

[प्रसाद मच्छिंद्र कांबळी]
नागपूरचे नाव बोर्डावर लागले:सतीश लोटे यांची सूचक प्रतिक्रिया
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १८ फेब्रुवारी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची विशेष सभा ही आज गुरुवार दि. १८ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल,माटूंगा येथे पार पडली.सभेत एकूण ३९ नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते.नाट्य परिषदेच्या घटनेप्रमाणे नियामक मंडळाची विशेष सभा घेण्याबाबत प्रमुख कार्यवाह यांना १३ जानेवारी २०२१ रोजी ३३ सदस्यांनी अर्ज केला होता.घटनेप्रमाणे ३० दिवसांच्या आत सभा घेणे हे बंधनकारक होते.यासाठी ७ दिवसांपूर्वी पूर्वसूचना देणेही बंधनकारक होते,मात्र नाट्य परिषदेचे अध्यक्ष् प्रसाद मच्छिंद्र कांबळी यांनी सभा आयोजित केली नाही.

त्यामुळे नियामक मंडळाच्या ३६ सदस्यांनी ९ फेब्रुवारी २०२१ रोजी कांबळी यांच्यावरील अविश्वास ठरावासंबधी सभा आयोजित करण्यासाठी नाट्य परिषद मध्यवर्ती कार्यालयात व सर्व नियामक मंडळ सदस्यांना पत्रव्यवहार व ई-मेलने सूचित केले.ही सभा होऊ नये व आपली या पदावरुन गच्छंती होऊ नये यासाठी कांबळी यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली मात्र न्यायालयाने प्रसाद कांबळी यांची विनंती फेटाळून लावली.
ही सभा होऊ नये यासाठी नियामक मंडळाच्या ५६ सदस्यांच्या विराेधात कांबळी यांच्यावतीने अर्ज दाखल करण्यात आला होता.हा अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला.आज गुरुवार १८ फेब्रुवारी रोजी दूपारी २ वाजता उपाध्यक्ष्(उपक्रम) नरेश गडेकर यांच्या अध्यक्ष् तेखाली ही सभा पार पडली.या सभेत एकूण ३९ नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते.

