फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमअचलपूर-अमरावतीच्या दंगली ‘सुनियोजित!’सत्यशोधन समितीचा दावा

अचलपूर-अमरावतीच्या दंगली ‘सुनियोजित!’सत्यशोधन समितीचा दावा

Advertisements

अचलपूर पोलिसांनी गोडीगुलाबीने सरहद्दीबाहेर काढले:उदय निरगुडकर यांचा आरोप

अचलपूर-परतवाडा दंगलीवरील सत्यशोधन समितीचा अहवाल प्रसिद्ध:अहवालात अनेक धक्कादायक निष्कर्ष

आघाडी सरकारने श्‍वेतपत्रिका काढण्याची समितीची मागणी

‘प्रतिबंधित‘ संघटना वेगवेगळ्या नावाने कार्यरत:समितीचा दावा

हिंदू समाजाची सराफा दूकाने आधी लृटली नंतर जाळली:अचलपूरातून पद्धतशीरपणे हिंदूंचे पलायन: अचलपूरात हिंदू अल्पसंख्यांक:समितीचा निष्कर्ष

अचलपूरातील बहूसंख्याक झालेल्या नागरिकांकडे चोवीस परगणा पश्‍चिम बंगाल येथील रहीवाशी असल्याची आधारकार्डे!

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशींच्या घुसपैठीची शंका:अचलपूरसारख्या लहानश्‍या शहरात ४३ मशिदी ४१ दर्गे!

रोजगाराची कोणतीही साधने नसताना विशिष्ट समुदायाची लोकसंख्येत प्रचंड गतीने वाढ:समितीचा निष्कर्ष

नागपूर,ता.१६ मे २०२२: १७ एप्रिल २०२२ रोजी अचलपूर व १२,१३ व नोव्हेंबर रोजी अमरावती येथे जातीय दंगली घडल्या.संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने ढवळून निघाला.१२ नोव्हेंबर रोजी अमरावतीला रझा अकादमीने मोर्चा काढला,कागदोपत्री दोन हजार जमावाची परवानगी मागण्यात आली मात्र प्रत्येक्षात ४० हजार लोकांचा जमाव एकत्रित आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयातपर्यंत निवेदन देण्यासाठी जाणार होता मात्र परतीच्या मार्गावर अचानक जमाव हिंसक झाला मोर्चेक-यांनी आधी दगडफेक केली,लुटपाट व हिंसाचार घडवून आणला.१३ नोव्हेंबर रोजी या हिंसक मोर्च्याची अमरावतीत प्रतिक्रिया उमटली,तिलाही हिंसक वळण लागले.या दंगलीनंतर राज्य सरकारने अटकसत्र चालवले मात्र ही दंगल पूर्वनियोजित होती का?अमरावती हेच केंद्र का बनले?दंगलखोरांच्या पाठीशी नेमके कोण होते?याच दंगलीची पुनरावृत्ती अचलपूरात का घडली?अमरावती असो किवा अचलपूर मोठ्या संख्येने एका विशिष्ट धर्माचा समुदाय एकाएकी एकत्रित कसा जमतो?अशा असंख्य प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी मैत्र परिवारातर्फे ज्येष्ठ पत्रक़ार डॉ.उदय निरगुडकर,सदस्य माजी न्यायाधीश मीरा खडक्कार,माजी सहा.पोलीस आयुक्त अनिल बोबडे,ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर तसेच पत्रकार प्रवीण मुधोळकर यांच्या समावेश असणारी ‘सत्यशोधन’ समितीची स्थापना करण्यात आली होती.या समितीने २,३ व ४ मे रोजी अचलपूर व अमरावतीचा दौरा करुन दंगलीमागील वास्तव शोधण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तसेच स्थानिक प्रशासनाने समितीला कोणतेही सहकार्य केले नाही,दुस-या पक्षासोबत बोलू दिले नाही,इतकंच नव्हे तर पोलिसांनी समिती सदस्यांना गोड बोलून शहरातूनच हद्दपार केल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केला. याप्रसंगी मंचावर माजी न्यायाधीश मीरा खडक्कार,ज्येष्ठ पत्रकार प्रवीण मुधोळकर तसेच मैत्र संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना निरगुडकर यांनी अनेक धक्कादायक बाबी अधोरेखित केल्या.अमरावती जिल्हयातील अचलपूर शहरात दुल्हा गेटवर भगवा झेंडा फडकावल्याचा वादावरुन हिंदू आणि मुस्लिम या दोन समुदायाच्या गटात वाद झाला.१७ एप्रिल २०२२ रोजी रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली.घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सामंजस्यावर दूरगामी परिणाम करणारा असल्याचे ते म्हणाले.अचलपूरमध्ये एकूण ५२ मोहल्ले असून अब्बासपुरा,सुलतानपुरा अश्‍याच स्वरुपाची तत्कालीन मुस्लिम शासकांची नावे या मोहलल्यांना आहे.फिनले मिलमुळे गावात लोकांना रोजकार उपलब्ध झाला होता मात्र ही मिल नंतर बंद पडली.राेजगाराची कोणतीही साधने उपलब्ध नसताना आश्‍चर्यकारकरित्या अचलपूरची लोकसंख्या ही वाढतच आहे,असे ते म्हणाले.

