फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजअखेर मनपाला आली जाग! पाच प्रतिबंधित क्षेत्र केले मुक्त

अखेर मनपाला आली जाग! पाच प्रतिबंधित क्षेत्र केले मुक्त

Advertisements

लालगंज,गौतम नगर, राजीव गांधी नगर,भालदारपुरा,शांतीनगर क्षेत्र प्रतिबंध मुक्त

नागपूर,ता.२६ मे: महापालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून महापालिका प्रशासनातर्फे शहरातील अनेक भाग हे प्रतिबंधित क्ष्ेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते.मात्र गेल्या २८ दिवसांपासून शहरातील अनेक प्रतिबंधित क्षेत्रात एकही कोराना बाधित आढळून न आल्यामुळे अखेर मनपाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे आज मंगळवार दि.२६ मे रोजी आदेश जारी करुन लालगंज दलालपुरा, गौतम नगर, राजीव गांधी नगर व कुंदनलाल गुप्ता नगर, भालदारपुरा,शांतीनगर भागातील प्रतिबंधित क्षेत्र हे मुक्त करण्यात आले.

नुकतेच अंबाझरी येथील ट्रस्ट ले आऊट येथील नागरिकांनी भर उन्हात त्यांच्या भागातील प्रतिबंध उठवण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले होते.आमदार विकास ठाकरे हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते.एवढेच नव्हे तर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर मनमानी कारभार करण्याचा आरोपाखाली फौजदारी खटला चालवण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. या पाठोपाठ पार्वतीनगर येथील नागरिकांनी देखील प्रतिबंधमुक्त क्ष्ेत्र करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या आंदोलनात भाजपचे आमदार मोहन मते सहभागी झाले होते.

केंद्र शासनाच्या नव्या दिशानिर्देशानुसार १४ दिवस प्रतिबंधित क्ष्ेत्रात एक ही कोरोना बाधित आढळून न आल्यामुळे ते क्ष्ेत्र प्रतिबंध मुक्त करण्यात यावे,अशी माहिती आहे. मात्र शहरातील अनेक भागात या निर्देशाची अंमलबजावणी केली जात नसून अनेक क्ष्ेत्रात नागरिकांना यामुळे अक्ष् रश: नरक यातना भोगावी लागत असल्याच्या अनेक बातम्या विविध माध्यमांवर प्रसिद्ध झाल्या. प्रतिबंधित क्ष्ेत्रातील नागरिकांनी मनपा प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केल्यानंतर देखील मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील नागरिकांचा संयम मात्र सुटत चालला आहे.अनेक ठिकाणी नागरिकच आता आंदोलनाचा मार्ग पत्करत आहेत. संपूर्ण क्ष्ेत्र सील करण्यात येत असल्यामुळे दैनदिन जिवनावश्‍यक वस्तूंसाठी देखील नागरिकांची चांगलीच भटकंती होत आहे.

‘ईद’च्या पार्श्वभूमीवर मोमिनपुरा,सतरंजीपुरा येथील प्रतिबंधित क्ष्ेत्रात देखील मनपा आयुक्तांनी कोणतीही सूट दिली नसल्यामुळे मुस्लिम बांधवांना किराणा दूकाने देखील उघडी नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला,याचा देखील रोष आयुक्तांवर व्यक्त केला जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

भाजी बाजारांचाही घोळ-
हरातील मध्यवर्ती कॉटन मार्केट बंद करुन दहा ही झोनमध्ये मनपा आयुक्तांनी भाजी मार्केट सुरु केले होते.मात्र या भाजी बाजारात ग्राहक व फूटकळ विक्रेत्यांची तूफान गर्दी उसळत असल्याने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत होता. रहीवासी भागांमध्ये आजूबाजूच्या ग्रामीण भागातून शेकडो ट्रक येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांच्याही काळजात धडकी भरली होती.विशेष म्हणजे,ट्रकांची गर्दी होऊ नये म्हणून मनपा प्रशासनातर्फे अनेक झोनमध्ये बल्ल्या लावून मुख्य रस्तेच बंद करण्यात आले होते. आता भाजी बाजार कॉटन मार्केटमध्ये भरविण्यास आयुक्तांनी अनेक अटींसह परवानगी दिल्यानंतर इतर झोनमधील भाजी बाजार बंद झाले असले तरी मुख्य रस्त्यांवरील लाकडी बल्ल्या या अद्याप तश्‍याच मनपा प्रशासनाच्या ‘मुत्सद्दी कारभाराची साक्ष् ’देत आहेत.

पंचशील चौकात तर नागरिकांनीच अर्ध्या बल्ल्या काढून दूचाकींसाठी मार्ग मोकळा केला. येथील यशवंत स्टेडिमजवळ धंतोली झोनसाठी भाजी बाजार भरत होता. अर्धा माेकळ्या झालेल्या मार्गावरुनच चौथ्या लॉक डाऊनमध्ये अशंत: शिथिलता मिळाल्यानंतर बाहेर पडणा-या चारचाकी या देखील ’हाय जंप मारुन’ पुढील मार्ग गाठत होत्या. मात्र मनपा प्रशासनाला शहरातील हे मुख्य रस्तेच मोकळे करण्याचा विसर पडला असून आधीच संकटात व अडचणीत सापडलेल्या नागपूरकर नागरिकांच्या त्रासात अधिक भर मनपाच्या भोंगळ कारभाराने टाकल्याने येथील नागरिक देखील संताप व्यक्त करीत आहेत.

कोराना बाधित आढळल्यामुळे ३३ पेक्ष्ा अधिक वस्त्यांमध्ये मनपाचा प्रतिबंध-

शहरात अतिसंवेदनशील व संवेदनशील असे दोन भाग केले आहे. १० झोनमधील खामला, बजाज नगर,अभ्यंकरनगर जयनगर,पांढराबोडी,रविनगर,काशीनगर,जवाहर नगर, एम्प्रेस सिटी,पार्वतीनगर,गणेशपेठ,जयभीमनगर,मोठा ताजबाग,मोमिनपुरा,टिमकी,बैरागीपुरा,गोळीबार चौक,हंसापुरी,सतरंजीपुरा, शांतीनगर,कुंदनलाल गुप्तनगर,दलालपुरा, इतवारी,राजीव गांधीनगर,संगमनगर,यशोधरा नगर,जरीपटका,गौतम नगर,गिट्टीखदान,जरीपटका,कुशीलनगर,खलाशीनगर,हिवरीनगर,जवाहर नगर.इ.भागात कोरोना बाधित आढळल्यामुळे हे क्ष्ेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले होते.

हिवरीनगर नवे प्रतिबंधित क्षेत्र घोषित-
लकडगंज झोन येथील हिरवीनगर भागात काल मंंुबईवरुन परतलेल्या एका तरुणीचा अहवाल हा कोरोना पॉझिटीव्ह आल्याने या क्ष्ेत्रातील पुढील भाग प्रतिबंधित क्ष्ेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे-
उत्तरपूर्वेस-आयसीआयसीआय एटीएम सेंटर
पूर्वेस- श्री.गोदीया यांचे घर व श्री.ठाकरे यांचे घर
पूर्वेस-तलमले यांचे घर
दक्ष्णिपूर्वेस-श्‍याम प्रोव्हीजन
दक्ष्णिपश्‍चिमेस- महालक्ष्मी झेरॉक्स सेंटर
उत्तरपश्‍चिमेस-मयुर ट्रेंडीग कंपनी शिवाजी चौक

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या