फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशअजान म्हणायला लावली अन्...डोक्यात गोळी घातली

अजान म्हणायला लावली अन्…डोक्यात गोळी घातली

Advertisements

२३ एप्रिल २०२५: आम्ही भीतीने थरथर कापत होतो.दहशतवाद्यांनी ५४ वर्षीय संतोष जगदाळे यांना अजान म्हणा,असे फर्मावले,त्यांना ती म्हणता आली नाही,तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्या डोक्यात,कानामागे आणि पाठीत गोळ्या घातल्या… !

हा थरार सांगितला आहे पुण्यातील व्यवसायिक जगदाळे यांच्या २६ वर्षीय कन्या आणि मनुष्यबळ विकास क्षेत्रातील व्यवसायिक आसावरी जगदाळे हिने.काश्‍मीरमध्ये त्यांच्या कुटूंबियांवर गुदरलेल्या प्रसंगाचे कथन त्यांनी भरलेल्या ह्दयाने केले.गोळ्या लागल्यानंतर तिचे वडील जमीनीवर पडले.तेव्हा या बंदूकधा-यांनी दहशतवाद्यांनी शेजारी पडलेल्या तिच्या काकांच्याही पाठीत गोळ्या घातल्या!

पहलगाममध्ये ‘बैसरन व्हॅली’मध्ये मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या घटनेत पर्यटनाचा आनंद घेणा-या पर्यटकांवर दहा ते पंधरा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला.या हल्ल्यात २६ पर्यटक ठार तर २० जखमी झाले आहेत.

आसावरीने दूरध्वनीवरुन माध्यमांकडे या घटनेचे कथन करताना सांगितले की,जवळच्या एका टेकडीवरुन त्यांना स्थानिक पोलिसांसाखा वेश परिधान केलेले काही जण गोळीबार करत असल्याचे समजले.खबरदारी म्हणून सगळे जवळच्याच एका तंबूत जमले.सुरवातील सुरक्षा दलांसोबत चकमक होत असल्याचा भास झाला.मात्र,बंदुकधारी दहशतवाद्यांचा एक गट तंबूजवळ आला आणि त्यांनी गोळीबार सुरु केला.

मग तंबूत येऊन,‘चौधरी,तू आ जा’असे वडीलांना बाहेर येण्यास सांगितले.‘तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देता...’असे काही तरी तो बरगळत होता.यानंतर त्यांनी वडील व काकांवर गोळीबार केला.

पुण्यातील आणखी दोघे जखमी-
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातीलच आणखी दोघे गंभीर झाले असून एकाची प्रकृती स्थिर आहे तर दूस-या विषयी अद्याप माहिती मिळाली नाही.व्यवसायिक संतोष जगदाळे व कौस्तूभ गनबोटे अशी जखमींची नावे आहे.

महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू-
दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात मुंबईचे अतुल मोने व पनवेलच्या दिलीप डिसले यांचा मृत्यू झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून,अतुल मोने व दिलीप डिसले अशी त्यांची नावे असून,स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमीही झाले आहेत.

त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत.एस.भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत.सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे’,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.जम्मू-काश्‍मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत.पहलगाम ज्यांच्या अखत्यारित येेते,ते काश्‍मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांच्याकडूनही दूरध्वनी वरुन माहिती घेतली,असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

डिसले हे नवीन पनवेलचे रहिवासी आहेत.पनवेलमधीलच निसर्ग पर्यटन या टूर कंपनीसोबत ३७ जण सोमवारी विमानाने श्रीनगरला पोहोचले.पहलगाममध्ये असतानाच हा हल्ला झाला व डिसले यांना त्यात जीव गमवावा लागला.या गटामध्ये ज्येष्ठ नागरिक व ३० ते ३५ वयोगटातील पर्यटक आहेत.मात्र,अन्य प्रवासी सुरक्ष्त असल्याची माहिती टूर कंपनीचे प्रमोद ओक यांनी दिली.
या हल्ल्यात पुण्यातील दोन पर्यटक जमखी झाले असून,एकाच्या प्रकृतीविषयी स्पष्ट माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही.

नागपूरातील पर्यटक कुटूंब सुखरुप-

काश्मीर खो-यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील कोणताही पर्यटकाचा मृत्यू झालेला नाही. तथापि दहशतवादी हल्ल्याच्या क्षणी एक नागपूरकर कुटुंब सुद्धा तेथे होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरुन उड्या मारल्या आणि त्यात घसरुन सिमरन रुपचंदानी या किरकोळ जखमी झाल्या. रूपचंदानी कुटूंबातील तिनही सदस्य सुखरुप आहेत.
नागपूर जिल्ह्यातील कश्मीर येथे गेलेल्या पर्यटकांकरिता जिल्हा नियंत्रण केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे चोवीस तास संपर्क साधण्यासाठी मदत कक्ष (०७१२ – २५६२६६८ / ८८६००१८८१७) सुरू ठेवण्यात आलेला असून आतापर्यंत जवळपास २२० पर्यटकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. सर्वच पर्यटक हे सुखरूप असून यातील बहुतांश पर्यटक हे श्रीनगर मध्ये थांबलेले असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
……………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या