अचलपूर नगरपरिषदेची स्थापना १९२७ साली असली असून २०१६ मध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षा सुनीता फिस्के,२०११ मध्ये अपक्ष नगराध्यक्ष वानखेडे, २००६ मध्ये काँग्रेसचे सचिन देशमुख २००१ ते २००६ पर्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीचे हाजी रफिक मोहम्द हे सत्तेत होते तर १९९० ते १९९५ या काळात भाजप नगरपरिषदेत सत्तेत होती.विद्यमान ३९ नगरसेवकांपैकी ११ नगरसेवक हे मुस्लिम असून ते काँग्रेस पक्षाचे व अपक्ष आहेत.जेव्हा थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक होते तेव्हा ती हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होते.२००४ पासून अपक्ष बच्चू कडू या मतदारसंघात निवडून येत आहेत.

या भागात जेव्हा दंगल घडली तेव्हा महाविकास आघाडीतील मंत्री आणि स्थानिक अपक्ष आमदार बच्चू कडू आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दंगलग्रस्त मुस्लिमबहुल भागांचाच दौरा केला,अशी माहिती स्थानिक पत्रकारांनी नाव न छापण्याच्या अटीवर समितीला दिली असल्याचे निरगुडकर यांनी सांगितले.खासदार नवनीत राणा यांनी देखील दंगलग्रस्त भागात भेट देताना मुस्लिमबहुल भागालाच झुकते माप दिले असल्याची भावना समिती समोर स्थानिकांनी व्यक्त केली असल्याचे निरगुडकर म्हणाले.

अचलपूर आणि परतवाडा ही दोन जुळी शहरे आहेत.अचलपूर हे ऐतिहासिक शहर असून शहराभोवती परकोटाची भिंत आहे.अचलपूर शहरात प्रवेश करण्यासाठी ४ दरवाजे आहेत.ज्या दरवाज्यावर झेंडा लावण्यात आला होता तो पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून या दरवाज्यावर सर्वच राजकीय पक्ष असे झेंडे लावत असतात.अचलपूर या शहरात मुस्लिम समुदायाची लोकसंख्या जास्त असून या शहराला धार्मिक अशांततेचा धगधगता इतिहास असल्याचे सांगून, मागील २० वर्षांमध्ये सुमारे २२ ते २४ वेळा दोन समुदायांमध्ये चकमकी घडल्या.२००७ मध्ये अचलपूरात जी दंगल उसळली होती त्यात सराफा बाजारातील ७ दूकाने अक्षरश: जाळून टाकण्यात आली होती.अमरावती हे जिल्हा केंद्र, अचलपूर या तालुका केंद्रापर्यंत फक्त ५० किलोमीटरवर आहे.अमरावतीत देखील नोव्हेंबर २०२१ म्हणजे ऐन करोनाच्या काळात धार्मिक तनाव वाढला होता.यामुळे अमरावती या शहरात ५ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती.

