्त करण्यापर्यंत गेली व पहलगामच्या घटनेत अवघ्या सहा दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेले नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना त्यांची पत्नी हिमांशी नरवाल यांच्या समोरच डोक्यात गोळ्या घालून ठार करण्यापर्यंत गेली.आपल्या पतीच्या पार्थिव देहाकडे स्तब्ध होऊन बघत बसलेल्या हिमांशीचे छायाचित्र संपूर्ण देशालाच जणू दू:खाच्या शोकसागरात बुडवून गेला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’हे नाव देऊन,भारतीय स्त्रीच्या कुंकवाची किंमत किती बहूमोल असते,जणू याची जाणीव पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना करुन दिली,हे नाव देशपातळीवरील या ऑपरेशनला देऊन त्यांच्यातील संवेदनशीलतेवर मोहोर उमटली.हिमांशी हिच्यासह मोने,पुण्याच्या संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती जगदाळे,गणबोटे आदी यांच्याही पत्नींच्या कुंकूवाचा आसूड घेतला.पहलगामची धरणी त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराच्या रक्ताने लाल करणा-यांची धरणी देखील आज कुंकवाच्या रंगाची लाल झाली.पहलगामच्या हल्ल्यात २८ निरपराधांची हत्या झाली तर काल रात्री १.०५ ते १.३० वाजे दरम्यान अवघ्या पंचवीस मिनिटात पाकिस्तानात ९० दहशतवादी यमसदनी भारतीय सैन्याने धाडले.पाकिस्ताने मात्र या हल्ल्यात २६ नागरिक मारले गेल्याचा दावा केला आहे.

या ठिकाणी केले दहशतवाद्यांचे तळ उधवस्त-
मुजफ्फराबाद,कोटली,बहावलपुर,रावलकोट,चकस्वारी,भिंबर,नीलम घाटी,झेलम आणि चकवाल.यातील जैश-ए-मोहम्मद व लष्करे तोयबा तसेच दहशतवादी सलालुद्दीनच्याही अनेक तळांचा समावेश आहे.अवघ्या २५ मिनिटांच्या या हल्ल्यात भारताच्या संसदेवर हल्ला करणारा तळ,मुंबईत ९/११ चा हल्ला घडवून आणणारे व अजमल कसाबला प्रशिक्षण देणारे तळ,पुलवामानामध्ये ४० सैनिकांना शहीद करणा-या दहशतवाद्यांच्या तळांचाही समावेश आहे.याच ठिकाणी हेडलीला देखील प्रशिक्षण देण्यात आले होते.ही एयर स्ट्राईक जल व स्थळ सैन्यासोबत मिळून करण्यात आली.ही संपूर्ण ९ ठिकाणे एकसाथ लक्ष्य करण्यात आली.
१) एलओसी जवळील पाच ठिकाणी सवाईनाला कॅम्प,मुजफ्फराबाद जे पीओजेकेच्या लाईन ऑफ कंट्रोलपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे.जे लष्कर-ऐ-तोयबाचे दहशतवादी तळ होते ते उधवस्त करण्यात आले.
२) सैयदना बिलाल कॅम्प,मुजफ्फराबाद,जैश-ए=मोहम्मदचा स्टेजिंग एरिया आहे.हे हत्यारे,विस्फोटक तसेच जनरल सर्वाइविंग ट्रेनिंग केंद्र होते.
३) गुलपुर कॅम्प,कोटली: हे एलओसीपासून ३० किलोमीटर अंतरावर असून लष्कर-ए-तैयबाचा बेस कॅम्प होता,जो रजौरी व पुंछमध्ये सक्रिय होता.
४) बरमाला कॅम्प,बिंबर: हे एलओसीपासून ९ किती अंतरावर असून.या ठिकाणी शस्त्रांचे हैंडलिंग,आइडी आणि जंगल सर्वाइवल केंद्राचे प्रशिक्षण दिले जात होते.
५) अब्बास कॅम्प,कोटली: हे एलओसीपासून १३ किलोमीटर अंतरावर असून लष्कर-ए-तैयबाचे फिदाइन या ठिकाणी तयार होत होते.याची क्षमता एकूण १५ फिदाइन तयार करण्याची होती.

