फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमअखेर त्या जन्मदात्रीचा मृत्यू!

अखेर त्या जन्मदात्रीचा मृत्यू!

Advertisements

पदरी सहा मुले मात्र जन्मदात्रीचे जगणे उकीरड्यावर

नातवाने केला अंतिम संस्कार

नागपूर,ता.१५ डिसेंबर: कर्करोगामुळे ८० वर्षीय इंदिराबाई हटवार यांचा आज अखेर धंतोली येथील जीवन छाया केअर सेंटरमध्ये सकाळी ११ वाजता मृत्यू झाला.कवि सुरेश भट यांचे लोकप्रिय शब्द पुन्हा एकदा खरे ठरले ’इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.’.अडीच वर्षे त्या घट्ट पातळ नेसत असल्याने कंबरेच्या ठिकाणी झालेली जखम आणि त्या जखमेचे कर्करोगामध्ये परिवर्तित झालेली वेदना एकट्याने सहन करीत होत्या.सहा अपत्ये त्यांनी जन्माला घातली मात्र मृत्यू अनोळख्या शहरात अनोळख्या माणसांमध्ये लाभला हीच त्यांच्या जीवनाची दूर्देवी शोकांतिका ठरली.

‘सत्ताधीश’ने परवा १३ डिसेंबर रोजी त्यांच्यावरील वृत्त प्रसिद्ध केले होते.त्यांचा नातू राजेश बावणकुळे यांनी इंदिराबाई यांची भयंकर हेटाळणी,उपेक्षा आणि उकीरड्यावरचे जगणे जगा समोर आणले होते.अखेरच्या क्षणाला त्यांनीच इंदिराबाईंना वैद्यकीय सुश्रुषेसाठी धंतोली येथील जीवन छाया केअर सेंटरमध्ये भर्ती केले हाते.त्यांच्या औषधोपचाराचा खर्च उचलला मात्र पोटची पाच मुले यांना आपल्या जन्मदात्रीशी कोणतेही सोयरसूतक नव्हते.

हे पण वाचा………

सहा मुलांची जन्मदात्री कर्करोगामुळे उकीरड्यावर!

आज इंदिराबाई यांच्या मृत्यूनंतर त्यांना अग्नि देण्यासाठी देखील त्यांच्यावर अन्याय करणारा सर्वात लहान मूलगा अंकूश हटवार उपस्थित राहीला नाही.सावनेर येथे इंदिराबाईंवर अंत्यसंस्कार पार पडले.याप्रसंगी या जन्मदात्रीचा एक पुत्र शांताराम व दूस-या पुत्राचा मूलगा मंगेश हटवार उपस्थित राहीले.

त्यांच्या मुलीचा मुलगा म्हणजे राजेश बावणकुळे यांनी आपल्या आजीच्या अंत्यसंस्कारातही पुढाकार घेऊन त्यांना अग्निच्या स्वाधीन केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या