सार्वजनिक दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत डीजेवर वाजविण्यात आलेल्या गाण्यामुळे एका विशिष्ट समुदायाने मिरवणुकीवर दगडफेक केली.या वादातून दंगल उसळली.या ही घटनेत सराफा बाजारातील दूकाने जाळून टाकण्याचा प्रयत्न केला गेला.बी.आर.मर्चंट नावाच्या रॉकेल माफियाने रॉकेल दंगलखोरांना पुरविले असा अारोप त्यावेळी झाला होता.अचलपूरातून गेल्या काही वर्षात आश्‍चर्यकारकरित्या लोकसंख्या वाढत असल्याचे लोकसंख्येच्या आकडेवारीवरुन सिद्ध झाले.यात एका विशिष्ट समुदायाची लोकसंख्या ही, लोकसंख्याशास्त्राच्या नैसर्गिक वाढीपेक्षा जास्त असल्याचा दावा याप्रसंगी निरगुडकर यांनी केला.पोलिसांनी जमा केलेल्या माहितीनुसार पश्‍चिम बंगालच्या २४ परगणा या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात अचलपूरात आले असल्याचे माहिती त्यांना समितीद्वारे चौकशी दरम्यान मिळाली असे निरगुडकर यांनी सांगितले.या लोकांकडील आधारकार्डवर या एकाच ठिकाणचापत्ता कसा काय?असा प्रश्‍न यामुळे उपस्थित होतो.

२४ परगणा हा पत्ता दाखवून बांग्लादेशी मुस्लिम, बनावट आधारकार्डाच्या आधारे वस्ती करुन राहत आहेत अशी माहिती समितीला स्थानिकांनी पुरविली असल्याचे त्यांनी सांगितले.अलीकडच्या काळात बाहेरचे मुस्लिम मोठ्या प्रमाणात येऊन स्थायिक होऊ लागले आहेत परिणामी ज्या शहरात उद्योग नाही,मोठ्या रोजगाराच्या संधीच नाही,मग अल्पशिक्षीत लोकांचे केंद्रिकरण या गावात कोण करतोय? असा प्रश्‍न सत्यशोधन समितीला पडल्याचे ते म्हणाले.याचे उत्तर शोधण्यासाठी पोलिस प्रशासनाने सहाय्य करने गरजेचे असताना दूर्देवाने अचलपूर पोलिसांची भूमिका ही विपरित होती,पोलिस दरबारी याची कोणतीही दखल नसल्याची तक्रार स्थानिकांनी समितीसमोर केली.

असे असले तरी शहरात धार्मिक व सामाजिक सलोखा कायम रहावा असा आशावाद जपणा-या व त्यासाठी प्रयत्न करणा-या लोकांची लक्षणीय संख्या दोन्ही समुदायांमध्ये आढळली.मात्र हेतूपूर्वक कुरापत काढणे,मानभंग करने,जबरीने दूकाने-घरे बळकावणे,हिंदूंच्या दूकानांसमोर फळ-भाज्यांची दूकाने लाऊन वाद उकरुन काढणे,वादानंतर हजारोंच्या संख्येने एकत्रित जमून स्थानिक दूकानदाराला हूसकावून लावणे, त्याची मालमत्ता बळकावणे,त्यांचा व्यवसाय गिळंकृत करने,एकट्या-दुकट्याला गाठून धमकावणे,झेंडा लावण्यास अटकाव करने,अश्‍या गोष्टी घडवून आणनारे समाजकंटक मोठ्या प्रमाणात असून पोलिसांना मात्र ते सापडत नाहीत,त्यांना राजकीय प्रोत्साहन दिले जात असल्यामुळेच ‘वोट बँके’साठी सतत धार्मिक अशांतता वाढीव ठेवत असल्याची भावना स्थानिकांनी समितीसमोर व्यक्त केली.

शहरात तरुणांना गुटखा,गांजा व इतर अंमली पदार्थ याचे व्यसन खूप मोठ्या प्रमाणात असून काही सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या या गारेखधंद्यात सहभागी असल्याचा निष्कर्ष समितीने मांडला.पानटप-्यांच्या बहूतांशी ठेल्यांवर गांजा व अंमली पदार्थ सर्रास मिळत असल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सत्यशोधन समितीला दिली..