पाकिस्तानात १०० किलोमीटर आत घुसून पंजाब प्रांतात हे तळ केले उधवस्त-
६) सर्जल कॅम्प,सियालकोट: ही आंतरराष्ट्रीय सीमेच्या ६ किलोमीटर अंतरावर असून याच कॅम्पमध्ये मार्च-२०२५ मध्ये काश्‍मीरमध्ये तैनात ४ भारतीय सैन्याच्या जवानांची हत्या करण्याचे प्रशिक्षण देणारे हे केंद्र होते.
७) मेहमूना जाया कॅम्प,सियालकोट: हे ठिकाण आयबीपासून १२ ते १८ किलोमीटर अंतरावर असून काश्‍मीरमधील कठुआमध्ये दहशतवाद पसरविणारे मुख्य केंद्र होते.पठाणकोट एयरबसवर झालेला हल्ला ज्यात ४० जवान शहीद झाले त्याची रणनीती देखील याच दहशवादी केंद्रात तयार करण्यात आली होती.
८) मरकज तैयबा मुरीदके:हे ठिकाण आयबीपासून १८ ते २५ किमी अंतरावर असून २००८ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे मुख्य केंद्र होते.मोहम्मद कसाब व डेविड हेडली यांना देखील याच ठिकाणी प्रशिक्षण मिळाले होते.
९) मरकज सुभानअल्लाह,भवलपुर: हे आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून १०० किलोमीटर अंतरावर असून हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्य केंद्र होते.

वायुसेनेची विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ‘मंगलवार-बुधवार  देर रात १ बजकर ५ मिनिट से १ बजकर ३० मिनिट के बीच ये हमला किया गया है.पहलगाम आतंकी हमले मे पिडीतों को और उनके परिवारो को न्याय दिलाने के लिए भारतीय सशस्त्र बलों ने ‘ऑपरेशन सिंदूर’लॉन्च किया है.नौ आतंकवादी शिविरो का निशाना बनाया गया और उन्हे सफलतापूर्वक नष्ट कर दिया गया’.
कर्नल सोफिया कुरैशी यांनी देखील या संपूर्ण मोहिमेची माहिती सादर केली.त्या भारतीय सैन्यात सिग्नल कोरच्या एक वरिष्ठ अधिकारी आहेत.आंतरराष्ट्रीय सैन्य अभ्यासात भारतीय सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करण्याचा मान मिळवणा-या त्या पहिल्या सैन्य अधिकारी आहेत.
या स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचा लॉन्चपैड.ट्रेनिंग सेंटर्सला टारगेट करुन उधवस्त करण्यात आले.भारताच्या या मोहीमेची संपूर्ण जगाने दखल घेतली असून ब्रिटेनचे माजी पंतप्रधान ऋषि सुनकने देखील कौतूक केले.परराष्ट्र मंत्री सुब्रम्हण्यम जयशंकर यांनी जगाच्या महत्वपूर्ण देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांना भारताच्या या मोहिमेची माहिती दिली तर पंतप्रधान या मोहिमेची माहिती देण्यासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना भेटले.

पाकिस्तानने भारताच्या या कारवाईचा सूड घेण्याची वल्गना केली आहे.एलओसीवर पाकने बुधवारी रात्री ४ वाजतापासून आर्टिलरी फायरिंग सुरु केली आहे.भारतीय सैन्य त्याला सडेतोड उत्तर देत आहे.
आधी या संपूर्ण स्थळांची गुप्त माहिती सशस्त्र दलाच्या सैन्याने मिळवली,यानंतर तिन्ही दलाच्या प्रमुखांनी रणनीती आखली.पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कार्यालयात बसून या संपूर्ण मोहिमेचे लाईव्ह दृष्य बघितले.या मोहिमेत भारतीय सैन्याचे कोणतेही नुकसान झाले नाही.आता तर ‘ऑपरेशन सिंदूर-०२’ ची देखील तयारी सुरु असल्याची चर्चा आहे कारण तिन्ही दहशतवादी गटाचे प्रमुख म्हाेरके या हल्ल्यातून बचावले आहेत.
२०१९ मध्य पुलवामाच्या पार्श्वभूमीवर बालाकोट एअरस्ट्राईचे पुरावे देशातील सैन्य व केंद्र सरकारला मागणारा देशातील विरोधी पक्ष यावेळी मात्र,भारतीय सैन्य व सरकारच्या मागे ठामपणे उभा असलेला दिसून पडतोय.बालाकोट एअरस्ट्राईकची या विरोधी पक्षाने कावळे मेले,विटा पडल्या आदी शेलकी विशेषने लाऊन भारतीय सैन्याच्या शौर्यपूर्ण कामगिरीवर सवाल उपस्थित केले होते.याची परतफेड २०१९ मध्ये पुन्हा एकदा देशाची सत्ता गमावण्यात झाली होती,हे विशेष.
थोडक्यात,हा ‘नवा भारत’असल्याचे सिद्ध झाले, जो पाकिस्तानात घूसून त्याची दहशतवादी तळे उधवस्त करतोय.बाजपेयी यांच्या काळात तसेच काँग्रेसच्या सत्ताकाळात कधीही एलओसी ओलांडून अशी मोहिम राबवली गेली नव्हती,इतकंच नव्हे तर आता दहशतवादी तळे नव्हे तर दहशतवाद्यांना पोसणा-या पाकिस्तानी सैन्याला धडा शिकविण्याची मागणी संपूर्ण भारतीय करीत आहे.
……………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या