

(छायाचित्र-आरोपीचे सीसीटीव्ही फूटेज)
बलात्कारानंतर आरोपीने गाठला क्रूरतेचा कळस
मुंबई,ता. ११ ऑगस्ट: दिल्लीतील २०१२ सालच्या डिसेंबरमधील कडाडत्या थंडीत माणूसकीला लाजवणारे क्रोर्य ‘निर्भया’सोबत घडले आणि संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली,तेच क्रोर्य मुंबईतील आणखी एका ‘निर्भया’च्या वाटेला काल शुक्रवार दि. १० सप्टेंबर २०२१ राेजी आले,बलात्कारानंतर तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्यात आली यामुळे तिच्या अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाली,यातच तिचा मृत्यू झाला.
मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी आज पत्र-परिषदेत दिलेल्या माहितीनुसार १० ता.च्या मध्यरात्री साधारण ३ वाजून २० मिनिटांच्या दरम्यान मुंबईतील खैरानी रस्त्यावर हे क्रोर्य घडले. एका पुठ्ठयाची कंपनीच्या सुरक्ष्ा रक्ष काने पोलीस नियंत्रण कक्ष् ाला फोन करुन माहिती दिली एका महिलेला मारझोड होत आहे.नियंत्रण कक्ष् ाने साकीनाका पोलीस स्टेशनला याविषयीची माहिती दिली,पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना एका उघड्या टेम्पोच्या आतमध्ये ही महिला रक्तबंबाळ अवस्थेत आढळली.
तिची अवस्था बघता तिला त्या टेम्पो मधून इतरत्र न हलवता पोलीसांनी त्या सुरक्ष्ा रक्ष् काकडून त्या टेम्पोची चावी घेऊन स्वत ते चालवत राजावाडी रुग्णालयात महिलेला दाखल केले.डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले.
पोलीसांनी ३०७,३७६ कलमांअन्वये गुन्हा नोंदवला. तपासात साकीनाका पोलिस तसेच क्राईम ब्रान्चचे पोलीस अधिका-यांनी संयुक्तरित्या तपासास सुरवात केली.त्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले.सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर एका संशयिताला अटक करण्यात आली,त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले.
मोहन चौहान(वय ४५) अश्या या आरोपीचे नाव असून त्याची २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.
एका महिन्याच्या आत हा गुन्हा उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे असे नागराळे हे म्हणाले.मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची घोषणा केली.एका महिन्याचा आत गुन्ह्याचा तपास पूर्ण करावा असे देखील आदेश त्यांनी दिले.
उपचारादरम्यानमहिलेचा मृत्यू झाला असल्यामुळे ३०२ ची कलम देखील लावण्यात आली.पूर्वी आम्ही कलम ३४ लावले होते मात्र आतापर्यंतच्या तपासणीतून एकच आरोपी आढळून येत असल्याने ही कलम काढण्यात आली असल्याचे नागराळे यांनी सांगितले.
विराेधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तुलना दिल्लीती ‘निर्भया’घटनेशी करुन आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्याची प्रखर टिका केली.मुंबईच्या महापौरांनी देखील घटनेची तीव्र निंदा केली.पुरुषांमध्ये क्रोर्य का वाढत चालले आहे?अशी हताशा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्य क्ष् रेखा शर्मा यांनी देखील घटनेची गंभीर दखल घेत तातडीने सविस्तर अहवाला मागवला आहे.
या घटनेबाबत संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट उसळली असून ‘शहर बदलले असले तरी शैतान तेच’अश्या स्वरुपाची प्रतिक्रिया देशभर उमटली आहे.गुन्हेगारांना फांशीवर लटकवा,अशी मागणी केली जात आहे.महिला ही काल श्री गणेश चतुर्थीनिमित्त गणेश मुर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडली असल्याचेही सांगितले जात आहे.तिला दोन अपत्य असल्याचे देखील बोलले जात आहे.याबाबत मात्र अधिकृत माहिती समोर आली नाही.




आमचे चॅनल subscribe करा