सत्यशोधनसमिती गावात आल्यानंतर सतत समितीवर पाळत ठेवण्यात आली.या पोलिसांना अचलपूरात प्रतिबंधित असणारा गुटखा,गांजा व अंमली पदार्थांची माहिती मिळू शकत नाही मात्र सत्यशोधन समितीची खडा न खडा माहिती त्यांनी ठेवली असल्याचा आरोप यावेळी निरगुडकर यांनी केला.

अमरावतील जिल्ह्यात जावेद नावाच्या व्यक्तीची गुटखा फॅक्टरी असून तो ती निर्धोपणे चालवतो,त्यामुळे त्याला अन्न व प्रशासन विभाग तसे स्थानिक पोलिसांचाही वरदहस्त असल्याचे स्थानिकांनी समितीला सांगितले.याचे उत्तर पोलिस आयुक्तांना समिती विचारु इच्छित होती मात्र त्यांनी समितीसमोर एका पोलिस निरीक्षकाला पाठवून समितीची बोळवण केली,असा संताप निरगुडकर यांनी व्यक्त केला.

अचलपूर व परतवाडा या दान्ही दंगलग्रस्त भागात कोणतेही वाचनालय,क्रीडा मैदाने नाहीत,व्यायाम शाळा नाहीत ,क्रीडांगणांवरही अतिक्रमणे झाली आहेत.शाळाबाह्य अथवा अर्धवट शिक्षण सोडणा-यांची संख्या ही ५० टक्क्याहून अधिक असल्याचे समितीला तेथील स्थानिक पत्रकाराने सांगितले.या शाळाबाह्य मुलांचा सहभाग हा अंमली पदार्थांची विक्री,वितररण,विविध गुन्हे आणि धार्मिक दंगलीच्या वेळी केला जातो,या परिस्थितीचे गांभीर्य स्थानिक पोलिस प्रशासन,शासन तसेच राजकारणी यांना नाही अशी खंत स्थानिक शिक्षणतज्ज्ञांनी समिती पुढे व्यक्त केल्याचे निरगुडकर म्हणाले.

अचलपूरसारख्या लहानश्‍या शहरात एकूण ४६ मदरसे आणि १४ दर्गे तर इतर धर्मांची धार्मिक स्थळे २० आहेत.यापैकी अनेक धार्मिक स्थळे अतिक्रमण करुन तयार करण्यात आली आहे.या स्थळांची माहिती ना नगरपालिकांकडे आहे ना पोलिसांकडे!याचे उत्तर उदाहरण अमरावती-मूतीर्जापूर असा नॅरोगेज रेल्वे मार्ग.हा मार्ग ब्रॉडगेज होऊ शकत नाही कारण रेल्वे रुळालगतच दर्गा उभारण्यात आला आहे.या दर्ग्याचे बांधकाम,वाढ व त्याला केलेले अर्थसहाय्य याची कुठलीही नोंद नाही.मुस्लिम धार्मिक स्थळे,मशिदी,दर्गे यामधील मौलवी हे कुठून येतात?त्यांचे आधारकार्ड,पॅनकार्ड परदेशी असल्यास पासपोर्ट विसाबाबतची कुठलीही नोंद पोलिसांकडे किवा स्थानिक प्रशासनाकडे समितीला आढळली नसल्याचे निरगुडकर यांनी सांगितले.

दंगलग्रस्त या दोन्ही शहरातील फळविक्री,भाजीविक्री,गवंडीकाम,ओटोमोबाईल गॅरेज,भंगार व्यवसाय आणि ऑटोरिक्षा हे व्यवसाय संपूर्णपणे एका विशिष्ट समुदायाच्या हाती असल्याची माहिती स्थानिकांनी समितीला दिली.आता या ठिकाणी इतर धर्मियांना शिरकाव करने,जम बसविणे जवळपास अशक्य असल्यानेच मोठ्या प्रमाणात या भागातून हिंदूंचे स्थलांतर झाले असल्याचे समितीला कळले,असे त्यांनी सांगितले.

