फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजअखेर लोकोपयोगी विकास कामांना मनपा आयुक्तांची परवानगी

अखेर लोकोपयोगी विकास कामांना मनपा आयुक्तांची परवानगी

Advertisements

कोव्हिडमुळे वर्षभरापासून अडकलेली विकास कामे होणार सुरू : महापौर आणि स्थायी समिती सभापतींच्या प्रयत्नांना यश

नागपूर, ता. १२ : नागपूर शहरातील प्रलंबित व आवश्यक लोकोपयोगी विकास कामांना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परवानगी दिली . कोव्हिडमुळे शहरातील अनेक विकास कामे मार्च २०२० पासून थांबलेली होती. विकास कामे थांबलेली असल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय व निर्माण होणा-या अडचणी लक्षात घेता मनपाचे विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके व मनपाचे तत्कालिन महापौर संदीप जोशी यांनी वेळोवेळी प्रशासनाशी समन्वय साधून विकासकामे सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला. नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांनी नुकतीच आयुक्त  राधाकृष्णन बी. यांच्या सोबत चर्चा करून शहरातील विकास कामे सुरू करण्याबाबत सूचना केली होती.

त्यानुसार मनपा आयुक्तांनी नागपूर महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक लक्षात घेउन शहरातील लोकोपयोगी विकास कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे. कोव्हिड-१९ या जागतिक महामारीमुळे आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम झालेला असून मनपाच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे. मनपाकडे सद्यस्थितीत २३९४.६९ कोटी देणे प्रलंबित आहे. २०२०-२१चे वार्षिक अंदाजपत्रक लक्षात घेता मनपाचे अंदाजित उत्पन्न १७०० कोटीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हया परिस्थितीचा विचार करता शहरातील विकास कामेही होणे गरजेचे असल्याने लोकोपयोगी कामाच्या पदांतर्गत खर्चाला टक्केवारीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत असल्याचे मनपा आयुक्तांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार विकास कामांच्या निधीमध्ये अंदापत्रकाच्या ५० टक्केपर्यंत खर्चाची मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार वार्डातील लोकोपयोगी कामांसाठी अंदाजपत्रकामध्ये ४५.५७ कोटी प्रस्तावित असून त्यातील २२.७८ कोटी रूपयांचे काम केले जाईल. पंडित दीनदयाल उपाध्याय अंतर्गत ४२.२८ कोटी रूपये अंदाजपत्रकात प्रस्तावित असून त्यापैकी २१.१४ कोटी रूपये देण्यात येणार आहे. नागपूर शहराकरिता ८.४४ कोटी रूपये अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित असून त्यापैकी ४.२२कोटी रूपये देण्यात येणार आहे.

नागपूर शहरातील इतर कामांकरिता १३.९२ कोटी रूपये प्रस्तावित असून त्यापैकी ६.९६कोटी रूपये प्रत्यक्ष देण्यात येणार आहे. रस्त्याची सुधारणा व निर्माण कार्यासाठी अंदाजपत्रकामध्ये १७.३१कोटी रूपये अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित आहे त्यापैकी ८.६५कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महापौर  दयाशंकर तिवारी यांनी विश्वास व्यक्त केला आहे की लोकोपयोगी विकास कार्य आता सुरु होतील. स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी आयुक्तांचे विकास कार्य सुरु करण्यासाठी अभिनंदन केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या