फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमअखेर गंगा-जमुनात सापडल्या भुयारी!

अखेर गंगा-जमुनात सापडल्या भुयारी!

Advertisements


अल्पवयीन तरुणीच्या तक्रारीवर पोलिसांचा छापा

ज्वाला धोटे स्वत:चं नाव बदलणार का?गंगा जमुना वस्ती हटाव सदस्यांचे आव्हान

नागपूर,ता. २९ ऑक्टोबर: सप्टेंबर ११ पासून नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील बदनाम वस्ती गंगा-जमुना ही सील आहे.यावर ‘वस्ती हटाव व वस्ती बचाव’ अश्‍या दोन्ही गटांमध्ये चांगलेच वादंग माजले होते.आंदोलने ही झाली मात्र आज या वस्तीवर अचानक पोलिसांनी धाड टाकून यातील दोन घरातील भुयारींचा शोध घेतला,एका आरोपीला अटक ही केली,त्यामुळे पुन्हा हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कलम ७(१) नुसार गंगाजमुना परिसरात सुरु असलेल्या वेश्‍याव्यवसाय कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश काढले होते.यामुळे बराच वाद निर्माण झाला व वस्तीला छावणीचे स्वरुप आले होते.यातच आज एक नवीनच भर पडली असून गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलीने या बदनाम वस्तीतून स्वत:ची ग्राहकाच्या मदतीने सुटका करुन घेतली होती.

या मुलीची विक्री २० लाख रुपयात करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणने आहे.सुटका करुन ही अल्पवयीन मुलगी आपल्या गावी पोहोचली मात्र पुन्हा तिच्या विक्रीचा घाट घातल्या जात असल्याची कुणकुण तिला लागली.तिने तडक नागपूरातील लकडगंज पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

पोलिसांची धाड पडल्यानंतर तिला या वस्तीतील भुयारीमध्ये इतर ७ ते ८ अल्पवयीन मुलींसोबत लपविले जात असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.याशिवाय आणखी एका भुयारीत ३ ते ४ अल्पवयीन मुलींना दडविले जात असल्याचे भयाण वास्तव तिने बयाण केले.यावरुन गंगाजमुना वस्तीतील अनेक घरात भुयारी जागा अल्पवयीन मुलींना दडवण्यासाठी असल्याचे पोलिसांना ज्ञात झाले.

परिणामी मुलींने दिलेल्या माहितीप्रमाणे वस्तीतील आज त्या घरांवर पोलिसांनी धाड टाकली.तिने चिन्हीत केलेल्या जागा फोडून काढल्या असताना त्या दोन्ही ठिकाणी भुयारी सापडल्या.अमितेश कुमार यांच्या कारवाईनंतर लगेच या भुयारी पुन्हा भितींने बुजवून टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मात्र यावरुन गंगाजमुना वस्ती हटाव समितीच्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या आरोपांना पुष्टि मिळाली.ही वस्ती अल्पवयीन मुलींसाठी नरक असणारी जागा असल्याचा दावा भाजपचे नगरसेवक मनोज चापले तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांनी केला होता.
आज या वस्तीत भुयारी सापडल्यानंतर गंगाजमुना वस्ती बचाव आंदोलनाच्या नेत्या ज्वाला धोटे या आपलं नाव बदलणार का?असा सवाल त्यांनी केला.या वस्तीत कोणत्याही घरात भुयारी नसल्याचा दावा राष्ट्रवादीच्याच अर्बन सेलच्या अध्यक्षा व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे यांनी केला होता.

आता हा वाद आणखी किती पेटणार व कसा मिटणार?याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.ज्वाला धोटे यांनी अल्पवयीन मुलींकडून वेश्‍या व्यवसाय करवून घेणा-यांचे कधीही समर्थन करणार नाही,असे विधान केले होते,असे चुकीचे काम करणा-या वारांगणांना कठोर शिक्षा करावी,त्यांची घरे सील करावी अशी देखील भूमिका मांडली होती.

मात्र त्यांनी असे भुयार वस्तीत नसल्याचा दावा केल्याचा वस्ती हटाव समर्थकांनी करुन त्या आता आपलं नाव बदलणार का?असे आव्हान ते करीत आहेत.

थोडक्यात आधीच वेश्‍या व्यवसाय करणा-या वारांगणासोबत सभ्य समाजाची सहानुभूती जुळली नसते त्यात त्यांच्या बदनाम वस्तीत अल्पवयीन मुलींची खरेदी करुन अश्‍या प्रकारे त्यांना भुयारीत डांबून ठेवण्यात येत असल्याचे वास्तव समोर आल्याने केवळ नागपूरच नव्हे तर देशभरातील अश्‍या वस्त्या कायमच्या हटवल्या गेल्या पाहीजे,असे अनेक नागपूरकर नागरिकांचे मत आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या