अचलपूर आणि परतवाडा या दोन्ही शहराचा कारभार प्रशासकीयस्तरावर कसा चालतो याचे उदाहरण द्यायचे असल्यास या दोन्ही शहरात एकही ट्रॅफिक सिग्नल नाहीत.अरुंद बोळी आहेत त्यातही अतिक्रमण आहे.लहानसहान अपघात झाले तरी एक विशिष्ट समाज १०० ते २०० माणसे तात्काळ जमवतो.५ ते १० हजार उकळल्याशिवाय जमाव पिडीतांना सोडत नाहीत.या संदर्भात कितीही तक्रारी केल्यात तरी पोलिसांकरवी तक्रारी नोंदवल्या जात नाहीत!विशिष्ट समुदायाच्या अतिक्रमणांना प्रशासन हात देखील लावत नाहीत.एखाद्या गल्लीत आधी चढ्या भावाने दूकान अथवा जागा विकत घेतली जाते,प्रथम शांत राहून आजूबाजूच्या जागा गिळंकृत करायच्या अने एकदा पुरेसे संख्याबळ जमले,की गुंडगिरीच्या अाधारावर हिंदू दूकानदार व मूळ रहिवाश्‍यांना हूसकावून लावायचे अशी त्यांची ’लँड जिहाद’ची मोडस ऑपरेंडी असल्याची माहिती स्थानिक व्यापा-यांनी समितीला दिली,असे निरगुडकर पत्र परिषदेत म्हणाले.

हनुमान जयंतीच्या दिवशी दुल्हा गेटवर अभय माथने यांनी गेटवर भगवा झेंडा लावला आणि मुलीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पुण्याला निघून गेलेत.हनुमान जयंती असल्याने आणखी काही नागरिकांनी त्यापेक्षाही जास्त मोठा भगवा झेंडा त्याच ठिकाणी लावला.पण भगवा झेंडा लागल्यामुळे याची माहिती व्हॉट्स ॲपवर जलद वेगाने फिरली.पणिामी तासाभरात शेकडोंचा जमाव शस्त्रांसह दुल्ला गेट भागात पोहोचला.या ठिकाणी अचलपूर आणि परतवाडा दोन्ही भागातील मुस्लिम तरुण आणि मौलवी जमा झाले होते.त्यांच्याकडे तलवारीसारखी घातक शस्त्रास्त्रे होती.प्रतिक्रिया म्हणून भगव्या झेंड्याचे काय झाले हे बघण्याकरिता काही हिंदू धर्मिय नागरिक दुल्ला गेट परिसरात पोहोचले.ते बघून तो जमाव हिंस्त्र झाला व बघता बघता याचे पडसाद दंगलीत उमटले.बाहेरुन आलेल्या विशिष्ट धर्माच्या लोकांनी त्यांच्या ट्रकमध्ये शस्त्रे तसेच दगड आणल्याचे प्रत्यक्षदर्शीने समितीला सांगितले.

दंगल घडवणारे स्थानिक नसून बाहेरची माणसे होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठायला अर्धा तास लावला!२ हजारांचा जमाव शस्त्रांसह शहरात येतो याची कुठलीही माहिती पोलिसांना मिळत नाही,गुप्तवार्ता मिळत नाही याचे आश्‍चर्य वाटले असे निरगुडकर म्हणाले.घटनास्थळी पोहोचलेल्या पोसिलांनी ’सब घोडे बारा टक्के’म्हणजे या समाजाचे १२ पकडले तर त्या ही समाजाचे १२ माणसेच पकडली.या प्रकरणी अचलपूर पोलिस ठाण्यात ३ गुन्हे दाखल असून आतापर्यंत २२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी भाजपच्या २५ कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे.