[नवनिर्वाचित अध्यक्ष् नरेश गडेकर]
सहकार्यवाह सतीश लोटके यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले व सहकार्यवाह सुनील ढगे,संदीप जंगम,गिरीश महाजन दीपक रेगे,आनंद खरबस,भाऊसाहेब भोईर,विजय चौगुले,सविता मालपेकर,सुशांत शेलार,विजय गोखले,सुनील महाजन,योगेश सोमण,विणा लोकूर,सुरेश धोत्रे,मुकुंद पटवर्धन,दिलीप कोरके, दिपा क्ष्रि रसागर,चंद्रशेखर पाटील,उज्वल देशमुख,प्रमोद भुसारी,समीर इंदूलकर आदी उपस्थित होते.
सभेत प्रसाद कांबळी हे त्यांच्या अध्यक्ष् पदाचे बहूमत सिद्ध करु शकले नाहीत.३७ सदस्यांनी ठराव संमंत केला तर दोन सदस्य हे तटस्थ होते.अध्यक्ष् पद रिक्त झाल्याने सभेत याबाबत सविस्तर चर्चा झाली.
सभेने पुढील सभा होईपर्यंत नाट्यपरिषदेच्या अध्यक्ष् पदी नरेश गडेकर यांची निवड बहूमताने केली.३९ सदस्यांपैकी ३८ सदस्यांनी गडेकर यांच्या बाजूने मतदान केले.पुढील सभा येत्या १५ दिवसात आयोजित करण्यात येणार आहे.त्यात ५९ सदस्यांमधून अध्यक्ष् पदाची निवड केली जाईल.अखेर प्रसाद कांबळी यांच्या एककल्ली कारभारामुळे,सततचे आठमुठेपणाचे धोरण तसेच करोना काळातील पैशांच्या अफरातफरीच्या आरोपांमुळे कांबळी यांची गच्छंती निश्चित मानली जात होती.त्यावर आज परिषदेच्या नियमाप्रमाणे शिक्कामोर्तब झाले असून नाट्य परिषदेचे काम जोमाने सुरु करण्याचा निर्धार याप्रसंगी सदस्यांनी केला आहे.
गिरीश गांधी यांची शिष्टाई यशस्वी-
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळात जानेवारी महीन्यापासूनच बरीच उलथापालथ सुरु होती.नियामक मंडळाने बहूमताने संपूर्ण कार्यकारणीच बरखास्त करुन टाकली मात्र विशेषाधिकाराचा वापर करीत कांबळी यांनी १५ दिवसांची मुदत मागून घेतली होती.प्रसाद कांबळी यांच्याविरुद्ध नियामक मंडळात ब-याच दिवसांपासून असंतोष खदखदत होता.सतीश लोटके यांच्यासह काही सदस्यांनी कांबळी यांच्या धोरणांविरुद्ध धर्मादाय आयुक्तांकडे धाव ही घेतली होती.
नियामक मंडळाच्या बैठकीत २६ विरुद्ध १२ मतांनी कार्यकारीणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र या वेळी परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्ष्े यांनी मध्यस्थी करत विशेषाधिकारान्वये १५ दिवसात पुढची बैठक घेण्याची घोषणा केली व कार्यकारीणीला बहूमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत मिळाली मात्र महत प्रयासाने देखील कांबळी यांना आपली खूर्ची वाचवता आली नाही उलट सभाच होऊ नये यासाठी त्यांनी न्यायालयाचे दार ठाेठावले!
या सर्व प्रकरणात विदर्भातील सहा सदस्यांची मते ही अत्यंत महत्वाची होती.विदर्भातील ही सहा मते कांबळी यांच्या बाजूने वळती होईल असा दावा नागपूरातील एका ‘पदसिद्ध’नाट्यकर्मीने केला असल्याचे सूत्राद्वारे कळले.मात्र शहरातील सांस्कृतिक चळवळीचे अग्रगणी गिरीश गांधी यांनी मध्यस्थी करीत विदर्भातील सर्व सहा मते कांबळी यांच्या विरोधात जाईल असा शब्द दिला.आज पार पडलेल्या मतदानात विदर्भातील या सहाही मतांचा देखील महत्वाचा सहभाग असून विदर्भातील नरेश गडेकर यांच्या नावावर अध्यक्ष् पदी शिक्कामोर्तब झाल्याने,खास ‘सत्ताधीश‘सोबत बोलताना बाकी काहीही असो,नागपूरचे नाव आमच्या बोर्डावर आले,असा आनंद सतीश लोटके यांनी व्यक्त केला.
या संपूर्ण ‘महानाट्यात’नागपूरात गिरीश गांधी यांच्या शिष्टाईबाबत बरीच चर्चा नाट्य वर्तुळात घडली होती,हे विशेष!
नियामक मंडळातील ३४ सदस्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह यांच्याकडे अध्यक्ष् बदलण्यासाठी पत्र दिले होते.बुधवार दि. १३ जानेवारी रोजी पार पडलेल्या सभेत नियामक मंडळाचे ४५ सदस्य हजर होते.नाट्य परिषदेच्या अनेक ठरावावर त्या सभेत चर्चा न होता ते ठराव नियामक मंडळाच्या सदस्यांच्या बहूमताने ‘नामंजूर’ करण्यात आले.
कांबळी यांना अडचणीत आणनारे मुद्दे-
करोनाच्या काळात नाट्य परिषदेतर्फे एक कोटी २० लाखांची आर्थिक मदत,त्याचा ताळेबंद प न ठेवता वाटण्यात आली.त्यातही फक्त मुंबईच्या नाट्यकर्मींचीच वर्णी यात लागली,अखिल भारतीय नाट्य परिषदत असताना देखील उर्वरित महाराष्ट्रातील नाट्यकर्मी कांबळी यांच्या लेखी मदतीसाठी जणू पात्र नव्हते,यावर देखील बरीच खदखद नाट्यकर्मींमध्ये होती,याशिवाय कार्यकारी मंडळाच्या कार्यप्रणालीवर काही सदस्यांनी दर्शवलेला विरोध,बहूमत नसतानाही सध्याच्या कार्यकारीणीस कायम ठेवण्याचा अट्टहास,नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांची कांबळी यांच्यावर झालेली ‘खप्पामर्जी’,१०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नियोजनासंदर्भातील मनमर्जी कारभार,करोनाचे कारण पुढे करीत ई-संवादाच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट न सांगता केवळ कार्यकारीणीत सगळे निर्णय घेऊन मोकळे होण्याची वृत्ती इ.अनेक व्यव्हार कांबळी यांच्या विरोधात गेले.
युवा असलेले प्रसाद कांबळी हे नाट्यसृष्टिसाठी भरीव कामे करतील अशी अपेक्ष्ा वैदर्भिय नाट्यकर्मींना देखील होती मात्र कांबळी यांचा एकंदरित कार्यभाराचा अनुभव ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या वेळी अनेकांना आला.
आपली खूर्ची वाचवण्यासाठी सदस्यांचा, परिषदेला बदनाम करण्याचा डाव,असा आरोप कांबळी यांनी आपली खूर्ची वाचविण्यासाठी केला होता. अविश्वास ठराव मांडला गेला नाही तर कार्यकारीणी बरखास्त कशी होणार?असा प्रश्न विचारीत कार्यकारीणीला बरखास्त करण्याचा अधिकार धर्मादाय आयुक्तांना असून हा केवळ नाट्य परिषदेला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला मात्र आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्ष् पदावरुन परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात कांबळी हे पहीले व एकमेव असे अध्यक्ष् आहेत ज्यांच्या विरोधात अविश्वासचा ठराव आणण्यात आला एवढंच नव्हे तर त्यांची गच्छंती देखील झाली.




आमचे चॅनल subscribe करा