स्थानिक प्रशासन आणि पोलिस हे राजकीय दबावा पुढे एका विशिष्ट समुदयाचे लांगूनचालन करतात.त्यांच्या जागा बळकावण्याला व हिंसक कारवायांना कोणताही कायद्याचा बडगा दाखवित नाही.परिणामी विशिष्ट समाजाच्या काही समाजविघातक लोकांची हिंमत वाढली आहे.सत्यशोधन समितीने काही गोष्टींची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला असता या गोष्टी ख-या असल्याचे दिसून आले.परंतु या बाबत सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अचलपूर पोलिसांनी तसे करण्यास समितीला अटकाव केल्याचे निरगुडकर म्हणाले.
ऑटोचालक व मार्केटमधील फळविक्रेते हे महिलांची सर्रास छेड काढतात,अशी तक्रार महिलांनी अनेकदा पोलिसांनी केली मात्र त्याचीही दखल घेतली जात नाही.या फळ विक्रेत्यांना कोणी सभ्य माणसाने हटकले की त्वरित १०० लोकांचा जमाव एकत्रित येतो.

दोन्ही समुदायांमध्ये एकमेकांविषयी पराकोटीचा अविश्‍वास,असुरक्षीतता असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.एवढ्या संवेदनशील भागात सीसीटीव्ही यंत्रणाच कार्यरत नाही.नगरपालिकेने नागपूरच्या एका कंपनीकडू काम करवून घेतले पण महावितरणने वीजपुरवठा दिला नसल्याने हे सीसीटीव्ही सुरुच होऊ शकले नाहीत!वीजेचे बिल काेणी भरायचे?यावरुन शासनाच्याच या दोन्ही  संस्थांमध्ये वाद निर्माण झाला.शेवटी नगरपालिकेने बिल भरण्याची तयारी दर्शविली पण महावितरणने नगर पालिकेकडे पूर्वीची थकबाकी असल्याने सीसीटीव्हीसाठी वीज मिळणार नाही असे ठणकावले! या प्रशासनिक घोळात दंगलींचा इतिहास असणा-या या शहरात सीसीटीव्ही यंत्रणाच कार्यान्वित नाही ही गोष्ट अतिशय लांछनास्पद असल्याचे समितीचे स्पष्ट मत अाहे,असे निरगुडकर म्हणाले.हनुमान जयंतीच्या दिवशी घडलेली दंगल व त्या मागील सत्य पुराव्यासकट पोलिसांना गवसले असते मात्र याचे गांभीर्य ना पोलिस प्रशासनाला आहे ना वीज वितरण कंपनीला,असा संताप त्यांनी व्यक्त केला.

या दंगलीच्या निमित्ताने समितीच्या निदर्शनात आणखी एक धक्कादायक बाब आली ती म्हणजे मुस्लीम कट्टरवादी आणि बंदी घातलेल्या सिमी सारख्या संघटना वेगवेगळे नाव धारण करुन पुन्हा कार्यरत झाल्या असल्याची असल्याची शंका निरगुडकर यांनी व्यक्त केली..ही माहिती समितीला स्थानिक पत्रकारांकडून मिळाली असल्याचे ते म्हणाले.

या संपूर्ण पार्श्वभूमीवर पोलिस व प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा संपूर्ण प्रयत्न समितीने केला मात्र विनंती करुन देखील पोलिस व स्थानिक प्रशासनाने समितीला माहिती देण्याचे टाळले.अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ.आरती सिंग यांनी या प्रकरणात समितीला भेटण्यासाठी असमर्थता व्यक्त केली.पोलिस व स्थानिक प्रशासनाने सहकार्य न केल्यानेच समितीचा हा अहवाल अनेकांना ’एकांगी‘वाटू शकतो,यात समितीचा काहीही दोष नाही,असे स्पष्टीकरण निरगुडकर यांनी दिले.

स्थानिक प्रशासन व पोलिस यांनी समितीला सहकार्य करायचे सोडून समितीचे सदस्य लवकरात लवकर गाव कसे सोडतील याचाच प्रयत्न केला.अमरावतीचे पोलिस उपायुक्त मोईद्दीन मकानदार यांनी देखील समितीची भेट टाळली.दंगलीच्या दिवशी मकानदार हेच शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत होते.यामुळे पोलिसांवर जो आरोप होत आहे त्यावर पोलिसांची बाजू अहवालात मांडता आली नाही.मुस्लिम बहूल भागातील पिडीतांच्या देखील व्यथा जाणून घेण्यासाठीचा प्रयत्न समितीने केला मात्र स्थानिक पोलिसांनी समितीला गावाबाहेर काढल्यामुळे ते शक्य झाले नाही.या समितीत तीन प्रतिष्ठित पत्रकार,एक निवृत्त न्यायमूर्ती व एक निवृत्त पोलिस अधिकारी असूनही त्यांच्या प्रति ज्याप्रकरे अविश्‍वास दाखविण्यात आला तो प्रशासन व पोलिस दोघांनाही नकळत आरोपींच्या पिंज-यात उभा करणारा असल्याचा निष्कर्ष समितीने मांडला असल्याचे निरगुडकर हे म्हणाले.

हा संपूर्ण अहवाल आघाडी सरकारला देखील सोपविण्यात येणार असून सरकारने यावर लवकरात लवकर श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली.तुमच्या समितीत एक ही मुस्लिम समुदायाचा सदस्य का नव्हता?असा प्रश्‍न विचारला असता,समितीत माजी न्यायमूर्ती व माजी सहा.पोलिस आयुक्त या दोन संवैधानिक पदावरील सदस्यांचा समावेश असल्याने त्यांच्या विश्‍वाहर्तेवर शंका घेण्याचे कोणतेही कारण नसल्याचे निरगुडकर यांनी सांगितले.

पोलिसांनी समिती सदस्यांना गावाच्या सरहद्दी बाहेर काढले,तसा संवैधानिक अधिकार पोलिस प्रशासनाला आहे का?या प्रश्‍नावर बोलताना,पोलिसांच्या या भूमिकेवर एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून मी सीन क्रिएट करु शकलो असतो मात्र समितीचा संपूर्ण फोकस हा अहवालाला प्रसिद्धी मिळावी न की आमच्या संवैधानिक हक्काला, हा उद्देश्‍य असल्याने आम्ही पोलिसांच्या या आडमुठे धोरणाला विरोध केला नाही व तशी प्रसिद्धीही मिळवू दिली नाही,असे ते म्हणाले.

पोलिसांना अशी दडपशाही करुन नेमकं काय साधायचं होतं?त्यांना त्यांचा नाकर्तेपणा लपवायचा होता का?या प्रश्‍नावर बोलताना,पोलिसांना समितीबाबत खडा न खडा माहिती आधीच पोहोचली होती त्यामुळेच त्यांची आमच्या कार्यपद्धतीवर नजर होतीच मात्र पोलिस अशी भूमिका घेणार आहेत हे आम्हाला देखील त्याच दिवशी सकाळीच एका स्थानिक पत्रकाराकरवी कळले होते आणि तेच घडले,समितीला सायंकाळी पूर्वीच शहर सोडण्याचे फर्मान प्राप्त झाले.

ही समिती एका खासगी संस्थेद्वारे गठीत करण्यात आली होती,अश्‍या संवेदनशील विषयावर एखादी खासगी संस्था सत्यशोधन करु शकते का?यावर बोलताना,आजवर अनेक घटनांबाबत अश्‍या खासगी समित्यांनी संशोधन केले असल्याचे ते म्हणाले आणि बातमीपेक्षा समितीला दोन्ही समुदायांमधील सलोखा महत्वाचा होता,तोच प्रयत्न समितीने केला मात्र त्याला प्रशासकीय आठमुठे धोरणामुळे यश प्राप्त झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

समितीने जो निष्कर्ष प्रसिद्ध केला तो अतिशय गंभीर असून ज्याप्रमाणे हिंदूंच्या पद्धतशीर पलायनाचा ’अचलपूर पॅटर्न’राबविला जात आहे ते बघता सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आता ‘काश्‍मीर फाईल्स‘सारखाच ’अचलपूर फाईल्स’किवा ‘अमरावती फाईल्स’चित्रपट काढावा का?या मिश्‍किल प्रश्‍नावर बोलताना ’त्यांनी जरुर काढावा,स्क्रिप्ट तर आम्ही दिलीच आहे,अशी गुगली त्यांनी टाकली.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या